भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करण्याचे महत्त्व

‘कोणतीही कृती परिपूर्ण केली, तर ती एकप्रकारे साधनाच होते’, हा कर्मसिद्धांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना शिकवला आहे. सेवा भावपूर्ण केली, तरच ती परिपूर्ण होऊ शकते. अशी सेवा केल्याने आपण गुरूंचे मन लवकर जिंकू शकतो. गुरूंचे मन जिंकले की, गुरुकृपा लवकर होऊन अध्यात्मात शीघ्र प्रगती होते. परिपूर्ण सेवा केल्याने साधक अव्यक्त भावाच्या टप्प्याला लवकर … Read more

भगवंताच्या दृष्टीत समत्व असते !

‘भगवंताच्या दृष्टीत समत्व असते. त्याच्यात भेद नसतो. तो मुखवट्याकडे (शरिराकडे / स्थूलदेहाकडे) पहात नाही. त्यातील आत्मतत्त्वाला पहातो. यासाठी बोलतांना आपण मुखवटे (स्थूलदेह) बाजूला करून बोलले पाहिजे. आत्मस्वरूपाशी बोलले पाहिजे; कारण मुखवट्यामध्ये विकार असतात.’ ‘जग तमोगुणी झाल्यामुळे तमोगुणानेच त्याला उत्तर दिले पाहिजे.’ – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.४.२०१५)

देवतांचा आदर्श ठेवून संकटांना पुरून उरूया !

‘शिवाला प्राप्त करून घेण्यासाठी देवी सतीला अनेक संकटांचा सामना करावा लागला. प्रभु श्रीरामाला १४ वर्षे खडतर वनवास भोगावा लागला. बालपणातच श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी कंसाने आणि हनुमानाचा वध करण्यासाठी रावणाने अनेक असुरांना त्यांच्यावर धाडले. संकटे तर देवतांनाही चुकली नाहीत; पण देवता या सार्‍या संकटांना पुरून उरल्या. संकटांतच आपली श्रद्धा, धैर्य, संयम आणि विवेक यांची खरी परीक्षा … Read more

पूर्णस्वरूप श्रीकृष्णाशी एकरूप होण्यासाठी सातत्याने करत असलेले प्रयत्न म्हणजेच साधना ! – प.पू. पांडे महाराज

या विश्‍वात श्रीकृष्णाविना दुसरे काहीच नाही; म्हणून तो अनन्य आहे. अशा शाश्‍वत तत्त्वाशी एकरूप होऊन त्याच्या पूर्ण तत्त्वाशी संलग्न होणे, म्हणजे साधना. तो आणि मी, माझा जीव आणि ते शिवस्वरूप एक होण्यासाठी सतत त्याचे चिंतन करावे. जीवनातील प्रत्येक कर्म त्याच्या अनुसंधानात राहून करावे. प्रत्येक कार्य आणि कृती त्याची भावपूर्ण सेवा करत आहे, हा भाव ठेवून … Read more

साधना करण्यासंदर्भातील स्वेच्छा ही स्वेच्छा नसून ईश्‍वरेच्छाच असणे !

साधनेत सांगतात, स्वेच्छा नको. प्रथम सर्व परेच्छेने करण्यास शिका. नंतर ईश्‍वरेच्छा काय आहे ते कळेल आणि त्यानुसार सर्व करा. असे जरी असले, तरी साधना करण्यासाठी नोकरीच काय, तर घरदारही सोडण्याचा विचार करण्याची स्वेच्छा झाली, तरी ती योग्यच आहे. ही स्वेच्छा नसून ईश्‍वरेच्छाच असते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१.११.२०१६)

साधनेत आपली स्वेच्छा नष्ट करून सर्व ईश्‍वरेच्छेने करायचे, असे करता…

साधनेत आपली स्वेच्छा नष्ट करून सर्व ईश्‍वरेच्छेने करायचे, असे करता यायला लागले की, ईश्‍वरप्राप्ती होते. याउलट व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वेच्छेने वागणारे झपाट्याने अधोगतीला जातात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३१.१०.२०१६)

आपल्याला जेव्हा इतरांच्या दोषांचा राग येतो, तेव्हा त्यांच्याकडे केवळ बाह्यांगाने न पहाता अंतरात्म्याकडे लक्ष देणे आवश्यक असणे

आपल्याला जेव्हा इतरांच्या दोषांचा राग येतो, तेव्हा आपण आपल्यावरील आवरणाकडे लक्ष देत असतो; पण त्याच्यातील कार्य करणार्‍या भगवंताकडे आपले लक्ष नसते. आपण त्यांच्या दोषांशी एकरूप न होता त्यांच्या स्थितीत जाऊन त्यांना दोष घालवायला कसे साहाय्य करता येईल ?, याचा विचार करायला हवा. आपण त्यांच्याकडे केवळ बाह्यांगाने न पहाता त्यांच्यातील अंतरात्म्याकडे लक्ष द्यायला हवे. – प.पू. … Read more

अध्यात्मातील विविध पातळ्यांना होणा-या त्रासाचे प्रधान स्वरूप, त्रासाचे प्रमाण आणि त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रमाण

आध्यात्मिक पातळी अध्यात्मातील विविध पातळ्यांना होणार्‍या त्रासाचे प्रधान स्वरूप, त्रासाचे प्रमाण आणि त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रमाण : सनातनचे साधक आणि संत तन, मन आणि धन यांचा अधिकाधिक त्याग करत समष्टी साधना करत असतांना त्यांना वाईट शक्तींचा त्रास का होतो ?, असा प्रश्‍न काही जणांच्या मनात निर्माण होतो. त्याचे उत्तर पुढील तक्त्यावरून लक्षात येईल. … Read more

माझे कार्य अधिक प्रमाणात सूक्ष्मातील असल्यामुळे इतर संतांप्रमाणे माझे नाव…

माझे कार्य अधिक प्रमाणात सूक्ष्मातील असल्यामुळे इतर संतांप्रमाणे माझे नाव हिंदूंमध्ये मोठे झाले नाही; पण सूक्ष्माचे अभ्यासक, सूक्ष्म जाणणारे संत आणि महर्षी यांच्यापर्यंत माझे नाव पोचले.

साधकांनो, महर्षींनी प.पू. डॉक्टरांना श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले, असे संबोधण्यास सांगितले…

साधकांनो, महर्षींनी प.पू. डॉक्टरांना श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले, असे संबोधण्यास सांगितले असण्याचा अर्थ लक्षात घ्या ! : सप्तर्षी जीवनाडीतील मजकूर सांगणार्‍या महर्षींनी मला श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले, असे संबोधण्यास सांगितले आहे. साधकांना ही अपूर्व गोष्ट वाटेल. त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, काही संतांना अनंत श्री, असे संबोधतात. त्यांच्या मानाने मी कोठेच नाही, हे लक्षात घ्या !