तन, मन आणि धन यांच्या त्यागांपैकी धनाचा त्याग करणे सर्वांत कमी कष्टदायक !

याचे कारण हे की, त्यात आपल्याकडचे पैसे किंवा कागदावर सही करून ते कागद द्यायचे असतात. याला विशेष श्रम करावे लागत नाहीत. याउलट तनाचा त्याग करण्यासाठी वर्षानुवर्षे सेवा करावी लागते आणि मनाचा त्याग करण्यासाठी नामजप करणे, तसेच स्वभावदोष निर्मूलनासाठीच्या स्वयंसूचना देणे, हेही वर्षानुवर्षे करावे लागते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आग लागू नये याची काळजी न घेता आग सर्वत्र लागल्यावर…

आग लागू नये याची काळजी न घेता आग सर्वत्र लागल्यावर पाणी शिंपडणे जसे मूर्खपणाचे आहे, तसेच साधना न शिकवता विविध माध्यमांतून भ्रष्टाचार, गुंडगिरी, अनैतिकता इत्यादी पसरू द्यायचे आणि नंतर काहीतरी केले, असे दाखवायचे, ही आहे विविध राज्यकर्त्या पक्षांची कार्यपद्धत ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

दिसेल ते कर्तव्य, भोगीन ते प्रारब्ध आणि घडेल ते कर्म.

भावार्थ : व्यवहारातील कर्म हे कर्तव्य म्हणून केले पाहिजे. त्यातील मायेत गुरफटले जाता कामा नये. ज्याच्या त्याच्या भाग्याने जे व्हायचे, तेच होते; परंतु मायेत न पडता व्यवहाराप्रमाणे आपापली पुढे येणारी कर्मे कर्तव्य म्हणून केली पाहिजेत. (संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

साधनेच्या संदर्भात तन-मन-धनाच्या त्यागांपैकी धनाचा त्याग सर्वांत कनिष्ठ !

धनाचा त्याग त्याग करणे बहुतेकांना कठीण वाटते; कारण आपली भविष्यकाळातील काळजी धनच घेईल, असे त्यांना वाटते. साधनेच्या संदर्भात तन-मन-धनाच्या त्यागांपैकी धनाचा त्याग सर्वांत कनिष्ठ आहे; कारण त्याच्यामुळे स्वभावदोष निर्मूलन होत नाही, म्हणजेच मनाचा त्याग होत नाही. उलट धनाचा त्याग केल्यामुळे अहं वाढतो. त्यामुळे तनाचा त्याग करणे, म्हणजे सेवा करणे, हेही अशक्य होते. यासंदर्भातील एक अनुभव … Read more

युगांनुसार व्यष्टी अन् समष्टी साधनेचे प्रमाण आणि कलियुगात समष्टी साधनेचे महत्त्व

साधनेचा प्रकार सत्ययुग त्रेतायुग द्वापरयुग कलियुग १. व्यष्टी साधनेचे प्रमाण (टक्के) १०० ७० ५० ३० २. समष्टी साधनेचे प्रमाण (टक्के) ० ३० ५० ७० एकूण १०० १०० १०० १०० सत्ययुगात प्रत्येक जण साधना करणारा असल्यामुळे समष्टी साधनेची, म्हणजे समाजात जाऊन साधनेचे महत्त्व सांगणे, साधना करवून घेणे इत्यादींची आवश्यकता नव्हती. पुढे त्रेतायुग आणि द्वापरयुग यांत व्यष्टी … Read more

काळजी म्हणजे भगवंतावर अश्रद्धा !

‘आईच्या पोटात असतांना आपली काळजी कोण घेत होते ?’ सहा मासांचे (महिन्यांचे) असतांना दूध मिळेल का ? याची काळजी होती का ? मग आता का आहे ? आतापर्यंतचे आयुष्य एका क्षणात गेले. मग पुढील १० वर्षांची काळजी कशाला ? कोणत्याही प्रकारची काळजी करणे म्हणजे श्रीकृष्णावरील अश्रद्धा होय. काळजी आणि चिंता आपल्याला मागे खेचते. आजपर्यंत इतके … Read more

आत्मशक्तीवर शारीरिक क्षमता अवलंबून असणे

‘आमची क्षमता शरिरावर नाही, तर आत्म्यावर आहे. आत्मानुसंधानाने ईश्‍वरी शक्ती मिळते. अर्जुनाकडे शक्ती होती; पण श्रीकृष्णाने आत्मशक्ती दिल्यावर तो लढू शकला.’ – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.७.२०१४)

आवरण वाढण्याची कारणे आणि उपाय

स्वस्तुतीने आवरण वाढते, तर ईश्‍वराची स्तुती केल्याने आवरण घटते. आत्मानुसंधानात न राहिल्याने आपल्याभोवती त्रासदायक आवरण वाढते. त्यामुळे आत्मशक्ती उणावते (बॅटरीतील वीज न्यून होते). सतत आत्मानुसंधानात रहाणे, हाच यावरील उपाय आहे. – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.(१५.७.२०१४)

वेळ न मिळणे

जे व्यय (खर्च) करायचे आहे, ते तुम्ही गोळा (जमा) करता व जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता. याउलट कसे करायचे ते शिका. भावार्थ :‘जे व्यय करायचे आहे, ते तुम्ही गोळा करता’ म्हणजे पैसा गोळा करता आणि ‘जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता’ म्हणजे साधना करण्याचा बहुमूल्य वेळ वाया घालविता. ‘याउलट कसे करायचे ते … Read more

मायेचा वापर माध्यम म्हणून करावा !

मायेचा वापर माध्यम म्हणून, म्हणजे सध्याच्या ‘वापरा आणि फेकून द्या’ (युज अ‍ॅयण्ड थ्रो) या पद्धतीने करायचा. त्यात बद्ध झाल्यास विकार वाढून दोष निर्माण होतात. – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.८.२०१४)