कर्माचे महत्त्व
कर्माविना तुम्हाला गती नाही; कारण कर्मालाच गती आहे. भावार्थ : दैनंदिन जीवनव्यापार असो, सुखप्राप्तीच्या साधनांचा शोध असो, दुःख टाळण्याचे उपाय असोत… सारी जगरहाटी, सारे विश्वचक्र कर्मामुळेच चालते. आध्यात्मिकदृष्ट्याही मनुष्याचा जन्म ही त्याच्यासाठी कर्मभूमीच आहे; कारण मनुष्य कर्म (साधना) करूनच ईश्वरप्राप्ती करून घेऊ शकतो. – संत भक्तराज महाराज