वृद्धाश्रम चालवणार्‍यांनो,वृद्धाश्रमात रहाणार्‍यांकडून साधना करवून घ्या !

बर्‍याच वृद्धाश्रमांच्या पत्रकांत आणि जाहिरातींत तेथे काय सोयी आहेत, याची माहिती असते. वृद्धांच्या करमणुकीसाठी एखाद्या कार्यक्रमाला किंवा सहलीलाही त्यांना घेऊन जातो, असेही त्यात सांगितलेले असते. वृद्धाश्रमात शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवरची काळजी घेतली जात असले, तरी आध्यात्मिक स्तरावर काळजी घेतली जात नाही. बहुतेक वृद्धांनी आयुष्यभर साधना केलेली नसते. आता त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या काळात तरी … Read more

संतांकडे आशीर्वाद मागावा लागत नाही !

काही जण संतांकडे गेल्यावर आशीर्वाद मागतात. त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, साधना चांगली असेल, तर आशीर्वाद न मागताही मिळतो आणि साधना चांगली नसेल, तर आशीर्वाद मागूनही मिळत नाही. सनातन संस्थेला अनेक संतांनी स्वतःहून आशीर्वाद दिले आहेत, ते कार्य चांगले असल्यामुळेच ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातन संस्थेच्या शिकवणीचे ध्येय

कीर्तनकार किंवा प्रवचनकार निर्माण करणे, हे सनातन संस्थेचे ध्येय नसून संत तयार करणे हे ध्येय आहे. त्यामुळे सनातनमध्ये साधकांना जी शिकवण दिली जाते, ती पांडित्य शिकवणारी नसते, तर साधकत्व शिकवणारी असते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि प्रवचनकार

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते केवळ प्रवचने करत नाहीत, तर धर्मसत्संग घेतात आणि त्याद्वारे सत्संगाला येणार्‍यांची साधनेत प्रगती होईल, असे करतात. प्रवचनकारांप्रमाणे श्रवणभक्तीची आणि कौतुकाची अपेक्षा करत नाहीत. – (प.पू.) डॉ. आठवले

उन्नतांनी स्थुलातील कार्य सहसा न करण्याची कारणे

राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती अतिशय गंभीर असूनही संत त्या संदर्भात काही का करत नाहीत ?, असा प्रश्‍न काही जणांना पडतो. त्याचे उत्तर येथे दिले आहे. १. कालमाहात्म्य जाणणे : काही केले नाही, तरी २०२३ या वर्षी हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे, हे ज्ञात असल्याने हल्लीच्या उन्नतांना त्या संदर्भात काही करावेसे वाटत नाही. २. सर्व … Read more

श्रीकृष्ण पाठीराखा आहे, या श्रद्धेमुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना कोणाचेही भय वाटत नाही !

विरोध करणार्‍या बलाढ्य हिंदुत्ववादी संघटना, पोलीस, सरकार आणि धर्मांध यांची सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे साधक आणि कार्यकर्ते यांना भीती वाटत नाही; कारण श्रीकृष्ण पाठीराखा आहे, अशी त्यांंची श्रद्धा आहे; कारण भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, न मे भक्तः प्रणश्यति । (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्‍लोक ३१), म्हणजे माझ्या भक्ताचा नाश होत नाही. २००८ या … Read more

प.पू. डॉक्टरांना कार्यासाठी गुरुपरंपरेचे साहाय्य होणे !

५.१.२०१५ पासून प्रतिदिन पूजा केल्यावर प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांना नमस्कार करतांना माझ्याकडून त्यांचे गुरु श्री अनंतानंद साईश आणि श्री अनंतानंद साईश यांचे गुरु श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद यांनाही नमस्कार होऊ लागला. प.पू. रामानंद महाराज यांनी देहत्यागापूर्वी ७ वर्षे माझा मृत्यूयोग टाळणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी अनेक अनुष्ठाने केली होती. श्री … Read more

साधू-संतांनी हिमालयात खडतर तपश्‍चर्या करण्याची कारणे

अनेक साधू-संतांनी हिमालयात खडतर तपश्‍चर्या केल्याचे वाचनात येते. ते वाचून मला वाटायचे, तपश्‍चर्येसाठी एकांत हवा असेल, तर हिमालयात कशाला जायला पाहिजे ? गावाबाहेर जाऊन ते तपश्‍चर्या का करत नाहीत ? याचे पुढील उत्तर लक्षात आले. १. हिमालय सात्त्विक आहे. त्यामुळे साधनेसाठीचा परिसर शुद्ध करण्यासाठी साधनेचा व्यय होत नाही. २. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मला त्या प्रश्‍नाचे … Read more

एखाद्या धार्मिक कृतीपेक्षा संतांच्या सांगण्यानुसार केलेली तीच कृती अधिक महत्त्वाची !

काही वेळा एखादे संत पूजा, पठण इत्यादी करायला सांगतात. त्यांनी सांगितलेली साधना एखादा आधीपासूनच करत असला, तर त्याला वाटते, मी हे करतच आहे. त्याने लाभ झाला नाही, तर आता तेच करून लाभ कसा होईल ? त्याने हे लक्षात घेतले पाहिजे की, त्या कृतींपेक्षा त्या करण्यास सांगणार्‍या संतांचा संकल्प कृती करतांना कार्यरत होतो. त्यामुळे फलप्राप्ती होते. … Read more

मायेपासून दूर जाणे एक वेळ सुलभ आहे; पणमायेतील ब्रह्माची अनुभूती घेणे संतांनाही अती कठीणअसल्याने भगवंताला अवतार घ्यावा लागतो !

साधना करून कुंडलिनीला मूलाधारचक्रापासून ब्रह्मरंध्रापर्यंत नेणे, म्हणजेच सगुणातून निर्गुणाकडे जाणे एक वेळ सुलभ आहे; पण सगुणातील राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी ब्रह्मरंध्रापासून परत मूलाधारचक्रापर्यंत येणे बहुतेक संतांनाही अती कठीण जाते. ज्या सगुणाला सोडून निर्गुणाकडे जाण्यासाठी त्यांनी साधना केली, त्या सगुणाकडे पुन्हा जाण्यास ते तयार नसतात आणि म्हणूनच भगवंताला अवतार घ्यावा लागतो. हे व्यष्टी साधना … Read more