कोणीतरी निर्माण केल्याशिवाय काहीही आपोआप निर्माण होत नाही. असे असतांना…

कोणीतरी निर्माण केल्याशिवाय काहीही आपोआप निर्माण होत नाही. असे असतांना बुद्धीच्या निर्मात्याचा, ईश्‍वराचा शोध न घेता बुद्धीद्वारे त्याने निर्माण केलेल्या गोष्टींचा शोध घेत असतांना ईश्‍वर नाही, असे म्हणणे, ही आहे बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या बुद्धीची झेप ! – (प.पू.) डॉ. आठवले

त्याग केल्यावर ईश्‍वरप्राप्ती होते !

देशासाठी प्राण अर्पण करणार्‍या क्रांतीकारकांना कुटुंबीय विरोध करत नाहीत; पण ईश्‍वरप्राप्तीसाठी कुटुंब सोडणार्‍याला सर्वच विरोध करतात. – (प. पू.) डॉ. आठवले ‘ईश्वर, अध्यात्म नाही’ असे म्हणणे हास्यास्पद ‘एखाद्या अशिक्षिताने ‘विज्ञान नाही’, असे म्हणणे जेवढे हास्यास्पद आहे, त्याहूनही जास्त हास्यास्पद बुद्धीवाद्यांनी ‘ईश्वर, अध्यात्म नाही’, असे म्हणणे आहे !’ – (प. पू.) डॉ. आठवले

एखाद्या बाळाने आई-वडील कोण ? यांचा शोध घ्यायचा प्रयत्न करून…

एखाद्या बाळाने आई-वडील कोण ? यांचा शोध घ्यायचा प्रयत्न करून उत्तर मिळाले नाही की, आई-वडील नसतातच असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी देव नसतो, असे म्हणणेे हास्यास्पद आहे ! – (प.पू.) डॉ. आठवले

संतांचे महत्व !

सत्ताधिकार्‍यांशी असलेल्या ओळखीचा उपयोग संकटात होत नाही. खरे साहाय्य संतच करतात ! – (प.पू.) डॉ. आठवले ‘कमी संख्याबळ असूनही पांडव विजयी झाले; कारण श्रीकृष्णाने त्यांच्या मनात संकल्पयुक्त चैतन्यमयी बिजे पेरली. आपले संतही सध्या तेच कार्य करत आहेत.’ – (प.पू.) डॉ. आठवले

आज्ञापालनाचे महत्त्व !

साधना करतांना मनोलय होणे, हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. नामजप, प्रार्थना अशा भक्तीमार्गातील साधनांनी, तसेच कर्मयोग, ध्यानयोग आणि ज्ञानयोग या मार्गांनीही मनोलय होण्यास बराच काळ लागतो. याउलट आज्ञापालन करत गेल्यास मनोलय आणि बुद्धीलय होण्यास साहाय्य होते. यावरून साधकाने उत्तरदायीत्व असलेल्याचे आणि शिष्याने गुरूंच्या आज्ञेचे पालन करण्याचे महत्त्व लक्षात येते. – (प,पू.) डॉ. आठवले

अधात्म विज्ञाननिष्ठ नको तर विज्ञान अधात्मनिष्ठ हवे !

देवाला न मानणार्‍यांनो, देवाने बनवलेल्या वस्तू न वापरता तुम्ही प्राणी तर दूरचीच गोष्ट आहे; पण मातीचा एक कण तरी बनवून दाखवता का ? – (प.पू.) डॉ. आठवले अधात्म विज्ञाननिष्ठ नको तर विज्ञान अधात्मनिष्ठ हवे. – (प.पू.) डॉ. आठवले, (७.१२.२००७) ‘विज्ञान बुद्धीलय करण्याऐवजी बुद्धीचे कार्य वाढवते; म्हणजे ईश्वरापासून दूर नेते. ईश्वरप्राप्ती करून न देणार्‍या विज्ञानाची किंमत … Read more

कर्मातून (सेवेतून) आनंद अनुभवणे

कर्मातून (सेवेतून) आनंद अनुभवणे प.पू. पांडे महाराज ‘प्रत्येक कृती आपल्या नकळत होत असते, उदा. डोळ्यांनी पहाणे, लिहिणे. त्या आत्मस्वरूप भगवंताकडून चालूच असतात. तोच सर्व अवयवांकडून कृती करवून घेत असतो. त्यामुळे जिवाला अन्य काही करावे लागत नाही. त्यामुळे मन/ वृत्ती आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करावी. हे साध्य होण्यासाठी पुढील कृती कराव्या. १. सातत्याने कृतज्ञता व्यक्त करावी. २. … Read more

‘इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।’

पंढरपूरला जाऊनसुद्धा पुन्हा आपल्याला परत येण्याची इच्छा होते; म्हणून म्हणतात, ‘इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।’ भावार्थ : ‘इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।’ म्हणजे ‘पंढरपूरला जाणार’, या कल्पनेने वाट पहाण्यात जो आनंद आहे, तो प्रत्यक्ष पंढरपूरला गेल्यावर होत नाही; कारण तेथे गेल्यावर परत घरी यायची इच्छा होते. तसेच परमेश्वराच्या भेटीपेक्षा … Read more

प्रगती

जसजशी प्रगती होते, तसतसे परमेश्‍वरापुढे आपण किती क्षुद्र आहोत, याची जाणीव होते. – (प.पू.) डॉ.आठवले (२९.७.२०१४) विज्ञान विज्ञानवाद्यांनो, विज्ञान तात्कालिक सुख देते, तर अध्यात्म चिरंतन आनंद देते, हे समजून घ्या ! – (प.पू.) डॉ. आठवले (२१.२.२०१४)

श्राद्ध नाही, तर वडिलधार्‍यांची सेवा करणे, हाच पितृऋणातून मुक्त व्हायचा खरा मार्ग !

वृद्ध आई-वडिलांची, आजोबा-आजींची काळजी न घेता, ते गेल्यावर श्राद्ध, त्रिपिंडी श्राद्ध करणार्‍यांना विधींचा कितपत लाभ होणार ? पूर्वजांचा त्रास होतो; म्हणून नारायण-नागबळी सारखे विधी करणे केवळ स्वार्थी होेत. वडिलधार्‍यांची सेवा करणे, हाच पितृऋणातून मुक्त व्हायचा खरा मार्ग आहे. वडिलधार्‍यांची सेवा करणे हे कर्तव्यच आहे. त्याचे पालन केले, तर पुण्य लाभत नाही, पण न केल्यास दोष … Read more