गेलेला क्षण परत मिळत नसल्याने अशाश्वत गोष्टींमध्ये वेळ वाया न घालवता साधना करून चैतन्य वाढवण्यासाठी वेळ द्या !

‘प्रत्येकाचे जीवन क्षणाक्षणाने बनलेले असून प्रत्येकाच्या हातात केवळ वर्तमान क्षणच आहे. तो क्षण सुटला की, पुन्हा परत मिळत नाही, तसेच पुढचा क्षण आपल्या हातात आहे कि नाही, याची शाश्‍वतीही नाही. आपण आपला वेळ अशाश्‍वत गोष्टींमध्ये वाया घालवण्याऐवजी शाश्‍वत गोष्टींसाठी (साधना करून चैतन्य वाढवण्यासाठी) दिल्यास आपण पूर्णतः समाधानी होऊ शकतो. अन्यथा माणूस आळशी होऊन तो पूर्ण … Read more

चैतन्याचा जागर केल्यामुळे होणारे लाभ !

आपण चैतन्याचा जागर केल्यास आपल्यातील चैतन्यात वाढ होईल आणि पर्यायाने संपूर्ण विश्‍वातील रज-तमाचा नाश होईल. असे रज-तमाचा नाश झालेले विश्‍व, हेच चैतन्यमय सनातन धर्मराज्य असेल !

खरी भावजागृती होण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे !

आपण वरवर ‘भावजागृती झाली’, असे म्हणतो. हा भगवंताचा, म्हणजेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अवमान आहे. त्यांच्या पूजनीय आत्मस्वरूपाचे मूल्य जाणून आपण त्याची जपणूक करू, तेव्हा खरोखरची भावजागृती होईल; याला ‘पूजा’ असे म्हणतात. त्यांचे पूजनीय पद जपणे, याला खरी पूजा म्हणतात आणि अशा प्रकारे केलेल्या पूजेद्वारे होणारी भावजागृती ही खरी भावजागृती होय.’

स्वतःतील ‘मी’ ला विसरून चैतन्याशी अनुसंधान ठेवा !

साधकांनो, आपत्काळ चालू झाल्याची चिन्हे आता दिसून येत आहेत. विविध माध्यमांतून साधकांना होणारे त्रास, हे त्याचेच लक्षण आहे. या त्रासातही आनंदी राहून परिस्थितीवर मात करण्यासाठी साधनेद्वारे चैतन्याचा जागर करा ! स्वतःतील चैतन्याचा जागर कसा करायचा ? स्वतःतील ‘मी’ ला विसरून चैतन्याशी अनुसंधान ठेवा ! आपण देवीचे तत्त्व जागृत होण्यासाठी तिचा जागर करतो. त्याचप्रमाणे आपल्यातील ‘मी’ … Read more

साधकांनो, चुका टाळण्यासाठी साधनेची खरी प्रक्रिया कृतीत आणा !

साधनेची खरी प्रक्रिया जाणून त्याप्रमाणे कृती करा ! ‘साधकांनो, परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणजे भगवंताचा अंश आहे’, असे वाटले पाहिजे. चुका झाल्याने त्यांच्या आत्म्याला दु:ख होते. हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही, तोपर्यंत आपल्या हातून चुका होत रहाणार. भगवंताला, म्हणजे आत्म्याला सुख मिळावे; म्हणून आनंदी राहिले पाहिजे. हे आता सर्वांना समजले पाहिजे. आत्म्याला त्रास होऊ नये; … Read more

साधकांनो, चुका टाळण्यासाठी साधनेची खरी प्रक्रिया कृतीत आणा !

२१.५.२०१७ या दिवशी दैनिक सनातन प्रभातच्या संपादकीय लेखामध्ये एका व्यक्तीचे नाव चुकीचे लिहिले गेले. या प्रसंगाला अनुसरून परात्पर गुरु पांडे महाराज यांनी चुका का होतात ?’ आणि प्रायश्‍चित्ताविषयी कसा दृष्टीकोन ठेवावा’, याविषयी सांगितलेली सूत्रे पुढे देत आहे. श्रीरामाप्रमाणे प्रायश्‍चित्त घ्यायला हवे ! ‘सध्या साधक कितीही मोठी चूक झाली, तरी लहान-सहान प्रायश्‍चित घेतात. चित्तावर पुन्हा चूक … Read more

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपाय म्हणून देवतांची चित्रे कुंडलिनीचक्रांवर लावण्यासाठी सांगण्यामागील शास्त्र

कुंडलिनी शक्ती प्रथम सुप्त असते. साधनेद्वारे (गुरुकृपायोगाद्वारे) ती जागृत झाली, तरी ती सहस्रारचक्रापर्यंत वर जातांना मध्ये असलेल्या चक्रांतील अडथळ्यांमुळे तिची शक्ती आपल्याला उपभोगता येत नाही. ते अडथळे नाहीसे होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपल्याला देवतांची चित्रे तिथे लावायला सांगितली आहेत. हे आपले केवढे भाग्य आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपाय म्हणून देवतांची चित्रे कुंडलिनीचक्रांवर लावण्यासाठी सांगण्यामागील शास्त्र

मूलाधार चक्रातील चैतन्यशक्ती कुंडलिनी जागृतीनंतर पुढे सुषुम्ना नाडीतील विविध चक्रांद्वारे सर्व इंद्रियांत जाऊन आनंद देते; परंतु त्या चक्रात वाईट शक्ती अडचण आणतात. त्यामुळे आपल्याला विविध स्वरूपाचा त्रास होतो. हा अडथळा दूर करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निरनिराळे उपाय सांगितले आहेत.

साधकांनो, आनंद आपल्यातच आहे, हे जाणा !

‘आनंद’ हा प्रत्येक जिवाचा स्थायी भाव आहे. खरेतर जीव या आनंदालाच शोधत असतो; परंतु भ्रमामुळे त्याला आपल्यातच ‘आनंद’ आहे, हे ठाऊक नसते. त्यामुळे त्याची स्थिती कस्तुरी मृगाप्रमाणे होऊन तो विविध मार्गांनी आनंद प्राप्त करण्याच्या प्रयत्नांत रहातो. त्याच्यातील स्वभावदोषांमुळे तो दुष्कृत्यांकडे वळतो. साधनेमुळे गुुरुप्राप्ती झाल्यावर ‘खरा आनंद कशात आहे’, हे कळायला लागते आणि जीव महानंदात राहू … Read more

भूमीत जीवतत्त्व आहे !

‘बिजातून झाड उगवते, याचा अर्थ त्यात प्राणशक्ती आहेच. भूमीत जीवतत्त्व असल्याने ते वाढते. १० प्रकारची झाडे असतील, तर भूमी १० प्रकारची वेगवेगळी पोषकद्रव्ये देते.याचा अर्थ भूमीत जीवतत्त्व आहे.’