अहंभाव असलेले लेखापरीक्षक आणि अहंभावशून्य भगवंत

‘लेखापरीक्षक काही व्यक्तींचे लेखा परीक्षण करतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्रत्येक जिवाचा क्षणाक्षणाचा हिशोब (अकाऊंट) ठेवतो, तरी तो अहंशून्य आहे !’ आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.१२.२०१६)

हिंदु धर्मातील अध्यात्म सूक्ष्म आध्यात्मिक स्तरावरचे आहे, तर इतर धर्मांतील…

हिंदु धर्मातील अध्यात्म सूक्ष्म आध्यात्मिक स्तरावरचे आहे, तर इतर धर्मांतील अध्यात्म मानसिक स्तरावरचे आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.३.२०१७)

आधुनिक शिक्षण

माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्‍या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.२.२०१७)

ऋषींच्या सांगण्याप्रमाणे देह उभा चिरून देत असतांना त्याग सत्कारणी लागल्याने राजाच्या डोळ्यांत आनंदाश्रू येणे

‘एक राजा त्यागासाठी प्रसिद्ध होता. एकदा त्याची परीक्षा घेण्यासाठी एक ऋषी त्याच्याकडे गेले. ऋषी म्हणाले, ‘‘राजा, तुझे शरीर उभे चिरून त्यातील उभा भाग मला दे; परंतु तू खरा त्यागी असशील, तर तुझ्या डोळ्यांत दुःखाश्रू येता कामा नयेत.’’ राजाचे शरीर उभे चिरण्यास आरंभ झाला. तेव्हा राजाच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ऋषी म्हणाले, ‘‘राजा, तुझा त्याग … Read more

सर्वशक्तीमान आणि सर्वसमर्थ असल्याने ईश्‍वरच खरा दयाळू, अहिंसावादी आणि कृपाळू असणे

ईश्‍वरच खरा दयाळू आणि क्षमाशील आहे. माणसाने पुष्कळ पापे आणि कुकर्मे केली, तरी ईश्‍वर त्याला पुनःपुन्हा जन्म देऊन मोक्षप्राप्तीची संधी देतो. तो सर्वशक्तीमान आणि सर्वसमर्थ असल्याने दयावान, अहिंसावादी आणि कृपाळू आहे.

सगुणाची पूजा करतांना आपल्यातील भगवंत प्रसन्न व्हायला हवा !

सगुणाची पूजा, म्हणजे आपल्यातील निर्गुण ईश्‍वराला सगुणात आणून त्याची पूजा करत आहोत, असा भाव ठेवला, तर ती पूजा आत्मीयतेने होऊन आपल्यातील भगवंत प्रसन्न होतो.

मायेतील ब्रह्माविषयी कृतज्ञ असणे आवश्यक !

आपण मायेतील ब्रह्माला जवळ करत नाही, तर मायेशी संवाद साधतो. आपण मायेच्या मूळ रूपाला जाणत नाही, उदा. आश्रमातील जांभळे खातांना ती ज्याच्यामुळे मिळाली त्याची जाणीव आणि त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा विचार आपल्या मनात येत नाही. ज्या झाडाने जांभळे दिली त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली, तर झाड आणि जांभळे काढून देणारा हे दोघेही प्रसन्न होतील.

कार्य सत्य नसून कार्याचा कर्ता करविता ईश्‍वरच खरा सत्य होय !

कार्याचे व्यक्त स्वरूप आपल्यात दृष्यमान होत असते. त्यालाच आपण सत्य समजण्याची चूक करतो. प्रत्यक्षात कार्याचा कर्ता करविता (मन आणि ईश्‍वर) अव्यक्त असून तोच खरा सत्य असतो. अशा प्रकारे असत्याला सत्य मानल्याने सूक्ष्मातील ईश्‍वराशी आपले अनुसंधान रहात नाही. वास्तविक अव्यक्तच श्रेष्ठ असते.

आपल्याला जेव्हा इतरांच्या दोषांचा राग येतो, तेव्हा त्यांच्याकडे केवळ बाह्यांगाने न पहाता अंतरात्म्याकडे लक्ष देणे आवश्यक असणे

आपल्याला जेव्हा इतरांच्या दोषांचा राग येतो, तेव्हा आपण आपल्यावरील आवरणाकडे लक्ष देत असतो; पण त्याच्यातील कार्य करणार्‍या भगवंताकडे आपले लक्ष नसते. आपण त्यांच्या दोषांशी एकरूप न होता त्यांच्या स्थितीत जाऊन त्यांना दोष घालवायला कसे साहाय्य करता येईल ?, याचा विचार करायला हवा. आपण त्यांच्याकडे केवळ बाह्यांगाने न पहाता त्यांच्यातील अंतरात्म्याकडे लक्ष द्यायला हवे.

आनेवालेको कहना नहीं, जानेवालेको रोकना नहीं और पूछे बिगर रहना नहीं ।

भावार्थ : आनेवालेको कहना नहीं मधे कहना हे विचारणे या अर्थी आहे. येणार्‍याला, म्हणजे जन्माला आलेल्याला तू जन्माला का आलास ? असे आपण विचारू शकत नाही. सृष्टीचे निर्माण बंद होऊ शकत नाही. जानेवालेको, म्हणजे मृत्यू पावणार्‍याला रोकना नहीं, म्हणजे आपण थांबवू शकत नाही. पूछे बिगर रहना नहीं, म्हणजे तू खरोखर कोण आहेस ? हे स्वतःला … Read more