सजीव आणि निर्जीव वस्तूंत स्वतःला पहाणारे, पूर्ण ब्रह्माशी एकरूप झालेले संत

हे मृत्यू, हे नश्वर शरीर हवे तर खुशाल घेऊन जा ! मला त्याची खंत नाही. मी कुठल्याही मूर्त-अमूर्त शरिराने कार्यरत राहू शकतो. या शीतल चंद्रकिरणांना धारण करून मी पृथ्वीवर संचार करीन, पर्वतावरून खळखळणाऱ्या झऱ्याचे, ओढ्या-नाल्याचे वस्त्र पांघरून दिव्य संचार करीन, समुद्राच्या लाटेच्या रूपाने मी नृत्य करीन. मंद वाऱ्याची झुळूक हीच माझी प्रसन्न धुंद पाऊले असतील….. … Read more

साधनेने संचित आणि इच्छा यांचा नाश होणे

विद्यारण्य स्वामी फारच गरीब होते. अर्थप्राप्तीसाठी त्यांनी गायत्रीची २४ पुरश्चरणे केली; पण अर्थप्राप्ती झाली नाही. तेव्हा त्यांनी थकून संन्यास घेतला. त्या वेळी गायत्री मातेचे दर्शन झाले. देवी म्हणाली, ‘मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय पाहिजे ते माग.’ स्वामी म्हणाले, ‘आता मला काही मागायची इच्छा नाही. इच्छा होती, तेव्हा तू मला प्रसन्न झाली नाहीस. असे का झाले … Read more

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’, असे म्हणणे हास्यास्पद !

शाळेतल्या मुलांनी ‘फ्रेंच भाषा नाही’ किंवा ‘हिमालय नाही’, असे म्हणणे जसे हास्यास्पद आहे, तसेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’, असे म्हणणे हास्यास्पद आहे. – डॉ. आठवले (३०.६.२०१४)

भीक आणि भिक्षा यांमधील भेद

१. भिक्षा मागण्याचे लाभ : सनातन धर्मात ब्रह्मचारी आणि संन्यासी यांनी काही ठराविक घरांतून भिक्षा मागून अन्न खावे, असे सांगितले आहे. २. ब्रह्मचर्याश्रम : गुरुकुलात रहाणारी काही मुले श्रीमंत घरांतील असतात आणि त्यांचे पालक त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करू शकतात; पण राजा असो वा रंक प्रत्येकाने भिक्षा, म्हणजेच माधुकरी मागून पोट भरावे, असा गुरुकुलाचा नियम असल्यामुळेे … Read more

अध्यात्माचे अर्धवट ज्ञान असल्यास होणारी हानी

१९४२ या वर्षी देशाची स्थिती पहावली नाही; म्हणून साधना करणारे एकजण क्रांतीकारक बनले. ते पकडले गेल्यावर पोलिसांनी सहकाऱ्यांची नावे विचारली. तेव्हा अध्यात्माचा अर्धवट अभ्यास झाल्याने, म्हणजे ‘सत्यं ब्रूयात् (सत्य बोलावे)’ एवढेच माहित असल्याने त्यांनी सत्य सांगितले, म्हणजे त्यांच्या बरोबरच्या इतर क्रांतीकारकांची नावे सांगितली. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांच्या सहकाऱ्यांनाही फासावर लटकवले. त्यांनी अध्यात्माचा पूर्ण अभ्यास केला असता, … Read more

अभ्यासू वृत्ती नसलेले बुद्धीप्रामाण्यवादी !

मी संमोहन उपचारतज्ञ म्हणून २५ वर्षे व्यवसाय केला. संमोहन उपचारशास्त्र मानसोपचाराच्या अंतर्गत येते. या उपचाराच्या पद्धतीत संशोधन केल्यामुळे माझे विदेशांत कौतुक झाले. मला अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून व्याख्यान देण्यासाठी निमंत्रणही आले होते. अशी पार्श्‍वभूमी असतांनाही मी बरे करू शकत नसलेले रुग्ण संतांच्या उपचारांनी बरे होतात, हे मी अनुभवले. नंतर मी संतांकडून त्यांची उपचारपद्धत शिकण्यासाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे … Read more

खरा आनंद

आनंद हा कोणताही प्रसंग, वस्तू अथवा व्यक्ती यांच्याशी निगडीत नसावा. ज्या गोष्टीमुळे दुःख होते वा होईल, असा कोणताही आनंद नसावा. आपला आनंद आपल्यात मिळावा, हा विचार प्रत्येकाने सांभाळून ठेवावा, म्हणजे कोणत्याही अवस्थेत शांती ढळणार नाही. तुझे आहे तुजपाशी या संतवाणीप्रमाणे ज्याचा त्याने शोध घेत जावा. मनाची स्थिती केवळ स्वतःशीच निगडीत असावी. अन्य कुठेही संपर्क नसावा. … Read more

कर्तव्य

आई-वडील आणि इतर वडीलधारी माणसे देवघरातील मूर्तीसारखी सांभाळा. कर्तव्यात कुठेच न्यूनता ठेवू नका. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

श्रद्धेचे महत्त्व

आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला श्रद्धास्थान असणे आवश्यक आहे. त्यामुळे मनाला शांती मिळून मानसिक तणावाचे निर्मूलन होते. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

समष्टी साधना करतांना संचित आणि प्रारब्ध नष्ट कसे होते?

समष्टी साधना करतांना साधक जसजसा समाज, राष्ट्र आणि सनातन धर्म यांच्याशी हळूहळू एकरूप होतो, तसतसा त्याचा अहं हळूहळू न्यून होत जातो. साधक समष्टीशी पूर्णपणे एकरूप झाला की, त्याचा अहं पूर्णपणे नाहीसा होतो. अहंकार, मीपणा संपला की, पाप-पुण्य, क्रियमाण, संचित, प्रारब्ध इत्यादी काहीच उरत नाही. – (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले, चेंबूर, मुंबई.(२५.६.२०१३)