आत्मप्रौढी नको !

स्वतःच्या प्रगतीचा विचार करावा; पण अहंकाराची जोपासना करू नये. आत्मप्रौढीपेक्षा अधिक कोणता वेडेपणा नाही. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन कोणतीही कृती करण्यापूर्वी थोडा वेळ थांबून ती खरोखरंच हितावह आहे का ? याचा विचार करण्याची स्वतःला सवय लावावी. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

खरे दान

खरे दान सत्पात्री असावे आणि त्याची वाच्यता दुसऱ्यांजवळ होऊ नये. त्याची आठवणही क्षणार्धात विसरण्याचा प्रयत्न करावा. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन श्रमाची कास धरा ! ईश्वरी शक्ती अगाध आहे. तुमच्या साधनेने तुमची दुःखे निश्चितच पळून जातील; पण त्यासाठी श्रमाची कास धरा. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

मन आणि इंद्रिय यांच्या आधीन होऊ नका !

जो मन आणि इंद्रिये यांच्या आधीन नसतो, तोच खऱ्या अर्थाने स्वतंत्र होय. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन दुसऱ्याच्या चांगल्या गुणाचा अंगीकार करा ! गुणग्राहकता हा सद्गुण अंगिकारून दुसऱ्याच्या चांगल्या गुणाचा अंगीकार करावा. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

न्यूनगंड बाळगू नका !

आपल्या उणिवांची जाणीव ठेवून त्यांविषयी न्यूनगंड न बाळगता त्यांवर मात करण्यासाठी सदैव प्रयत्नशील रहा. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन शिष्याने नेहमी सद्गुरूंशी एकनिष्ठ रहावे ! भाग्याने सद्गुरु लाभल्यास शिष्याने एकनिष्ठ रहावे, म्हणजे त्याच्याही नकळत त्याचा आध्यात्मिक विकास होत जाईल. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

कलेपेक्षा शिकण्याच्या संदर्भात अध्यात्मविषयक लिखाण महत्त्वाचे !

१. कला : येथे चित्रकलेचे उदारहण घेऊ. एखाद्या देवतेचे सुंदर चित्र काढले, तर चित्र काढणार्‍याला आणि ते पहाणार्‍याला थोडा वेळ आनंद मिळतो. मात्र त्या चित्रातून काहीतरी शिकले, असे होत नाही. २. अध्यात्मविषयक लिखाण : एखाद्या देवतेवरील लिखाणामुळे वाचकाला अभ्यास करण्यास दिशा आणि स्फूर्ती मिळते. यावरून शिकण्याच्या संदर्भात कलेपेक्षा अध्यात्मविषयक लिखाण महत्त्वाचे आहे, हे लक्षात येईल. … Read more

नैवेद्याची चव घेऊन मग तो कालीमातेला दाखवणारे रामकृष्ण !

रामकृष्ण हे कालीमातेचे भक्त होते. कालीमातेला नैवेद्य दाखवतांना ते नेहमी जेवण चाखून मगच दाखवत असत. लोकांनी याचे कारण त्यांना विचारले. तेव्हा ते म्हणाले, आई आपल्या मुलाला जेवण द्यायच्या आधी स्वतः त्याची चव घेते. त्यातील तिखट आणि मीठ यांचे प्रमाण बघते आणि मगच मुलाला देते. मग मी कालीमातेचा नैवेद्य आधी का चाखून पाहू नये ? – … Read more

अकर्मकर्माचे उदाहरण : संपूर्ण विरक्त असल्याने अनेक स्त्रियांचा पती असलेल्या कृष्णाने आपले ब्रह्मचारित्व आणि फळे खाऊनही ऋषींनी आपले निराहारित्व टिकवणे

वैराग्य दाखवण्यापेक्षा मनातील वैराग्य हे अधिक महत्त्वाचे असते. सर्व गोष्टींचा संपूर्ण उपभोग घेत असूनही श्रीकृष्ण मनातून पूर्णतः विरक्त होता. एकदा यमुनेला पूर आलेला होता. यमुनेच्या पलीकडे आलेल्या निराहारी तपस्वी मुनींना भेट म्हणून कृष्णाने आपल्या मित्राला फळे घेऊन जाण्यास सांगितले. मित्राने विचारले, यमुनेला तर पूर आलेला आहे. एकही नावाडी आपली होडी सोडावयास तयार नाही. मग मी … Read more

सजीव आणि निर्जीव वस्तूंत स्वतःला पहाणारे, पूर्ण ब्रह्माशी एकरूप झालेले संत

हे मृत्यू, हे नश्वर शरीर हवे तर खुशाल घेऊन जा ! मला त्याची खंत नाही. मी कुठल्याही मूर्त-अमूर्त शरिराने कार्यरत राहू शकतो. या शीतल चंद्रकिरणांना धारण करून मी पृथ्वीवर संचार करीन, पर्वतावरून खळखळणाऱ्या झऱ्याचे, ओढ्या-नाल्याचे वस्त्र पांघरून दिव्य संचार करीन, समुद्राच्या लाटेच्या रूपाने मी नृत्य करीन. मंद वाऱ्याची झुळूक हीच माझी प्रसन्न धुंद पाऊले असतील….. … Read more

साधनेने संचित आणि इच्छा यांचा नाश होणे

विद्यारण्य स्वामी फारच गरीब होते. अर्थप्राप्तीसाठी त्यांनी गायत्रीची २४ पुरश्चरणे केली; पण अर्थप्राप्ती झाली नाही. तेव्हा त्यांनी थकून संन्यास घेतला. त्या वेळी गायत्री मातेचे दर्शन झाले. देवी म्हणाली, ‘मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय पाहिजे ते माग.’ स्वामी म्हणाले, ‘आता मला काही मागायची इच्छा नाही. इच्छा होती, तेव्हा तू मला प्रसन्न झाली नाहीस. असे का झाले … Read more

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’, असे म्हणणे हास्यास्पद !

शाळेतल्या मुलांनी ‘फ्रेंच भाषा नाही’ किंवा ‘हिमालय नाही’, असे म्हणणे जसे हास्यास्पद आहे, तसेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’, असे म्हणणे हास्यास्पद आहे. – डॉ. आठवले (३०.६.२०१४)