अन्नपाणी ग्रहण करण्याप्रमाणेच भावजागृतीचे प्रयत्न करणे, हे आपले नित्य कर्म !
‘आपण जसे प्रतिदिन अन्नपाणी ग्रहण करतो, तसे प्रतिदिन भावजागृतीचे प्रयत्न करणे, हे आपले नित्य कर्म आहे. ते केल्यानेच आपण आपत्कालात जिवंत राहू शकतो.’
‘आपण जसे प्रतिदिन अन्नपाणी ग्रहण करतो, तसे प्रतिदिन भावजागृतीचे प्रयत्न करणे, हे आपले नित्य कर्म आहे. ते केल्यानेच आपण आपत्कालात जिवंत राहू शकतो.’
‘वर्ष २००० ते २००३ या काळात फोंडा येथील सुखसागर सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतः साधकांसाठी सत्संग घेत असत. त्या वेळी नुकतेच वाईट शक्तींचे त्रास चालू झाले होते. साधकांना पुष्कळच त्रास होत होते. त्या कालावधीपासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला ‘वाईट शक्तींचे जग कसे असते ?’ याविषयी माहिती द्यायला प्रारंभ केला. त्या वेळी त्यांनी … Read more
‘काळाला अनुकूल अशी आपली साधना हवी. राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना केवळ व्रते करण्यापेक्षा घरोघर जाऊन निद्रिस्त समाजाला साधना सांगून त्याला जागृत केले पाहिजे, म्हणजेच समष्टी साधना केली पाहिजे. समाजाला योग्य-अयोग्य गोष्टींची जाणीव करून द्यायला हवी. सर्व समाजाचे उत्थापन म्हणजेच हिंदु राष्ट्राची निर्मिती !’
‘जे बुद्धीप्रामाण्यवादी ‘देव नाही’ म्हणतात, त्यांना भक्तांना येते, तशी चिरंतन आनंदाची अनुभूती कधी येईल का ?’
‘निश्चययुक्त आत्मतत्त्वात रत रहाणारे (गुरु) जीवनमुक्त असतात.’ (महोपनिषद्, अध्याय ६)
‘कर्म कुठले करायचे ?’, ते आपल्या हातात असते. ‘त्याचे फळ केव्हा द्यायचे ?’, हे देवाच्या हातात असते.
अयं प्रपञ्चो मिथ्यैव सत्यं ब्रह्माहमद्वयम् । अत्र प्रमाणं वेदान्ता गुरवोऽनुभवस्तथा ॥ – योगवासिष्ठ, प्रकरण ३, अध्याय २१, श्लोक ३५ अर्थ : अनुभवाला येणारा प्रपंच विस्तार, नानात्व (विविधता) हे केवळ भासमान होणारे आहे. केवळ एकमात्र ब्रह्मच सत्य, शाश्वत आहे आणि ते आपणच आहोत. याविषयी वेदादी सत्शास्त्रे, गुरु आणि शेवटी स्वतःचा अनुभव हीच प्रमाणे होत.
‘दैनिक सनातन प्रभातमधील प्रत्येक शब्द परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्याने भारित झालेला आहे. त्यामुळे दैनिक सनातन प्रभात क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज युक्त चैतन्याने भारित झाले आहे. यातील प्रत्येक शब्दाच्या प्रभावाने वाचकावरील रज-तमाचे आवरण निघून जाईल आणि त्याची आत्मोन्नती होईल ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पामुळे आणि त्यांच्यातील चैतन्यामुळे साधकांना अनुभूती येतात. त्या दैनिक सनातन … Read more
ईश्वराने मनुष्याला बनवतांना स्वतःचा एक अंश घालून (ईश्वरी अंश = आत्मा) आणि लीला रचण्यासाठी त्या आत्म्याभोवती मायेचे (त्रिगुणाचे) आवरण घातलेे. मनुष्य म्हणजे र्ईश्वरी अंश + माया. त्याने मनुष्याला त्याच्या आत्म्याभोवती असलेले मायेचे आवरण दूर करून ईश्वरस्वरूप (आत्मस्वरूप) हो, असे ध्येय दिले. मनुष्य ईश्वरस्वरूप झाल्यावर त्या जिवाची लीला पूर्ण होतेे. सर्व मानव ईश्वरस्वरूप झाल्यावर जगत्लीला पूर्ण … Read more
‘दिवसभर श्रम झाल्यामुळे निसर्गतःच रात्री शरीर थकते, तसेच मन आणि बुद्धी हेही थकतात. रात्री वातावरणातील वाईट शक्तींचा संचार अधिक असल्यामुळे मन आणि बुद्धी यांवर त्रासदायक आवरण येण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे जागरण करून सेवा, विशेषतः बौद्धिक सेवा करतांना सेवेत सुचण्याचे प्रमाण आणि सेवेची गती अल्प होते अन् चुका होण्याची शक्यता वाढते. यामुळे सेवेची फलनिष्पत्ती घटते. जागरणाचे … Read more