सनातनच्या संपर्कात येऊन याच जन्मात सर्व स्वभावदोष नष्ट करण्याची संधी मिळणे, हे सनातनच्या साधकांचे अहोभाग्य !

‘सहस्रो जन्मांनंतर जेव्हा शुभकर्म उदयास येते, तेव्हा त्या जिवाला स्वतःतील स्वभावदोष जाणून घेण्याची इच्छा उत्पन्न होते. हे जीव सनातनच्या संपर्कात येऊन साधना करून याच जन्मात आपले सर्व स्वभावदोष नष्ट करत आहेत. आणखी काय पाहिजे ?’ – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.३.२०१७)

साधना म्हणजे काय ?

१. ‘लोकांना ‘साधना म्हणजे काय ?’, हे समजले नाही. व्यवहारातील काही न करणे आणि केवळ भगवंताच्या अनुसंधानात रहाणे, एवढेच कार्य करणे म्हणजे साधना ! भगवंतच सर्व करत आहे, करवून घेत आहे, तुम्हाला काहीच करायचे नाही. २. प्रत्येक कर्म ही साधना आहे. ‘प्रत्येक कर्म करतांना साधकाचा प्रत्येक क्षण साधनेत जावा’, हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा … Read more

आश्रमात रहाण्याचे सौभाग्य !

आश्रमात रहातांना भगवंताच्या सतत अनुसंधानात रहाणे अपेक्षित आहे. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी साधकांची साधनेसाठी सोय व्हावी, यासाठी आश्रमाची निर्मिती केली आहे. या आश्रमात रहाण्यासारखे भाग्य कुठे मिळणार नाही. पैसे देऊन एवढे सौभाग्य मिळत नाही. या आश्रमात आपल्याला विनामूल्य सर्व सौभाग्य मिळत आहे. – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

साधकांनो आणि हिंदुत्वनिष्ठांनो, चैतन्यशक्तीला घेऊन साधना करा !

चैतन्य हे खरे कार्य करणारे आहे. (चैतन्यालाच राम किंवा कृष्ण अशी भगवंताची नावे दिली आहेत.) त्याच्या स्मरणात रहाणे, म्हणजे नामस्मरण ! त्याच्याशी सतत संग ठेवणे, म्हणजे सत्संग ! त्याच्या स्मरणात आणि सत्संगात राहून केलेले प्रत्येक कार्य ही सत्सेवा आहे. सत्सेवा झाल्यावर दुर्गुण रहात नाहीत. चैतन्यशक्ती असल्यास अनिष्ट शक्ती कार्य करू शकत नाही. भगवंतच सर्वत्र आहे. … Read more

भावजागृतीचे प्रयत्न नीट जमत नाहीत; म्हणून निराश होऊ नका, तर कर्म आणि ज्ञान या साधनामार्गांनुसार प्रयत्न करा !

‘काही साधकांना सतत भावाच्या अनुसंधानात रहाणे, देवाशी बोलणे इत्यादी भावजागृतीचे प्रयत्न नीट जमत नाहीत; म्हणून निराशा येते. भक्तीमार्गी साधकाला हे प्रयत्न चांगले जमतात; पण कर्ममार्गी आणि ज्ञानमार्गी साधकाला ते भक्तीमार्गी साधकाप्रमाणे जमू शकणार नाहीत. परात्पर गुरु डॉक्टरांनी निर्मिलेला ‘गुरुकृपायोग’ हा सर्व साधनामार्गांना सामावून घेणारा आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गुरुकृपायोगात भक्ती, कर्म आणि ज्ञान या … Read more

आपत्काळात रक्षण होण्यासाठी साधकांनी हनुमंताप्रमाणे नामजप करायला हवा !

‘२१.५.२०१७ या दिवशी महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितले, ‘‘१९.५.२०१७ या दिवशी गुरूंच्या समोर झालेल्या नाडीवाचनात महर्षि म्हणाले, ‘साधकांचा नामजप अल्प पडतो.’ याचा अर्थ काय आहे ? सर्व साधक नामजप तर करतातच. आता तो हनुमंतासारखा व्हायला पाहिजे. त्रेता आणि द्वापर या युगांत हनुमंत होता; पण हनुमंताच्या रोमारोमामध्ये श्रीराम होता. हळूहळू साधकांनी तसा प्रयत्न … Read more

मना-विरुद्ध-नाम, तेच खरे काम !

‘मना’चे उलटे (खरे पहाता हेच सुलटे आहे) केले, तर ‘नाम’ होते. मनाला नामात गुंतवले तर उत्तम. तेच खरे कामास येते. नाम आहे म्हणून मनुष्य आहे. मनाकडे पहाण्याऐवजी, म्हणजेच मनाच्या विकारांना कुरवाळण्याऐवजी नामाकडे लक्ष दिले, तर देवाची कृपा झाल्याशिवाय रहाणार नाही. मन म्हणजे बाळ आणि जीव म्हणजे आई आहे. आई काळजी घेते, तसे जिवाने मनाची काळजी … Read more

भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करण्याचे महत्त्व

‘कोणतीही कृती परिपूर्ण केली, तर ती एकप्रकारे साधनाच होते’, हा कर्मसिद्धांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना शिकवला आहे. सेवा भावपूर्ण केली, तरच ती परिपूर्ण होऊ शकते. अशी सेवा केल्याने आपण गुरूंचे मन लवकर जिंकू शकतो. गुरूंचे मन जिंकले की, गुरुकृपा लवकर होऊन अध्यात्मात शीघ्र प्रगती होते. परिपूर्ण सेवा केल्याने साधक अव्यक्त भावाच्या टप्प्याला लवकर … Read more

भगवंताच्या दृष्टीत समत्व असते !

‘भगवंताच्या दृष्टीत समत्व असते. त्याच्यात भेद नसतो. तो मुखवट्याकडे (शरिराकडे / स्थूलदेहाकडे) पहात नाही. त्यातील आत्मतत्त्वाला पहातो. यासाठी बोलतांना आपण मुखवटे (स्थूलदेह) बाजूला करून बोलले पाहिजे. आत्मस्वरूपाशी बोलले पाहिजे; कारण मुखवट्यामध्ये विकार असतात.’ ‘जग तमोगुणी झाल्यामुळे तमोगुणानेच त्याला उत्तर दिले पाहिजे.’ – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.४.२०१५)

देवतांचा आदर्श ठेवून संकटांना पुरून उरूया !

‘शिवाला प्राप्त करून घेण्यासाठी देवी सतीला अनेक संकटांचा सामना करावा लागला. प्रभु श्रीरामाला १४ वर्षे खडतर वनवास भोगावा लागला. बालपणातच श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी कंसाने आणि हनुमानाचा वध करण्यासाठी रावणाने अनेक असुरांना त्यांच्यावर धाडले. संकटे तर देवतांनाही चुकली नाहीत; पण देवता या सार्‍या संकटांना पुरून उरल्या. संकटांतच आपली श्रद्धा, धैर्य, संयम आणि विवेक यांची खरी परीक्षा … Read more