ईश्‍वरप्राप्ती ही पूर्णकालीन साधना !

‘ईश्‍वरप्राप्ती हे अर्धवेळ काम (Part time job) नसून ती पूर्णकालीन साधना आहे. यासाठी आपली प्रत्येक कृती आपण भक्तीभावाने केली पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारतियांनो, साधनेचे महत्त्व लक्षात घ्या !

‘हल्ली पाश्‍चात्त्य देशांत बहुधा भांडायला हक्काचे कुणी असावे; म्हणून लग्न करतात ! पुढे भांडणाचा कंटाळा आला की, घटस्फोट घेतात. नंतर पुन्हा लग्न करतात आणि पुन्हा घटस्फोट घेतात. असे चक्र चालू रहाते ! आपल्याकडे ही स्थिती होऊ नये; म्हणून साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गुरुमंत्राचे महत्त्व लक्षात न घेता गुरूंच्या देहाच्या नावात अडकणारे शिष्य !

‘शिष्याच्या उद्धारासाठी गुरु शिष्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार गुरुमंत्र म्हणून एखाद्या देवतेचा नामजप करण्यास सांगतात. हा नामजप त्या साधकाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी पोषक/पूरक असतो, तसेच त्या जपामागे गुरूंचा संकल्पही कार्यरत असतो. गुरुमंत्राचे इतके अनन्यसाधारण महत्त्व असतांना बहुतेक शिष्य गुरुमंत्राकडे दुर्लक्ष करून गुरूंचेच नाव घेतांना दिसतात. यातून त्या शिष्यांची प्रगती होण्याची गती न्यून होतेच, तसेच ते गुरूंच्या सगुण रूपात … Read more

साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व लक्षात घ्या !

‘ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करायची असल्यास जगातील भारत सोडून इतर कोणत्याही देशात राहू नका; कारण भारतियांची स्थिती वाईट असली, तरीही भारताइतका सात्त्विक देश जगात कुठेही नाही. इतर सर्व देशांत रज-तमाचे प्रमाण अत्यधिक आहे. ५० टक्के आध्यात्मिक पातळीहून अधिक पातळी असलेले मात्र जगात कुठेही राहून साधना करू शकतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधना करतांना आपली प्रत्येक गोष्टीकडे पहाण्याची दृष्टी पालटते !

एखादी कृती किंवा घटना यांना काळानुसार आपण ‘देवाची लीला’ म्हणू शकतो. साधना करतांना आपली प्रत्येक गोष्टीकडे पहाण्याची दृष्टी पालटते. जीवनात दुःख आले, तरी साधकाला ती भगवंताची एक लीलाच वाटते; परंतु सामान्य माणसाला मात्र तीच गोष्ट दुःख देऊन जाते. श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

ईश्‍वरप्राप्ती करून देणार्‍या संतांचे महत्त्व जाणा !

‘कुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला नेणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्‍वरप्राप्ती करून देणारे संत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भगवंतच प्रत्येकाचा खरा आधार !

‘कठीण समय येता कोण कामास येतो ?’ या प्रश्‍नाचे उत्तर आहे, ‘कठीण समय येता देवच कामास येतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ईश्वरी राज्यात असे नसेल !

‘पोलीस आणि न्यायाधीश यांना साधना शिकवली असती, तर त्यांना एका क्षणात ‘गुन्हेगार कोण आहे’, हे कळले असते. साधनेअभावी जनतेचे कोट्यवधी रुपये केवळ तपासासाठी खर्च होत आहेत. ईश्‍वरी राज्यात असे नसेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, काळाप्रमाणे साधना पालटते, हे लक्षात घ्या !

‘संपत्काळात, म्हणजे पूर्वीच्या युगांत ‘गोदान देणे’ही साधना होती. आता आपत्काळात गायींच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झालेला असतांना ‘गोदान देणे’ नव्हे, तर ‘गोरक्षण करणे’ महत्त्वाचे आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

खरा ज्ञानी हा अतिशय नम्र असतो !

‘खरा ज्ञानी हा अतिशय नम्र असतो. ज्ञान होणे, म्हणजेच ‘आपण अज्ञानी आहोत’, हे गवसणे. जेव्हा जिवाला कळते, ‘देवाच्या या अथांग ज्ञानसागरातील केवळ एका थेंबाइतकेच ज्ञान तो ग्रहण करू शकला आहे आणि तेही भगवंताच्या कृपेनेच त्याला शक्य झाले आहे’, तेव्हा त्याचा अहं वाढत नाही.’ – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२६.३.२०२०)