धर्मशास्त्रानुसार देवतांची उपासना करून चैतन्यशक्ती वाढवा !

‘हिंदूंनो, धार्मिक उत्सव आणि मंदिरे येथे हिडीस नृत्य करणे, दारू पिणे, भ्रष्टाचार करणे इत्यादी अपप्रकार करणे, ही देवतांची विटंबना आहे. ते एक प्रकारचे मूर्तीभंजन आहे. त्यापेक्षा धर्मशास्त्रानुसार देवतांची उपासना करून चैतन्यशक्ती वाढवा.’ – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

स्वामी विवेकानंद यांचे अमूल्य विचारधन

‘आज भारतातून श्रद्धाभाव जवळजवळ लुप्त झाला आहे. एखादा माणूस महान बनतो आणि दुसरा दुबळा रहातो, याचे कारणही श्रद्धाच आहे. माझे गुरुदेव म्हणत, ‘जो स्वत:ला दुबळा समजतो, तो दुर्बळच राहील. पाश्‍चात्त्यांचा स्वत:च्या बाहुबलावर, स्वत:च्या शक्तीवर विश्‍वास आहे. त्यांनी जी ऐहिक प्रगती केली, तो त्यांच्या श्रद्धेचाच परिणाम आहे. तुम्ही जर तुमच्या आत्मबलावर विश्‍वास ठेवलात, तर तुम्ही प्रगती … Read more

आपण जीवनात जितका मोठा संघर्ष करू, तितके ध्येयाच्या अधिक जवळ जाऊ !

हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेच्या कार्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अनेकविध संकटांचा सामना करावा लागला, हे सर्वज्ञातच आहे. लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर आदी देशभक्तांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सोसलेले हाल तर पुष्कळच आहेत. आर्थिक अडचणींमुळे लहानपणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहावाल्याचे काम आणि सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे रंगवण्याचे कामही करावे लागले होते. या सर्व मंडळींनी … Read more

सनातनच्या संपर्कात येऊन याच जन्मात सर्व स्वभावदोष नष्ट करण्याची संधी मिळणे, हे सनातनच्या साधकांचे अहोभाग्य !

‘सहस्रो जन्मांनंतर जेव्हा शुभकर्म उदयास येते, तेव्हा त्या जिवाला स्वतःतील स्वभावदोष जाणून घेण्याची इच्छा उत्पन्न होते. हे जीव सनातनच्या संपर्कात येऊन साधना करून याच जन्मात आपले सर्व स्वभावदोष नष्ट करत आहेत. आणखी काय पाहिजे ?’ – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.३.२०१७)

साधना म्हणजे काय ?

१. ‘लोकांना ‘साधना म्हणजे काय ?’, हे समजले नाही. व्यवहारातील काही न करणे आणि केवळ भगवंताच्या अनुसंधानात रहाणे, एवढेच कार्य करणे म्हणजे साधना ! भगवंतच सर्व करत आहे, करवून घेत आहे, तुम्हाला काहीच करायचे नाही. २. प्रत्येक कर्म ही साधना आहे. ‘प्रत्येक कर्म करतांना साधकाचा प्रत्येक क्षण साधनेत जावा’, हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा … Read more

आश्रमात रहाण्याचे सौभाग्य !

आश्रमात रहातांना भगवंताच्या सतत अनुसंधानात रहाणे अपेक्षित आहे. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी साधकांची साधनेसाठी सोय व्हावी, यासाठी आश्रमाची निर्मिती केली आहे. या आश्रमात रहाण्यासारखे भाग्य कुठे मिळणार नाही. पैसे देऊन एवढे सौभाग्य मिळत नाही. या आश्रमात आपल्याला विनामूल्य सर्व सौभाग्य मिळत आहे. – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

साधकांनो आणि हिंदुत्वनिष्ठांनो, चैतन्यशक्तीला घेऊन साधना करा !

चैतन्य हे खरे कार्य करणारे आहे. (चैतन्यालाच राम किंवा कृष्ण अशी भगवंताची नावे दिली आहेत.) त्याच्या स्मरणात रहाणे, म्हणजे नामस्मरण ! त्याच्याशी सतत संग ठेवणे, म्हणजे सत्संग ! त्याच्या स्मरणात आणि सत्संगात राहून केलेले प्रत्येक कार्य ही सत्सेवा आहे. सत्सेवा झाल्यावर दुर्गुण रहात नाहीत. चैतन्यशक्ती असल्यास अनिष्ट शक्ती कार्य करू शकत नाही. भगवंतच सर्वत्र आहे. … Read more

भावजागृतीचे प्रयत्न नीट जमत नाहीत; म्हणून निराश होऊ नका, तर कर्म आणि ज्ञान या साधनामार्गांनुसार प्रयत्न करा !

‘काही साधकांना सतत भावाच्या अनुसंधानात रहाणे, देवाशी बोलणे इत्यादी भावजागृतीचे प्रयत्न नीट जमत नाहीत; म्हणून निराशा येते. भक्तीमार्गी साधकाला हे प्रयत्न चांगले जमतात; पण कर्ममार्गी आणि ज्ञानमार्गी साधकाला ते भक्तीमार्गी साधकाप्रमाणे जमू शकणार नाहीत. परात्पर गुरु डॉक्टरांनी निर्मिलेला ‘गुरुकृपायोग’ हा सर्व साधनामार्गांना सामावून घेणारा आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गुरुकृपायोगात भक्ती, कर्म आणि ज्ञान या … Read more

आपत्काळात रक्षण होण्यासाठी साधकांनी हनुमंताप्रमाणे नामजप करायला हवा !

‘२१.५.२०१७ या दिवशी महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितले, ‘‘१९.५.२०१७ या दिवशी गुरूंच्या समोर झालेल्या नाडीवाचनात महर्षि म्हणाले, ‘साधकांचा नामजप अल्प पडतो.’ याचा अर्थ काय आहे ? सर्व साधक नामजप तर करतातच. आता तो हनुमंतासारखा व्हायला पाहिजे. त्रेता आणि द्वापर या युगांत हनुमंत होता; पण हनुमंताच्या रोमारोमामध्ये श्रीराम होता. हळूहळू साधकांनी तसा प्रयत्न … Read more

मना-विरुद्ध-नाम, तेच खरे काम !

‘मना’चे उलटे (खरे पहाता हेच सुलटे आहे) केले, तर ‘नाम’ होते. मनाला नामात गुंतवले तर उत्तम. तेच खरे कामास येते. नाम आहे म्हणून मनुष्य आहे. मनाकडे पहाण्याऐवजी, म्हणजेच मनाच्या विकारांना कुरवाळण्याऐवजी नामाकडे लक्ष दिले, तर देवाची कृपा झाल्याशिवाय रहाणार नाही. मन म्हणजे बाळ आणि जीव म्हणजे आई आहे. आई काळजी घेते, तसे जिवाने मनाची काळजी … Read more