नामस्मरण म्हणजे काय ?

अ. ‘मी जिवंत आहे. माझा प्रत्येक क्षण भगवंताच्या अनुसंधानात आहे’, हा विचार सतत असणे, हे खरे जीवन आहे. याला ‘नामस्मरण’ म्हणतात. आ. भगवंताच्या स्मरणात घडलेले प्रत्येक कर्म, म्हणजे नामस्मरण !’

परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

‘भगवंताची सेवा करून ती त्याला अर्पण करणे आणि त्यातून आनंद घेणे’, हे खरे जीवन ! ‘ईशावास्योपनिषदामध्ये म्हटले आहे, ‘भगवंत सर्वत्र इतका ठासून भरला आहे की, त्यात एकही अणूमात्र अवकाश नाही. त्यामुळे ‘तो नाही’, हा प्रश्‍नच येत नाही.’ त्यामुळे ‘कृपा’ हा प्रश्‍नच उद्भवत नाही. यासाठी तो म्हणतो, ‘तुला दिलेले शरीर, चित्त, मन, बुद्धी, अहं, पाच कर्मेंद्रिये, … Read more

स्वेच्छा लवकर नष्ट करण्याच्या संदर्भात आश्रमात रहाण्याचे महत्त्व

‘दिवसभर साधकाच्या हातून ज्या कृती होतात, त्या स्वेच्छेने होत असतात. स्वेच्छा नष्ट करण्यासाठी आश्रमात रहाणे हा सर्वांत सोपा मार्ग आहे. आश्रमात राहिल्यावर प्रत्येक गोष्ट कोणीतरी सांगितल्याप्रमाणे करावी लागते. त्यामुळे स्वेच्छा लवकर नष्ट होण्यास साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२४.२.२०१७)

अहंभाव असलेले लेखापरीक्षक आणि अहंभावशून्य भगवंत

‘लेखापरीक्षक काही व्यक्तींचे लेखा परीक्षण करतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्रत्येक जिवाचा क्षणाक्षणाचा हिशोब (अकाऊंट) ठेवतो, तरी तो अहंशून्य आहे !’ आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.१२.२०१६)

हिंदु धर्मातील अध्यात्म सूक्ष्म आध्यात्मिक स्तरावरचे आहे, तर इतर धर्मांतील…

हिंदु धर्मातील अध्यात्म सूक्ष्म आध्यात्मिक स्तरावरचे आहे, तर इतर धर्मांतील अध्यात्म मानसिक स्तरावरचे आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.३.२०१७)

आधुनिक शिक्षण

माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्‍या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.२.२०१७)

ऋषींच्या सांगण्याप्रमाणे देह उभा चिरून देत असतांना त्याग सत्कारणी लागल्याने राजाच्या डोळ्यांत आनंदाश्रू येणे

‘एक राजा त्यागासाठी प्रसिद्ध होता. एकदा त्याची परीक्षा घेण्यासाठी एक ऋषी त्याच्याकडे गेले. ऋषी म्हणाले, ‘‘राजा, तुझे शरीर उभे चिरून त्यातील उभा भाग मला दे; परंतु तू खरा त्यागी असशील, तर तुझ्या डोळ्यांत दुःखाश्रू येता कामा नयेत.’’ राजाचे शरीर उभे चिरण्यास आरंभ झाला. तेव्हा राजाच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ऋषी म्हणाले, ‘‘राजा, तुझा त्याग … Read more

सर्वशक्तीमान आणि सर्वसमर्थ असल्याने ईश्‍वरच खरा दयाळू, अहिंसावादी आणि कृपाळू असणे

ईश्‍वरच खरा दयाळू आणि क्षमाशील आहे. माणसाने पुष्कळ पापे आणि कुकर्मे केली, तरी ईश्‍वर त्याला पुनःपुन्हा जन्म देऊन मोक्षप्राप्तीची संधी देतो. तो सर्वशक्तीमान आणि सर्वसमर्थ असल्याने दयावान, अहिंसावादी आणि कृपाळू आहे.

सगुणाची पूजा करतांना आपल्यातील भगवंत प्रसन्न व्हायला हवा !

सगुणाची पूजा, म्हणजे आपल्यातील निर्गुण ईश्‍वराला सगुणात आणून त्याची पूजा करत आहोत, असा भाव ठेवला, तर ती पूजा आत्मीयतेने होऊन आपल्यातील भगवंत प्रसन्न होतो.

मायेतील ब्रह्माविषयी कृतज्ञ असणे आवश्यक !

आपण मायेतील ब्रह्माला जवळ करत नाही, तर मायेशी संवाद साधतो. आपण मायेच्या मूळ रूपाला जाणत नाही, उदा. आश्रमातील जांभळे खातांना ती ज्याच्यामुळे मिळाली त्याची जाणीव आणि त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा विचार आपल्या मनात येत नाही. ज्या झाडाने जांभळे दिली त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली, तर झाड आणि जांभळे काढून देणारा हे दोघेही प्रसन्न होतील.