साधनेत पुढे जाण्यासाठी नेहमी पुढील टप्प्याचे गुरु आवश्यक !

‘साधना करतांना गुरु त्यांच्या शिष्याला अधिकाधिक स्वतःच्या आध्यात्मिक स्तरापर्यंत आणू शकतात, उदा. संत ७० टक्के, सद्गुरु ८५ टक्के, तर परात्पर गुरु ९० टक्के पातळीपर्यंत घेऊन जाऊ शकतात. ९० टक्के पातळीच्या पुढे ईश्वरच पुढील मार्गदर्शन करतो. त्यामुळे साधना करणार्‍याला संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांची त्या त्या टप्प्याला आवश्यकता असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.११.२०२१)

स्वभावदोष आणि अहं असणा-यांमुळे त्रस्त होऊ नका, त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगून त्यांना साहाय्य करा !

‘स्वभावदोष आणि अहं असणार्‍या व्यक्तीच्या आपण संपर्कात येतो, त्या वेळी तिच्या स्वभावदोषांमुळे होणार्‍या दुष्परिणामांनी आपण त्रस्त होतो अन् प्रसंगी तिला रागवतोही. येथे लक्षात घेतले पाहिजे की, त्या व्यक्तीच्या कधीतरी संपर्कात आल्यावर आपल्यावर इतका परिणाम होतो, तर त्या व्यक्तीला त्या दोषांमुळे किती अडचणी येत असतील ! त्यामुळे मनात तिच्याविषयी सहानुभूती ठेवून तिला दोष निर्मूलन करण्यासाठी साहाय्य … Read more

मनुष्यजन्मात साधना करण्याचे महत्त्व

‘अनेक जन्मांनंतर मनुष्यजन्म लाभतो आणि ‘अनेक जन्म केलेल्या साधनेचे फळ’ म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांसारखे ‘गुरु’ त्या मनुष्यजिवाच्या जीवनात येतात. मनुष्याचे आयुष्य पुष्कळ अल्प आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना याची सतत जाणीव करून देतात आणि मनुष्याच्या जन्माचे सार्थक करून घेण्यासाठी साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्यासाठी ते साधकांना साधना शिकवतात. जोपर्यंत आपण … Read more

कलियुगात कर्मयोग अथवा ज्ञानयोग साधनामार्ग जवळचे का वाटतात ?

‘कलियुगात प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर तोलून-मापून पाहिली जाते. परिणामी माणसाची श्रद्धा उणावली आहे. त्यामुळे साधनेत ‘श्रद्धा’ हा मूलभूत घटक असणार्‍या भक्तीयोगानुसार साधना करणे कठीण जाते. त्या तुलनेत कर्मयोग अथवा ज्ञानयोग हे बुद्धीने समजत असल्यामुळे सध्याच्या काळात हे साधनामार्ग सर्वसाधारण साधकांना जवळचे वाटतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.११.२०२१)

अध्यात्म अनंताचे शास्त्र आहे !

आता माझे वय ७९ वर्षे आहे. गेली ४० वर्षे मी अध्यात्माचा अभ्यास केला. आताही प्रतीदिन ८-१० घंटे अभ्यास करत असतांना माझ्या लक्षात आले की, अध्यात्माच्या अनंत ज्ञानापैकी १ टक्का ज्ञानही मी अजून वाचलेले नाही ! याउलट विज्ञानाच्या एखाद्या शाखेत एखाद्याने पीएच्.डी. (डॉक्टरेट पदवी) मिळवली, तर तो स्वतःकडे अभिमानाने पहातो आणि ‘इतरांनीही महत्त्व द्यावे’, असे त्याला … Read more

देव केवळ भक्तांना साहाय्य करतो, तसे संत त्यांच्या कुटुंबियांना नाही, तर त्यांच्या भक्तांना साहाय्य करतात !

‘देवता सर्वच मनुष्यांना साहाय्य करत नाहीत. एखादी व्यक्ती त्या देवतेची भक्ती करू लागली की, ती देवता तिचे पूर्ण दायित्व घेते. त्या भक्ताच्या जीवनात येणार्‍या अडीअडचणींचा त्याच्या साधनेवर परिणाम होऊ नये; म्हणून देवता त्याला साहाय्य करते. संतांचे कार्यही असेच असते. संत त्यांच्या भक्तांच्या साधनेत खंड पडू नये, यासाठी त्यांना सर्वतोपरी साहाय्य करतात; पण ते कधीही ‘माझे … Read more

‘अध्यात्म जाणणे आणि जगणे’ म्हणजे काय ?

अध्यात्मात जे शिकलो, ते लगेच कृतीत आणणे, हेच ‘अध्यात्म जाणणे आणि जगणे’ आहे ! ईश्वराप्रती असलेल्या भावानेच अध्यात्मशास्त्र जाणता येते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

अध्यात्मशास्त्र हे एका अथांग सागराप्रमाणे अमर्याद आहे

अध्यात्मशास्त्र हे एका अथांग सागराप्रमाणे अमर्याद आहे. अध्यात्मात शिकू तेवढे अल्प आहे. शिकण्यासाठी अनेक जन्मही अपुरे पडतील. त्यामुळे अध्यात्माचा बुद्धीने अभ्यास करण्यापेक्षा त्यामधील तत्त्व ओळखून त्यामागील शास्त्र जाणून घ्यायला हवे. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

अध्यात्म सुंदर आहे

अध्यात्म सुंदर आहे. ते जगणे आणि अनुभवणे, म्हणजे साक्षात् ईश्वराची अनुभूती घेणे ! -श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ