नादानंतर भगवंताशी असलेल्या अनुसंधानतेमुळे जी शांती प्राप्त होते, त्या शांतीची अनुभूती काय वर्णावी ! ती शब्दातीत अनुभूतीजन्यच असते.

दुसर्‍याच्या वैखरीतून कंठाद्वारे प्रतिध्वनित झालेले शब्द ऐकणार्‍याच्या कानाद्वारे ऐकले जाऊन त्या शब्दलहरी कानामध्ये पुन्हा परिवर्तित होऊन त्याला प्राप्त होण्यामुळे भावजागृती होणे दुसर्‍याच्या वैखरीतून कंठाद्वारे प्रतिध्वनित झालेले शब्द ऐकणार्‍याच्या कानात जातात आणि त्या शब्दलहरी कानामध्ये पुन्हा परिवर्तित होऊन त्याला प्राप्त होतात. यात भगवंताची केवढी किमया आहे आणि तेही इतक्या लवकर होते की, ते लक्षातही येत नाही. … Read more

भावसत्संग ऐकत असतांना परात्पर गुरु पांडे महाराज यांना सुचलेली सूत्रे

‘चैतन्ययुक्त वर्णाद्वारे शब्द कंठातून (ध्वनीयंत्रातून) बाहेर पडतो, तेव्हा त्यातून बाहेर पडणारा शब्दांतील अर्थ चैतन्याने भारीत असतो. तसेच त्यातून प्रगट होणार्‍या नादाने जो आनंद प्रगट होतो, तो नाद निर्गुण असतो. अशा आत्मीयतेने भारलेल्या चैतन्यमय निर्गुणरूपी नादाने जी भावजागृती होते, ती आपल्यातील आत्म्याशी समरस होऊन आनंदाच्या लहरी निर्माण करते; म्हणून आपल्याला जो आनंद होतो, तो अवर्णनीय असतो.

परात्पर गुरु डॉ. आठवलेे यांनी स्वतःच्या कृतीतून ‘प्रत्येक क्षण कसा जगायचा ?’, याची शिकवण दिलेली असणे

प्रत्येक साधकाची आध्यात्मिक उन्नती व्हावी, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवलेे रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. ते स्वतःच्या कृतीतून ‘प्रत्येक क्षण कसा जगायचा ?’, याची शिकवण देत आहेत. त्यांच्या कृतीतून बोध घेऊन आपण प्रत्येक क्षणी त्यांना अपेक्षित असा विचार ग्रहण करायचा आहे. प्रत्येकाने ‘प्रत्येक क्षणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित असे … Read more

गेलेला क्षण परत मिळत नसल्याने अशाश्वत गोष्टींमध्ये वेळ वाया न घालवता साधना करून चैतन्य वाढवण्यासाठी वेळ द्या !

‘प्रत्येकाचे जीवन क्षणाक्षणाने बनलेले असून प्रत्येकाच्या हातात केवळ वर्तमान क्षणच आहे. तो क्षण सुटला की, पुन्हा परत मिळत नाही, तसेच पुढचा क्षण आपल्या हातात आहे कि नाही, याची शाश्‍वतीही नाही. आपण आपला वेळ अशाश्‍वत गोष्टींमध्ये वाया घालवण्याऐवजी शाश्‍वत गोष्टींसाठी (साधना करून चैतन्य वाढवण्यासाठी) दिल्यास आपण पूर्णतः समाधानी होऊ शकतो. अन्यथा माणूस आळशी होऊन तो पूर्ण … Read more

चैतन्याचा जागर केल्यामुळे होणारे लाभ !

आपण चैतन्याचा जागर केल्यास आपल्यातील चैतन्यात वाढ होईल आणि पर्यायाने संपूर्ण विश्‍वातील रज-तमाचा नाश होईल. असे रज-तमाचा नाश झालेले विश्‍व, हेच चैतन्यमय सनातन धर्मराज्य असेल !

खरी भावजागृती होण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे !

आपण वरवर ‘भावजागृती झाली’, असे म्हणतो. हा भगवंताचा, म्हणजेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अवमान आहे. त्यांच्या पूजनीय आत्मस्वरूपाचे मूल्य जाणून आपण त्याची जपणूक करू, तेव्हा खरोखरची भावजागृती होईल; याला ‘पूजा’ असे म्हणतात. त्यांचे पूजनीय पद जपणे, याला खरी पूजा म्हणतात आणि अशा प्रकारे केलेल्या पूजेद्वारे होणारी भावजागृती ही खरी भावजागृती होय.’

स्वतःतील ‘मी’ ला विसरून चैतन्याशी अनुसंधान ठेवा !

साधकांनो, आपत्काळ चालू झाल्याची चिन्हे आता दिसून येत आहेत. विविध माध्यमांतून साधकांना होणारे त्रास, हे त्याचेच लक्षण आहे. या त्रासातही आनंदी राहून परिस्थितीवर मात करण्यासाठी साधनेद्वारे चैतन्याचा जागर करा ! स्वतःतील चैतन्याचा जागर कसा करायचा ? स्वतःतील ‘मी’ ला विसरून चैतन्याशी अनुसंधान ठेवा ! आपण देवीचे तत्त्व जागृत होण्यासाठी तिचा जागर करतो. त्याचप्रमाणे आपल्यातील ‘मी’ … Read more

साधकांनो, चुका टाळण्यासाठी साधनेची खरी प्रक्रिया कृतीत आणा !

साधनेची खरी प्रक्रिया जाणून त्याप्रमाणे कृती करा ! ‘साधकांनो, परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणजे भगवंताचा अंश आहे’, असे वाटले पाहिजे. चुका झाल्याने त्यांच्या आत्म्याला दु:ख होते. हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही, तोपर्यंत आपल्या हातून चुका होत रहाणार. भगवंताला, म्हणजे आत्म्याला सुख मिळावे; म्हणून आनंदी राहिले पाहिजे. हे आता सर्वांना समजले पाहिजे. आत्म्याला त्रास होऊ नये; … Read more

साधकांनो, चुका टाळण्यासाठी साधनेची खरी प्रक्रिया कृतीत आणा !

२१.५.२०१७ या दिवशी दैनिक सनातन प्रभातच्या संपादकीय लेखामध्ये एका व्यक्तीचे नाव चुकीचे लिहिले गेले. या प्रसंगाला अनुसरून परात्पर गुरु पांडे महाराज यांनी चुका का होतात ?’ आणि प्रायश्‍चित्ताविषयी कसा दृष्टीकोन ठेवावा’, याविषयी सांगितलेली सूत्रे पुढे देत आहे. श्रीरामाप्रमाणे प्रायश्‍चित्त घ्यायला हवे ! ‘सध्या साधक कितीही मोठी चूक झाली, तरी लहान-सहान प्रायश्‍चित घेतात. चित्तावर पुन्हा चूक … Read more

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपाय म्हणून देवतांची चित्रे कुंडलिनीचक्रांवर लावण्यासाठी सांगण्यामागील शास्त्र

कुंडलिनी शक्ती प्रथम सुप्त असते. साधनेद्वारे (गुरुकृपायोगाद्वारे) ती जागृत झाली, तरी ती सहस्रारचक्रापर्यंत वर जातांना मध्ये असलेल्या चक्रांतील अडथळ्यांमुळे तिची शक्ती आपल्याला उपभोगता येत नाही. ते अडथळे नाहीसे होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपल्याला देवतांची चित्रे तिथे लावायला सांगितली आहेत. हे आपले केवढे भाग्य आहे.