स्वतःच्या आवडीचे नाम आणि गुरूंनी दिलेले नाम
भावार्थ : स्वतःच्या आवडीचे नाम घेतांना त्यात थोडा तरी अहंभाव असतो. याउलट गुरूंनी दिलेले नाम घेतांना अहंभाव तर नसतोच; पण त्या नामात चैतन्य असल्याने प्रगती लवकर होते. – सनातनचे श्रद्धास्थान संत भक्तराज
भावार्थ : स्वतःच्या आवडीचे नाम घेतांना त्यात थोडा तरी अहंभाव असतो. याउलट गुरूंनी दिलेले नाम घेतांना अहंभाव तर नसतोच; पण त्या नामात चैतन्य असल्याने प्रगती लवकर होते. – सनातनचे श्रद्धास्थान संत भक्तराज
खरा ज्ञानी निरिच्छ असतो. त्याने षड्रिपूही जिंकलेले असतात. त्याच्या प्रत्येक कृतीला कार्यकारणभाव असतो. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन
हिमालयात एकांतात राहून आयुष्यभर साधना केली, तरी साधकातील स्वभावदोष आणि अहंभाव नष्ट झाले, याची खात्री देता येत नाही. असा साधक जेव्हा समाजात येतो, तेव्हा अनेक वर्षे प्रसंगच न घडल्याने निद्रिस्त असलेले त्याचे दोष बहुदा उफाळून येतात. याचाच अर्थ हा की, एकांतातील व्यष्टी साधनेत दोष लक्षात येत नाहीत. याउलट समष्टी साधनेत इतरांशी वारंवार संबंध येत असल्यामुळे … Read more
ईश्वरावर श्रद्धा ठेवा. घरातील वातावरण आधुनिक असले, तरी देवघर असावे. कुळधर्म-कुळाचार यांचे पालन करा. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन मनाची एकाग्रता मनाची एकाग्रता ही अशी शक्ती आहे की, जी प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त करून देते. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन
माणूस जेव्हा खरे ज्ञान प्राप्त करतो, तेव्हा त्याला कळते की, मी विश्वातील अमर्याद ज्ञानभांडारातील अत्यल्प असे ज्ञान प्राप्त केले आहे. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन आध्यात्मिक प्रगतीचे महत्त्व आध्यात्मिक प्रगती होऊ लागल्यावर माणसाचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन आपोआप पालटत जातो आणि शाश्वत सुखाच्या दिशेने त्याची वाटचाल चालू होते. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन
शाळेतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कसेही वागायला कोणी संमती देत नाही. रस्त्यावरून गाडी कशीही चालवायला व्यक्तीस्वातंत्र्य नसते. आधुनिक वैद्य नसलेल्याला औषधे द्यायला संमती नसते. याचा अर्थ हा की, समाजातील सर्वच क्षेत्रांत व्यक्तीस्वातंत्र्याला संमती नसते. असे असतांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली समाजात स्वेच्छेने कसेही वागायला संमती मागतांना कोणाला काहीच कसे वाटत नाही ? १. स्वेच्छेने वागणे : … Read more
परमेश्वराप्रमाणेच सद्गुरूंवर दृढ श्रद्धा असेल, तर सद्गुरूंच्या रूपात परमेश्वर दिसतो. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन सद्गुरूंचा शोध घेऊ नये ! खराखुरा सद्गुरु लाभणे, ही सुकृतावर आधारित गोष्ट आहे. आपल्या संचितानुसार योग्य वेळी सद्गुरूंची भेट होते. वृथा शोध घेऊ नये. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन
जे काम कराल, ते श्रद्धेने, सचोटीने, शुद्ध मनाने आणि परमेश्वरी कार्य म्हणून करा, म्हणजे ईश्वर आपल्यापासून फार दूर नाही. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन सद्गुरूंना आपल्यापेक्षा वेगळे समजू नका ! जो सद्गुरूंना आपल्यापेक्षा वेगळा आणि दूर समजतो, तो त्यांच्यापासून पूर्ण लाभ मिळवू शकत नाही. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन
बुद्धीवादाच्या मर्यादा जेथे संपतात, तेथेच ईश्वरी शक्तीच्या उत्क्रांतीचा उगम होतो. इथेच मनुष्य आध्यात्मिक विचार करू लागतो.- योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन खरा एकांत माणूस कुठेही गेला, तरी त्याला इतर कुठलेही नसेल; पण स्वतःच्या शरिराचे बंधन राहीलच; म्हणून शारीरिक आणि सांसारिक विचारांपासून मुक्त होणे, हाच खरा एकांत. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन
समजा, मनाची एकाग्रता साधली नाही, तरी पावित्र्याने कर्तव्य म्हणून मंत्रजप केल्यावर मन आपोआप स्थिर होत जाईल. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन अहंभाव, म्हणजे मीपणा. हा अहंभाव सोडला, तर माणसांच्या समूहात तुम्ही आश्चर्यकारक एकांताचा अनुभव मिळवाल. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन