निराशा आणि वैराग्य

निराशा आणि वैराग्य या दोन्हींमध्ये कशात गोडी वाटत नाही; मात्र निराशेत मनाला वाईट वाटते, तर वैराग्यात जिवाला आनंद वाटतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

स्वभावदोष निर्मूलनाचे महत्त्व

स्वभावदोष निर्मूलन हे नामजपापेक्षा आणि सेवेपेक्षा महत्त्वाचे आहे; कारण ते झाले, तरच व्यष्टी साधनेतील नामजप आणि समष्टी साधनेतील सेवा योग्य तर्‍हेने होऊ शकते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कठीण समय येता कोण कामास येतो ?

मानव आणि ईश्‍वर यांच्यातील विविध कार्यांसंदर्भातील भिन्नता आणि ईश्‍वराचे श्रेष्ठत्व कार्याचे स्वरूप मानव ईश्‍वर १. वैद्यकीय रोगापासून सुटका भवरोगापासून (जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून) सुटका २. लेखा (अकाऊंट) कशाचा ? पैशांचा पाप-पुण्याचा ३. बांधकाम इमारती इत्यादी साधनेचे ४. न्याय मिळेल याची खात्री नसणे १०० टक्के खात्री ५. फलप्राप्ती दुःखनिवारण आणि सुख आनंद – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सांप्रदायिक साधनेमुळे अहंभाव निर्माण होऊ शकण्याचे कारण

एखादा ध्यानमार्गाने साधना करणारा असल्यास त्याला काही तास ध्यान लावू शकणार्‍याची साधना चांगली आहे, असे वाटते. एखाद्याचा भाव जागृत होत असला, तरी त्याला तो कनिष्ठच वाटतो. असे होऊ नये म्हणून कोणाचा आध्यात्मिक स्तर किती आहे, हे कळण्यासाठी विविध योगमार्गांचा थोडातरी अभ्यास असणे आणि सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. – डॉ. आठवले

देवाकडे काही मागणे किंवा न मागणे

१. देवाकडे काही मागणे : आपली पात्रता असल्याशिवाय देव काही देत नाही. असे असतांना देवाला प्रार्थना कशाला करायची ?, असे काही जणांना वाटते. याचे उत्तर असे की, प्रार्थनेमुळे नम्रता निर्माण होण्यास साहाय्य होते. प्रार्थनेच्या जोडीला इतर साधना केल्यास पात्रता निर्माण होते. मग देव पाहिजे ते देतो. २. देवाकडे काही न मागणे : पात्रता असलेले देवाकडे … Read more

साधकांनो, चारही वर्णांनुसार साधना करता येत नाही; म्हणून दुःख करू नका !

धर्मरक्षणाचे वर्णानुसार (जातीनुसार नव्हे !) पुढील चार प्रकार आहेत. वर्ण साधना श्रीकृष्णाने सर्वांसमोर ठेवलेल्या चारही वर्णांनुसारच्या साधनेची उदाहरणे १. ब्राह्मण अध्यात्माचे अध्ययन आणि अध्यापन गुरुगृही शिक्षण घेणे २. क्षत्रिय धर्मरक्षण अनेक दुर्जनांचा नाश करणे ३. वैश्य धर्मासाठी धनाचे अर्पण सुदाम्याचे दारिद्य्र दूर करणे ४. शूद्र धर्मसेवेसाठी शरीर अर्पण पांडवांच्या राजसूय यज्ञाच्या वेळी उष्ट्या पत्रावळी उचलणे … Read more

व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार, म्हणजेच स्वेच्छा. याउलट साधनेत स्वेच्छा नष्ट करून…

व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार, म्हणजेच स्वेच्छा. याउलट साधनेत स्वेच्छा नष्ट करून प्रथम परेच्छेने आणि पुढे ईश्‍वरेच्छेने वागून मायेच्या बंधनात न रहाता खरे स्वातंत्र्य उपभोगता येते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले शिकवण्यापेक्षा शिकण्यात अधिक ज्ञान मिळाल्याचा आनंद असतो, तसेच शिकवतांना अहं वाढू शकतो, तर शिकतांना न्यून होत असल्यामुळेही आनंद मिळतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

तन, मन आणि धन यांच्या त्यागांपैकी धनाचा त्याग करणे सर्वांत कमी कष्टदायक !

याचे कारण हे की, त्यात आपल्याकडचे पैसे किंवा कागदावर सही करून ते कागद द्यायचे असतात. याला विशेष श्रम करावे लागत नाहीत. याउलट तनाचा त्याग करण्यासाठी वर्षानुवर्षे सेवा करावी लागते आणि मनाचा त्याग करण्यासाठी नामजप करणे, तसेच स्वभावदोष निर्मूलनासाठीच्या स्वयंसूचना देणे, हेही वर्षानुवर्षे करावे लागते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आग लागू नये याची काळजी न घेता आग सर्वत्र लागल्यावर…

आग लागू नये याची काळजी न घेता आग सर्वत्र लागल्यावर पाणी शिंपडणे जसे मूर्खपणाचे आहे, तसेच साधना न शिकवता विविध माध्यमांतून भ्रष्टाचार, गुंडगिरी, अनैतिकता इत्यादी पसरू द्यायचे आणि नंतर काहीतरी केले, असे दाखवायचे, ही आहे विविध राज्यकर्त्या पक्षांची कार्यपद्धत ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

दिसेल ते कर्तव्य, भोगीन ते प्रारब्ध आणि घडेल ते कर्म.

भावार्थ : व्यवहारातील कर्म हे कर्तव्य म्हणून केले पाहिजे. त्यातील मायेत गुरफटले जाता कामा नये. ज्याच्या त्याच्या भाग्याने जे व्हायचे, तेच होते; परंतु मायेत न पडता व्यवहाराप्रमाणे आपापली पुढे येणारी कर्मे कर्तव्य म्हणून केली पाहिजेत. (संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)