साधकांनो, कोणी चुका सांगितल्यास पुढीलपैकी तुम्हाला आवश्यक तो दृष्टीकोन स्वीकारा !

१. वाईट वाटून घेऊ नका ! : एखाद्या वैद्यांनी एखाद्या रुग्णाला त्याच्या आजाराचे निदान सांगितले, तर त्याला आनंद होतो; कारण आता योग्य उपचार होऊन आपण बरे होऊ, अशी त्याला खात्री वाटते. त्याचप्रमाणे एखाद्याला कोणी त्याच्या चुका सांगितल्या, तर त्याला वाईट वाटण्याऐवजी बरे वाटले पाहिजे; कारण आता तो त्या चुकांवर मात करून साधनेत पुढे जाऊ शकतो. … Read more

अध्यात्मात वयाला महत्त्व नसते, तर आध्यात्मिक स्तराला महत्त्व असते !

व्यावहारिक जीवनात आपल्याहून अधिक वयाच्या व्यक्तीला आपण नमस्कार करतो. याउलट अध्यात्मात वयाला महत्त्व नसते, तर आध्यात्मिक स्तराला महत्त्व असते ! लहान वयाच्या संतांनाही मोठ्या व्यक्ती आदराने नमस्कार करतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

याज्ञिकांनो, यज्ञात हविर्द्रव्यांसह, म्हणजे आहुती द्यायच्या वस्तूंसह स्वतःतील अहंभाव आणि…

याज्ञिकांनो, यज्ञात हविर्द्रव्यांसह, म्हणजे आहुती द्यायच्या वस्तूंसह स्वतःतील अहंभाव आणि स्वभावदोष यांचीही आहुती द्या ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

देवघरातील देवांची संख्या

साधनेच्या मार्गानुसार देवघरातील देवांची संख्या पालटते. १. व्यष्टी साधना : व्यष्टी साधना करणार्‍यांना अनेकातून एकात जायचे असते. त्यामुळे त्यांनी देवघरातील देवांची संख्या अल्प करत एकाच देवाच्या मूर्तीची किंवा छायाचित्राची पूजा करावी. कुटुंबातील इतर भक्तीमार्गी असल्यास देवघरात इतर देवांच्या मूर्ती किंवा चित्रे असतात; पण आपण मनातून एकाच देवतेकडे लक्ष द्यावे. २. समष्टी साधना : समष्टी साधना … Read more

संतांच्या तुलनेत राजकारण्यांचे महत्त्व शून्य

राजकारणी जनतेला पैसे देऊन आणि वाहनाची सोय करून सभेला बोलावतात. याउलट संतांकडे आणि धार्मिक उत्सवात न बोलावताही भक्त लाखोंच्या संख्येने येतात आणि पैसे अर्पण करतात ! यावरून संतांच्या तुलनेत ‘राजकारण्यांचे महत्त्व शून्य आहे’, हे लक्षात येईल. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कुठल्याही पुरस्कारापेक्षा ६० टक्के पातळी गाठणे किंवा संत होणे, हे महत्त्वाचे !

पद्मभूषण, राष्ट्रपती पदक, नोबेल प्राइस यांपेक्षा ६० टक्के पातळी गाठणे किंवा संत होणे, हे अधिक महत्त्वाचे आहे; कारण त्यामुळे व्यक्ती जन्म-मृत्यूच्या चक्रांतून सुटते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पूर्ण वेळ साधक होता येत नाही; म्हणून खंत करणार्‍यांनो, घरी राहूनही साधना करता येते, हे लक्षात घ्या !

काही जणांना पूर्ण वेळ साधना करण्याची तीव्र इच्छा असते; पण घरी आई-वडिलांना पहाणारे कोणी नसते किंवा आर्थिक स्थिती चांगली नसते. त्यामुळे ते पूर्ण वेळ साधक होऊ शकत नाहीत. अशांनी पूर्ण वेळ साधना करता येत नाही, अशी खंत करण्यापेक्षा आई-वडिलांची सेवा मायेच्या नात्याने न करता त्यांच्याकडे गुरुरूप म्हणून पाहून सेवा केल्यास साधना होते. श्रावणबाळाने आई-वडिलांची सेवा … Read more

साधनेचा पाया असल्यामुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना कार्यात यश मिळणे, तर इतर हिंदुत्ववादी संघटनांना विशेष यश न मिळणे

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य केवळ १० वर्षांत जगभर पसरले; कारण साधनेमुळे त्यांच्या कार्याला ईश्‍वराचा आशीर्वाद आहे. याउलट इतर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्य फारच थोडे होते; कारण त्या कार्यकर्त्यांकडून साधना करून घेत नाहीत. त्यांच्याकडून जे काही कार्य थोडेफार होते, त्याचा परिणामही अधिक काळ टिकत नाही. त्यामुळे भारत अधोगतीच्या परिसीमेला गेला आहे. – (परात्पर … Read more

आयुष्यभर तीच तीच साधना करू नका !

आयुष्यभर एकच साधना करत राहून साधनेच्या त्याच वर्गात राहू नका. त्याऐवजी जाणकारांना विचारून साधना करत पुढच्या पुढच्या वर्गांत जा आणि अंतीम ईश्‍वरप्राप्ती करा ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

९० टक्क्यांच्या पुढे अद्वैत निर्माण होत असल्याने वासनेचे विचार नष्ट होणे

जोपर्यंत मी आणि अन्य कोणीतरी असे द्वैत आहे, तोपर्यंत वासनेचे विचार येतात. कोणाशीतरी एकरूप व्हायचे आहे, असे वाटत असते; पण ९० टक्क्यांच्या पुढे द्वैत अल्प होऊ लागतेे. मी आणि अन्य कोणी हा भेद रहात नाही. त्यामुळे आपण सर्वजण एकच आहोत, असे वाटत असल्याने वासना रहात नाहीत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले