प्रायोगिक माहिती मिळणे आणि आनंदावस्था लवकर प्राप्त होणे

अध्यात्मातील कृतीचे महत्त्व सनातन संस्थेत सप्ताह, पारायणे होत नाहीत, तर साधनेत कृती करून पुढे जाण्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं-निर्मूलन सत्संग आणि साधनेचा आढावा घेणे हे नित्यनियमाने होते. पारायणातून केवळ तात्त्विक माहिती मिळते; परंतु स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेतून अहं लवकर अल्प झाल्याने देवाविषयीच्या अनुभूती लवकर येतात. केवळ पारायण न करता साधनेची प्रत्यक्ष कृती केल्यास ईश्‍वराविषयीची प्रायोगिक … Read more

चुका झाल्यावर केवळ क्षमायाचना नको, तर प्रायश्चित्तही घ्यायला हवे !

चुका झाल्यावर क्षमायाचना केल्याने चुकांमुळे निर्माण झालेला मनावरचा ताण घटतो आणि मनाला समाधान लाभते. मनुष्याचे जीवन हे कर्ममय आहे. मनुष्याने केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ हे त्याला मिळतेच. चुका केल्याने पाप लागते. चुका झाल्यावर केवळ क्षमायाचना केल्याने पाप नष्ट होत नाही; पण प्रायश्‍चित्तही घेतले, तर पापाचे परिमार्जन होण्यास साहाय्य होते.

चित्रकारांनो, आपण कोणासाठी चित्र काढत आहोत, हे लक्षात घेऊन चित्र काढा !

‘चित्र काढतांना ते दुसर्‍यासाठी असल्यास त्यांच्या आवडी लक्षात घेऊन ते काढा. चित्र साधकांसाठी असल्यास त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी त्यातून चैतन्याची अनुभूती येणे आवश्यक असते, तर चित्र इतरांसाठी असल्यास त्यांच्या सुखासाठी ते डोळ्यांनी चांगले दिसणे आवश्यक असते.’

विज्ञानातील प्रयोग चुकू शकतो; पण अध्यात्मातील कोणताही प्रयोग चुकत नाही अथवा निष्फळ ठरत नाही !

अध्यात्माचे श्रेष्ठत्व आणि विज्ञानाच्या मर्यादा कलियुगामधे अनेक लोक विविध वैज्ञानिक प्रयोग करतात. ते सर्व प्रयोग यशस्वी होतातच, असे नाही. कित्येकदा विज्ञानातील प्रयोग चुकल्यामुळे त्यासाठी वापरलेले मनुष्यबळ, आर्थिक गुंतवणूक आणि वेळ अशी सर्व प्रकारची ऊर्जा प्रयोगाच्या अंती वाया जाते, असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. अध्यात्मात मात्र तसे होत नाही. साधकाने ईश्‍वराला संपूर्ण शरण जाऊन श्रद्धा … Read more

त्रास असणाऱ्या साधकांनो, त्रासामुळे पुनःपुन्हा होणाऱ्या चुकांमुळे निराश होऊ नका !

‘त्रास असणार्‍या साधकांचे मन आणि बुद्धी यांवर त्रासदायक आवरण सारखे सारखे येतच असते. त्यामुळे बर्‍याचदा अशा साधकांकडून ‘त्याच त्याच चुका पुनःपुन्हा होतात’, असे लक्षात आले आहे. चुका झाल्यावर त्याविषयी सतर्क होऊन चुका होऊ नयेत, यासाठी उपाययोजना काढूनही परत परत त्याच त्याच चुका झाल्यामुळे साधकांना निराशा येते. अशा चुका होण्यामागील मुख्य कारण ‘मन आणि बुद्धी यांवर … Read more

एखाद्या प्रसंगातील कार्यकारणभाव जाणून घेण्यापेक्षा सतत शिकण्याच्या स्थितीत राहून साधनेत पुढे जायला हवे !

बर्‍याच वेळा साधकांना त्यांच्या भावामुळे स्थुलातून आणि सूक्ष्म स्तरावर अनेक अनुभूती येत असतात. बरेच साधक संतांना याविषयी विचारतात, हे असे का घडले ? तसेच का घडले ? स्वप्नात मला जे दिसले, त्याचे कारण काय ? इत्यादी. या विचारांचा साधकांचे मन आणि त्यांची साधना यांवर परिणाम होतो. आरंभीच्या टप्प्याला एक जिज्ञासू म्हणून या अनुभूतींचे विश्‍लेषण आणि … Read more