कर्मनियंत्रणासाठी भगवंताशी सतत अनुसंधानित रहाण्याची आवश्यकता !

कर्म नियंत्रणात असेपर्यंत सुधारणा करणे शक्य असणे ‘एखादी गोष्ट आपल्या नियंत्रणात आहे, तोपर्यंत तिच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीतील सत्य-असत्य आणि परिणाम जाणून कृत्य केले पाहिजे, उदा. अन्न घशातून आत जाण्यापूर्वी त्यावर आपले नियंत्रण पाहिजे. एकदा ते पोटात गेले की, त्यावरील आपले नियंत्रण संपते. बोलण्याचेसुद्धा असेच आहे. आपल्या मुखातून बोल निघेपर्यंत विचार करूनच बोलले पाहिजे. … Read more

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवतांना श्रद्धा आणि सबुरी हवी !

काही जणांमध्ये मनाने करणे, अव्यवस्थितपणा, अनावश्यक बोलणे, अकारण मोठ्या आवाजात बोलणे यांसारखे स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू प्रबळ असतात. ते त्यांच्या प्रकृतीत इतके मुरलेेले असतात की, त्यांना त्यांची जाणीवही नसते आणि म्हणून स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया राबवून त्यांवर मात करणे त्यांना इतरांच्या तुलनेत कठीण जाते. यामुळे त्यांना निराशा येते किंवा प्रक्रिया राबवणेच नको वाटते. … Read more

अखिल मानवजातीसाठी चिरंतन संजीवनी !

‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सांगितलेली ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया’ ही केवळ साधकांसाठीच नव्हे, तर अखिल मानवजातीला भवरोगातून मुक्त करणारी चिरंतन संजीवनी आहे.’

गुर्वाज्ञापालनाचे महत्त्व

साधना करतांना गुरूंच्या आज्ञेने सर्व करत गेल्यास स्वतःचे मन आणि बुद्धी यांचा वापर न झाल्याने त्यांचा लय होतो. मनोलय आणि बुद्धीलय होतो. आधुनिक विज्ञानाच्या भाषेत याला Disuse Atrophy (वापर न केल्यामुळे होणारा नाश) असे म्हणता येईल. यावरून गुर्वाज्ञापालनाचे महत्त्व लक्षात येईल.

खरे अध्यात्म कळणे, म्हणजे काय ?

बर्‍याच जणांना आध्यात्मिक ग्रंथ वाचले किंवा कीर्तने वा अध्यात्मावरील प्रवचने ऐकली की, आपल्याला अध्यात्म कळले, असे वाटते. हे खरे अध्यात्म कळणे नव्हे; कारण हे केवळ शब्दांच्या पातळीला असते. अध्यात्मातील ज्ञान जेव्हा आपण जीवनात अनुभवू लागतो, तेव्हा अध्यात्माचा अर्थ आपल्याला खर्‍या अर्थाने कळायला लागतो. हे खरे अध्यात्म कळणे होय. खरे अध्यात्म कळण्यासाठी साधनाच करावी लागते.

आजच्या काळात ‘मोह’ आणि ‘लोभ’ यांनी अंध झालेल्या चोरांचे वाढत चाललेले माहात्म्य !

सर्वत्र चैतन्यच भरलेले असून तेच कार्य करते. सर्व सृष्टीच चैतन्याने भारित झालेली आहे. असे असतांना यामध्ये तुम्ही-आम्ही कुठून आलो ? एखाद्याने १० कोटी रुपये मिळवले आणि त्यातील १ लाख रुपये दान केले, तर त्याला दानशूर म्हणतात का ? यावरून आजच्या काळात ‘मोह’ आणि ‘लोभ’ यांनी अंध झालेल्या चोरांचे माहात्म्य वाढत असल्याचे दिसत आहे.

साधना न केल्याने शासनकर्त्यांच्या हातून पापकर्म घडून लोकशाहीची दयनीय स्थिती होणे

पूर्वीच्या काळी राजेसुद्धा साधना करत असल्याने ते धर्माचरणी असणे; परंतु सध्याचे राजकारणी साधना करत नसल्याने त्यांच्या हातून सतत पापच घडत रहाणे ‘शेवटी माणूस त्याच्या स्वभावदोषाप्रमाणेच वागतो. स्वभावदोष-निर्मूलन करणे, म्हणजेच ‘साधना करणे’, हाच यावर उपाय आहे. पूर्वीच्या काळी राजेसुद्धा साधना करत असल्याने ते धर्माचरणी होते आणि त्याप्रमाणे ते राज्यकारभार करत होते. राजेसुद्धा संन्यास घेऊन साधनेसाठी अरण्यात … Read more

खरे ज्ञान हे मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील आहे !

‘ज्ञान’ हे पावित्र्य आणि मांगल्याचे जन्मस्थान आहे; म्हणूनच खर्‍या अर्थाने ज्ञानी, म्हणजेच विद्वान मनुष्याची किर्ती दूरवर पसरते. असे हे ज्ञान मनाच्याही पलीकडील निर्गुण अवस्थेत गेल्यानंतर जी अनुभूती येते, ते खरे ज्ञान ! खरे ज्ञान हे मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील आहे ! आपण ‘आपल्याला ज्या गोष्टीचे ज्ञान आहे’, असे म्हणतो, ती खरे म्हणजे त्या गोष्टीची … Read more

साधना न केल्याने राज्यकर्त्यांच्या हातून पापकर्म घडून लोकशाहीची दयनीय स्थिती होणे

‘१५.५.२०१८ या दिवशी कर्नाटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. दैनिकातील वृत्तानुसार विरोधी पक्षातील आमदार फोडण्यासाठी पैसे देणे, यांना आमीष दाखवणे चालू होते. यातून ‘सर्व पक्ष हे एकाच माळेचे मणी आहेत’, हे सिद्ध होते. यावरून ‘केवळ सत्तेच्या लोभापोटी मनुष्य कसा वागतो आणि तो प्रत्यक्ष कसा असतो’, हे लक्षात येते.