वाचकसंख्या वाढावी यासाठी सनातन प्रभातमध्ये लेख आणि सदरे छापत नाहीत,…

वाचकसंख्या वाढावी यासाठी सनातन प्रभातमध्ये लेख आणि सदरे छापत नाहीत, तर वाचकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली व्हावी, तसेच राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यास त्यांना दिशा मिळावी, यांसाठी असतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

म्हातारपण मुलामुळे नाही, तर साधनेमुळे आनंदात जाते !

म्हातारपण मुलामुळे नाही, तर साधनेमुळे आनंदात जाते ! : मुलावर गर्भधारणेपासून साधनेचा संस्कार न करता त्याला जन्म देणे, त्याचे संगोपन करणे, त्याचा विवाह होईपर्यंत त्याचे सर्व करणे, ही सर्व तन, मन आणि धन यांची चुकीची गुंतवणूक झाल्याचे म्हातारपणी मुलाने लाथाडल्यावर आई-वडिलांच्या लक्षात येते. एवढ्या मोठ्या गुंतवणुकीतून ही प्राप्ती झाल्यावर पश्‍चात्ताप करण्यापेक्षा ईश्‍वरप्राप्तीसाठी तन, मन आणि … Read more

दुर्जनांच्या कृतीविरूद्ध आपण काही करू शकत नसल्याने त्याचे वाईट वाटून…

दुर्जनांच्या कृतीविरूद्ध आपण काही करू शकत नसल्याने त्याचे वाईट वाटून घेऊ नका, तर साधना करा. दुर्जनांच्या पापाचा घडा भरल्यावर देव त्यांना कठोर शिक्षा करणारच आहे. तोपर्यंत साधनेने तुमचे रक्षण होईल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संतांच्या दर्शनाने काहीतरी चांगले वाटणे किंवा काहीच न वाटणे :…

संतांच्या दर्शनाने काहीतरी चांगले वाटणे किंवा काहीच न वाटणे : एखाद्या संतांकडे गेल्यावर काही जणांना खूप चांगले वाटते किंवा त्यांचा भाव जागृत होतो, तर काही जणांना काहीच वाटत नाही. त्यातील काही जणांना काहीच न वाटल्यामुळे वाईटही वाटते. अनुभूती येणे किंवा न येणे याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. १. संतांच्या स्थूलदेहाकडे लक्ष जाणे : साधनेच्या आरंभी फक्त … Read more

स्वतःच्या चुका स्वीकारणे आणि त्या सांगणे, हे अहं-निर्मूलनाच्या संदर्भात प्रथम…

स्वतःच्या चुका स्वीकारणे आणि त्या सांगणे, हे अहं-निर्मूलनाच्या संदर्भात प्रथम पाऊल आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विज्ञान केवळ स्थूल पंचज्ञानेंद्रियांच्या संदर्भात संशोधन करते, तर अध्यात्म स्थूल…

विज्ञान केवळ स्थूल पंचज्ञानेंद्रियांच्या संदर्भात संशोधन करते, तर अध्यात्म स्थूल आणि सूक्ष्मच नव्हे, तर सूक्ष्मतर, सूक्ष्मतमाचाही विचार करते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांसाठी काही न करणा-या जन्महिंदूंना,…

साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांसाठी काही न करणार्‍या जन्महिंदूंना, म्हणजे ५० प्रतिशत हिंदूंना पुढे येणार्‍या आपत्काळात, म्हणजे तिसर्‍या महायुद्धाच्या काळात साहाय्य करून वाचवू नका; कारण हिंदु राष्ट्रात, म्हणजे रामराज्यात रहाण्यासाठी ते लायक नसतील ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सर्वसाधारण व्यक्ती, संत आणि पंचमहाभूते

शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, हे सर्वसाधारण व्यक्तीच्या संदर्भात खरे असते; कारण त्यांचे कार्य पंचमहाभूतांच्या स्तरावरचे असते. याउलट संतांचे कार्य शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या स्तरावरचे असल्यामुळे त्याचा संबंध शब्द, स्पर्श, रूप… यांच्याशी नसतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

समष्टी संत

समष्टी संत झाल्यावर देवाशी अनुसंधान अधिक व्यापक प्रमाणात साधले जाते. त्यामुळे समष्टी साधनेत देवाला काय अपेक्षित आहे, हे कळते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले संत अधिकतर तात्त्विक भाग सांगतात, तर गुरु प्रायोगिक भाग शिकवतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

वातावरणातील प्रदूषण रोखण्यासाठी आधी साधनेने वैचारिक प्रदूषण रोखा !

सगळीकडे प्रदूषण, पर्यावरणाची हानी इत्यादी विषयांच्या चर्चा होत असतात. शासनही काही उपाययोजना उद्घोषित करते. हे केवळ वरवरचे असते. प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे मानवाच्या मनातील रज-तमांचे प्रदूषण ! त्यावर उपाय न करता वरवरचे उपाय करणे हास्यास्पद आहे ! मनातील रज-तमाचे प्रदूषण दूर करण्यासाठी सर्वत्रच्या मानवांना साधना शिकवून त्यांच्याकडून ती करवून घेणे, हा एकच उपाय आहे ! … Read more