सर्वसाधारण व्यक्ती, संत आणि पंचमहाभूते

शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, हे सर्वसाधारण व्यक्तीच्या संदर्भात खरे असते; कारण त्यांचे कार्य पंचमहाभूतांच्या स्तरावरचे असते. याउलट संतांचे कार्य शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या स्तरावरचे असल्यामुळे त्याचा संबंध शब्द, स्पर्श, रूप… यांच्याशी नसतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

समष्टी संत

समष्टी संत झाल्यावर देवाशी अनुसंधान अधिक व्यापक प्रमाणात साधले जाते. त्यामुळे समष्टी साधनेत देवाला काय अपेक्षित आहे, हे कळते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले संत अधिकतर तात्त्विक भाग सांगतात, तर गुरु प्रायोगिक भाग शिकवतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

वातावरणातील प्रदूषण रोखण्यासाठी आधी साधनेने वैचारिक प्रदूषण रोखा !

सगळीकडे प्रदूषण, पर्यावरणाची हानी इत्यादी विषयांच्या चर्चा होत असतात. शासनही काही उपाययोजना उद्घोषित करते. हे केवळ वरवरचे असते. प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे मानवाच्या मनातील रज-तमांचे प्रदूषण ! त्यावर उपाय न करता वरवरचे उपाय करणे हास्यास्पद आहे ! मनातील रज-तमाचे प्रदूषण दूर करण्यासाठी सर्वत्रच्या मानवांना साधना शिकवून त्यांच्याकडून ती करवून घेणे, हा एकच उपाय आहे ! … Read more

कर्माचे महत्त्व

कर्माविना तुम्हाला गती नाही; कारण कर्मालाच गती आहे. भावार्थ : दैनंदिन जीवनव्यापार असो, सुखप्राप्तीच्या साधनांचा शोध असो, दुःख टाळण्याचे उपाय असोत… सारी जगरहाटी, सारे विश्‍वचक्र कर्मामुळेच चालते. आध्यात्मिकदृष्ट्याही मनुष्याचा जन्म ही त्याच्यासाठी कर्मभूमीच आहे; कारण मनुष्य कर्म (साधना) करूनच ईश्‍वरप्राप्ती करून घेऊ शकतो. – संत भक्तराज महाराज

समष्टी प्रारब्ध

युगानुसार व्यष्टी आणि समष्टी प्रारब्धाचे प्रमाण : व्यक्तीचा आध्यात्मिक स्तर जितका अधिक असेल, तितके त्या व्यक्तीला समष्टी प्रारब्ध भोगावे लागण्याचे प्रमाण अल्प होत जाते.   युग व्यष्टी प्रारब्ध (प्रमाण – टक्के) समष्टी प्रारब्ध (प्रमाण – टक्के) १. सत्य १०० – २. त्रेता ७० ३० ३. द्वापर ५० ५० ४. कलि अ. आरंभी आ. मध्य इ. … Read more

शिष्यांना शिकवण्याच्या संदर्भात एका संतांचा अहंभाव !

एका संतांनी माझ्याशी बोलतांना शिष्यांना बाहेर जायला सांगितले. तेव्हा मला वाटले, त्यांना काहीतरी खाजगी बोलायचे असेल. बोलतांना खाजगी असे काहीच नव्हते. नंतर शिष्य भेटले. तेव्हा त्यांनी सांगितले, गुरूंनी आज खूप छान सांगितले. मी म्हणालो, मला सांगा. मलाही काही शिकता येईल. शिष्यांनी जे सांगितले, ते मी गुरूंशी बोलतांना त्यांना सांगितलेलेच होते ! असे अहंभावी गुरु शिष्यांचे … Read more

ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग

विश्‍वाची उत्पत्ती कशी झाली, यासंदर्भात ज्ञानयोगात अनेक पाठभेद आहेत; पण ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गांसंदर्भात निरनिराळे मार्ग असले, तरी त्यांत पाठभेद नाहीत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

इतरांना मानसिक किंवा आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणे

मानसिक स्तर वरवरचे तात्कालिक साहाय्य करणारा असतो, तर आध्यात्मिक स्तर अडचण मुळापासून दूर करणारा असतो. हे पुढील उदाहरणावरून लक्षात येईल. १. मानसिक स्तर : भुकेलेल्याला अन्न द्या, असे म्हणणारे मानसिक स्तरावरचे असतात. ते भुकेलेला भुकेला का आहे ?, याचा विचार करत नाहीत. त्यामुळे भुकेल्याला कोणालातरी आयुष्यभर अन्न द्यावे लागते. २. आध्यात्मिक स्तर : साधना कर. … Read more

काही साधकांना सेवा करत नामजप करण्यात आनंद मिळण्याचे कारण

बसून नामजप करण्यापेक्षा काही साधकांना सेवा करत नामजप करण्यात अधिक आनंद मिळतो. याचे कारण म्हणजे जे ध्यानमार्गी असतात, त्यांना बसून नामजप करणे चांगले वाटते. समष्टी साधना करणार्‍यांना सेवा करत नामजप करण्यात अधिक आनंद मिळतो. (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्रेष्ठ कोण संत चोखामेळा कि विद्रोही ?

संत चोखामेळा यांना विठोबाच्या दर्शनासाठी देवळात जाऊ दिले नाही. तेव्हा त्यांनी विद्रोहींसारखा हट्ट केला नाही. त्यांच्या भक्तीमुळे विठोबाने त्यांना स्वतःच्या गळ्यातला हार दिला. श्रेष्ठ कोण संत चाेखामेळा कि विद्रोही ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले