भावस्थिती निर्माण करण्याचे महत्त्व

आरंभीच्या स्थितीला श्रीकृष्णाच्या अनुसंधानात रहाण्यासाठी त्याच्याशी खेळणे, बोलणे इत्यादी ठीक आहे; पण पुढच्या टप्प्यात नामजप करणे अधिक योग्य ! याचे कारण श्रीकृष्णाशी बोलतांना पुष्कळ शब्दांचा वापर केला जातो, तर नामजपात केवळ चार-पाच शब्दच येतात. अनेकातून एकात जाणे, हे आपले ध्येय आहे. त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे भावाच्या स्थितीत रहाणे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राची स्थापना काळमहिम्यानुसार होणारच असली, तरी त्या कार्यात सहभागी होणे, म्हणजे स्वतःची साधना होय !

१०.५.२०१५ या दिवशी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी माझ्या संदर्भात सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचन केले. तेव्हा त्यांनी पुढे हिंदु राष्ट्र होणार आहे, असे सांगितले. यासंदर्भात काही जणांच्या मनात प्रश्‍न आला, हिंदु राष्ट्र होणारच आहे, तर आपण प्रयत्न कशाला करायचे ?, याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे, श्रीकृष्णाने जेव्हा केवळ उजव्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला, तेव्हा गोप-गोपींनी पर्वताला … Read more

संतांचे बोलणे परिणामकारक असणे, तर कीर्तनकार आणि प्रवचनकार बोलणे परिणामकारक नसणे

याचे कारण हे की, तन-मन-धनाच्या त्यागामुळे संतांच्या वाणीत चैतन्य असते, तर कीर्तनकार आणि प्रवचनकार यांचा कसलाही त्याग नसल्यामुळे, उलट धनाची अपेक्षा ठेवून कीर्तन आणि प्रवचन केल्यामुळे त्यांच्या वाणीत चैतन्य नसते. यामुळे त्यांचे बोलणे परिणामकारक नसते. – (प.पू.) (परात्पर गुरु) डॉ. आठवले गीतेवर प्रवचन करणार्‍यांनो, तिचे महत्त्व सांगणार्‍यांनो, अर्जुनाच्या एक शतांश असा एक तरी धर्मयोद्धा आयुष्यात … Read more

निराशा आणि वैराग्य

निराशा आणि वैराग्य या दोन्हींमध्ये कशात गोडी वाटत नाही; मात्र निराशेत मनाला वाईट वाटते, तर वैराग्यात जिवाला आनंद वाटतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

स्वभावदोष निर्मूलनाचे महत्त्व

स्वभावदोष निर्मूलन हे नामजपापेक्षा आणि सेवेपेक्षा महत्त्वाचे आहे; कारण ते झाले, तरच व्यष्टी साधनेतील नामजप आणि समष्टी साधनेतील सेवा योग्य तर्‍हेने होऊ शकते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कठीण समय येता कोण कामास येतो ?

मानव आणि ईश्‍वर यांच्यातील विविध कार्यांसंदर्भातील भिन्नता आणि ईश्‍वराचे श्रेष्ठत्व कार्याचे स्वरूप मानव ईश्‍वर १. वैद्यकीय रोगापासून सुटका भवरोगापासून (जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून) सुटका २. लेखा (अकाऊंट) कशाचा ? पैशांचा पाप-पुण्याचा ३. बांधकाम इमारती इत्यादी साधनेचे ४. न्याय मिळेल याची खात्री नसणे १०० टक्के खात्री ५. फलप्राप्ती दुःखनिवारण आणि सुख आनंद – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सांप्रदायिक साधनेमुळे अहंभाव निर्माण होऊ शकण्याचे कारण

एखादा ध्यानमार्गाने साधना करणारा असल्यास त्याला काही तास ध्यान लावू शकणार्‍याची साधना चांगली आहे, असे वाटते. एखाद्याचा भाव जागृत होत असला, तरी त्याला तो कनिष्ठच वाटतो. असे होऊ नये म्हणून कोणाचा आध्यात्मिक स्तर किती आहे, हे कळण्यासाठी विविध योगमार्गांचा थोडातरी अभ्यास असणे आणि सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. – डॉ. आठवले

देवाकडे काही मागणे किंवा न मागणे

१. देवाकडे काही मागणे : आपली पात्रता असल्याशिवाय देव काही देत नाही. असे असतांना देवाला प्रार्थना कशाला करायची ?, असे काही जणांना वाटते. याचे उत्तर असे की, प्रार्थनेमुळे नम्रता निर्माण होण्यास साहाय्य होते. प्रार्थनेच्या जोडीला इतर साधना केल्यास पात्रता निर्माण होते. मग देव पाहिजे ते देतो. २. देवाकडे काही न मागणे : पात्रता असलेले देवाकडे … Read more

साधकांनो, चारही वर्णांनुसार साधना करता येत नाही; म्हणून दुःख करू नका !

धर्मरक्षणाचे वर्णानुसार (जातीनुसार नव्हे !) पुढील चार प्रकार आहेत. वर्ण साधना श्रीकृष्णाने सर्वांसमोर ठेवलेल्या चारही वर्णांनुसारच्या साधनेची उदाहरणे १. ब्राह्मण अध्यात्माचे अध्ययन आणि अध्यापन गुरुगृही शिक्षण घेणे २. क्षत्रिय धर्मरक्षण अनेक दुर्जनांचा नाश करणे ३. वैश्य धर्मासाठी धनाचे अर्पण सुदाम्याचे दारिद्य्र दूर करणे ४. शूद्र धर्मसेवेसाठी शरीर अर्पण पांडवांच्या राजसूय यज्ञाच्या वेळी उष्ट्या पत्रावळी उचलणे … Read more

व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार, म्हणजेच स्वेच्छा. याउलट साधनेत स्वेच्छा नष्ट करून…

व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार, म्हणजेच स्वेच्छा. याउलट साधनेत स्वेच्छा नष्ट करून प्रथम परेच्छेने आणि पुढे ईश्‍वरेच्छेने वागून मायेच्या बंधनात न रहाता खरे स्वातंत्र्य उपभोगता येते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले शिकवण्यापेक्षा शिकण्यात अधिक ज्ञान मिळाल्याचा आनंद असतो, तसेच शिकवतांना अहं वाढू शकतो, तर शिकतांना न्यून होत असल्यामुळेही आनंद मिळतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले