‘नामजप साधनेने प्रारब्ध भोगण्याचे सामर्थ्य मिळते.’
‘नामजप इत्यादी साधनेने प्रारब्ध बदलत नाहीत, तर ते भोगण्याचे सामर्थ्य मिळते.’
‘नामजप इत्यादी साधनेने प्रारब्ध बदलत नाहीत, तर ते भोगण्याचे सामर्थ्य मिळते.’
‘एखाद्या सात्त्विक राजाचे चरित्र वाचून थोडा वेळ उत्साह वाटतो; पण ऋषिमुनींचे चरित्र आणि शिकवण वाचून अधिक काळ उत्साह वाटतो अन् साधनेला दिशा मिळते !’
‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले
‘भक्ती हा अहंकार तोडण्याचा विधी, अभ्यास आहे; परंतु भक्तीमार्गांत द्वैत ठेवण्याची प्रथा आहे म्हणजे ‘भक्त नेहमी परमेश्वराच्या पायाशीच शरण असला पाहिजे’, असे सांगतात. याचे कारण अज्ञानी भक्ताला सांगितले की, तू भगवानच आहेस, तर त्याचा अहंकार वाढेल. प्रत्यक्षात मात्र भक्त भगवान होतो. भक्त असतांना तो अव्यक्त भगवानच असतो; परंतु भक्ताला ‘तू भगवान होऊच शकत नाहीस’, अशी … Read more
‘स्वतःचे ‘मी’पण नाहीसे करणे सर्वांत कठीण असते. कवीश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर यांनी एका कवितेत लिहिले आहे, ‘मी जन्मोजन्मी भगवंताचा शोध घेत होतो. एकदा भगवंताच्या दारी पोचलो. दार ठोठावणार इतक्यात घाबरलो; कारण भगवंताला भेटल्यानंतर माझा ‘मी’पणा नाहीसा होईल. मीच उरणार नाही तेव्हापासून मी भगवंताचा पत्ता ठाऊक असूनही ‘भगवंत नाही’, अशा ठिकाणी भगवंताचा शोध घेत भटकत असतो.’ – … Read more
‘जो इतरांचा विचार करतो, त्याला स्वतःचा विचार करण्याची आवश्यकता उरत नाही; कारण देवच त्याचा विचार करतो.’
‘कलियुगात साधना करणार्या व्यक्ती सापडणे कठीण आहे आणि साधना करणारे साधक भेटणे त्याहूनही कठीण आहे. एखाद्या कुटुंबातील एक साधक साधनेत असेल, तरी तो साधक आणि त्याचे कुटुंब यांची केवढी मोठी पुण्याई आहे. त्या पुण्याईला कृतज्ञतापूर्वक नमस्कार करण्यासाठी आपल्याला त्या साधकांना भेटावे लागते.’
‘माझ्याकडे कुणी लक्ष देत नाही’, असा विचार करायला नको. आपण जे काही करतो, त्या प्रत्येक गोष्टीची नोंद देवाकडे होत असते. आपल्याला असे वाटणे; म्हणजे आपल्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. आपल्या संदर्भात जे काही घडते, ते चांगल्यासाठीच घडते. देव कधीच चुकीचे करणार नाही. ‘देव आणि मी’, याकडेच आपण लक्ष द्यायचे. ‘कोण कसे वागते ?’, याकडे लक्ष … Read more
‘देवाच्या नियोजनाप्रमाणे ईश्वरी राज्य जेव्हा यायचे, तेव्हाच येणार आहे. ती अपेक्षाही नको. साधकाने ईश्वरी राज्याच्या स्थापनेचे ध्येय ठेवून साधना करायला नको. ‘मला ईश्वर हवा आहे’, या ध्येयासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे. काळानुसार ईश्वरी राज्याची स्थापना होणारच आहे. त्यासाठी आपण वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. साधना करतांना साधकाची सात्त्विकता वाढल्यावर त्याचे फळ म्हणून आपोआपच ईश्वरी राज्याची स्थापना … Read more
अ. परात्पर गुरु डॉक्टर काही वेळा त्यांनी स्वतः केलेले लिखाण मला पडताळण्यासाठी देतात. मी त्यामध्ये काही लहानसहान सुचवले असले, तरी ते साधकांना सांगतात, ‘‘बरे झाले. आता लिखाण अजून परिपूर्ण झाले.’’ ‘सनातनचे कोणतेही कार्य परिपूर्ण व्हायला हवे’, ही त्यांच्यासारखी तळमळ आपणही ठेवली, तर दुसर्यांनी आपल्या सेवेत चुका दाखवल्यास आपल्याला वाईट वाटणार नाही. आ. ‘चुकांतून देव आपल्याला … Read more