प्रत्येकात भगवंताला शोधण्यासाठी करावयाच्या कृती !

मनाला सातत्याने वळण लावून आत्म्याशी अनुसंधानित करण्याचे प्रयत्न करावा. प्रत्येक कृती, उदा. चालणे, बोलणे, पहाणे आत्म्याशी अनुसंधानित करावी. स्वतः करतो, अशी जाणीव असल्यास कृती करतांना थकवा येतो; मात्र अनुसंधानित कृतीमुळे थकवा येत नाही. – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.८.२०१४)

कर्मातून (सेवेतून) आनंद अनुभवणे

प्रत्येक कृती आपल्या नकळत होत असते, उदा. डोळ्यांनी पहाणे, लिहिणे. त्या आत्मस्वरूप भगवंताकडून चालूच असतात. तोच सर्व अवयवांकडून करवून घेत असतो. त्यामुळे जिवाला अन्य काही करावे लागत नाही. त्यामुळे मन / वृत्ती आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करावी. हे साध्य होण्यासाठी पुढील कृती कराव्या. १. सातत्याने कृतज्ञता व्यक्त करावी. २. प्रार्थना करावी. ३. कृती परिपूर्ण करण्याचा प्रयत्न … Read more

आत्मज्ञान

जे अज्ञात आहे, म्हणजे सध्या ज्ञात नाही, आठवत नाही, असे आत्मज्ञान सत्संग, सेवा यांद्वारे तात्पुरते आवरण निघाल्यामुळे (तात्पुरते) प्राप्त झाल्यासारखे वाटते. हे आवरण कायमस्वरूपी काढण्याचा प्रयत्न येथे (आश्रमात) चालू आहे, उदा. संगणकाच्या हार्ड-डिस्कमध्ये माहिती आहे; मात्र ती त्याविषयी माहिती नसणार्‍याला अज्ञात आहे. जेव्हा आपण योग्य कळ दाबतो, आज्ञा देतो, तेव्हा ती प्रकट होते, दृश्य स्वरूपात … Read more

साधना

वेद म्हणतात, तो (भगवंत) बृहद् झाला आहे. भगवंत विविध रूपांतून प्रकट होतो. माझ्या साहाय्यासाठी सर्व वस्तू आणि प्राणी आहेत. पहाण्याची दृष्टी पालटली पाहिजे. भगवंत माझ्यामधून कार्य करतो. माझी स्तुती ही भगवंताची स्तुती आहे; म्हणून त्याची बदनामी होऊ नये, असे वागणे म्हणजे साधना होय. – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.८.२०१४)

सजीव-निर्जीव प्रत्येकात भगवंताला शोधणे

प्रत्येकाच्या मुळाचा शोध घेतला असता भगवंताचे अस्तित्व लक्षात येते, उदा. हात-तोंड पुसण्यासाठी वापरण्यात येणार्‍या रुमालाचे मूळ कापूस आहे, कापसाचे मूळ झाड आहे, झाडाचे मूळ बी आहे आणि या बीचे मूळ भगवंत आहे. रुमालातील भगवंत आपल्यातील भगवंताचे तोंड पुसतो, म्हणजे त्याची सेवा करतो. लेखणीतील भगवंत लिखाणाची सेवा करतो, अशा प्रकारे विचारप्रक्रिया ठेवल्यास आपले अस्तित्वच नष्ट होते. … Read more

भगवंताच्या अनुसंधानाचे महत्त्व !

घरात सर्व विद्युत जोडणी केली; मात्र पंखा चालू करण्यासाठी कळ दाबली नाही, तर पंखा चालू होणार नाही. तद्वतच सेवा केली; मात्र भगवंताशी अनुसंधानच ठेवले नाही, तर सेवेचा लाभ मिळणार नाही. ही कळ म्हणजे नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता. त्यांचा उपयोग करावा. – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.८.२०१४)

स्वेच्छा, परेच्छा किंवा ईश्‍वरेच्छा याप्रमाणे वागणे

हे शब्द साधनेच्या संदर्भात आहेत, हे लक्षात न घेता एका साधकाने बायकोच्या साधनेला असलेल्या विरोधाला परेच्छा समजून साधना करणे बंद केले. एका जिज्ञासूने विचारले, मित्राने दारू पिण्याचा आग्रह केल्यास परेच्छा म्हणून दारू प्यायची का ? येथे लक्षात घेतले पाहिजे की, अशा वेळी परेच्छेऐवजी ईश्‍वरेच्छा काय असेल ?, याचा विचार करावा. ईश्‍वर कधी साधना करू नको … Read more

सनातन संस्थेच्या साधकांची जलद आध्यात्मिक प्रगती होण्याचे कारण

बर्‍याच जणांना आश्‍चर्य वाटते की, फक्त सनातनचे अनेक साधक जलद गतीने प्रगती कशी करतात ? त्यांच्यापैकी अनेकजण संत कसे होतात ? यांचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे. १. इतरत्र शिकवतात, तशी वर्षानुवर्षे केवळ तात्त्विक माहिती सनातनमध्ये सांगण्यात येत नाही, तर प्रत्यक्ष साधना करण्याच्या कृती शिकवण्यात येतात. २. सर्वांना एकच साधना न सांगता व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग … Read more

सांप्रदायिकांनो, आपल्या संप्रदायाचा अहंकार सोडा, तरच प्रगती होईल !

हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनो, इतर संघटनाही आपल्याच आहेत, हा दृष्टीकोन ठेवा, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होईल ! अनेक सांप्रदायिकांना आपल्या संप्रदायाचा अहंकार असतो. इतर सर्व संप्रदाय तुच्छ आहेत, असे त्यांना वाटते. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, विविध संप्रदाय हे भवरोगातून मुक्त व्हायचे, ईश्‍वरप्राप्तीचे विविध मार्ग आहेत. रोगापासून मुक्त होण्यासाठी ज्याप्रमाणे निरनिराळी … Read more

संत नको म्हणत असतांना त्यांना आपल्या स्वेच्छेने नमस्कार करणे अयोग्य

मी कोणाकडून नमस्कार करून घेत नाही; कारण मला मी प.पू. भक्तराज महाराज यांचा शिष्य आहे, याची सतत जाणीव असते. हे सनातनच्या साधकांना ज्ञात आहे; मात्र भेटायला येणारे नको म्हटले, तरी नमस्कार करतात. त्या नमस्कारावरून ते स्वेच्छेने भावनेपोटी नमस्कार करत असल्याचे लक्षात येते; कारण साधनेत असलेला आपल्यापेक्षा साधनेत पुढे असलेल्याचे आज्ञापालन करतो, म्हणजेच परेच्छेने वागतो. – … Read more