श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा साधकांच्या चपलांप्रतीचा उच्च भाव !

आपल्या साधकांच्या चपला म्हणजे ‘गुरुपादुका’च आहेत. ‘वस्तू काय आहे ? कुणाची आहे ?’, यापेक्षा त्या वस्तूप्रतीचा भाव महत्त्वाचा आहे. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (२८.४.२०२०)

खरी ‘देवपूजा’

‘सेवा करतांना एखादी चूक झाल्यावर त्यासाठी लगेच क्षमायाचना करणे, प्रायश्चित्त घेणे आणि ती चूक पुन्हा न होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे’, हीच खरी ‘देवपूजा’ आहे. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (२८.४.२०२०)

मंदिराच्या विश्वस्तांनी दर्शनार्थींना दर्शन घेऊ देण्यासह साधनाही शिकवली तर त्यांना विश्वस्तपद शोभून दिसेल !

‘मंदिराच्या विश्वस्तांनो, दुकानदार गिर्‍हाईकाकडून पैसे घेऊन त्याला वस्तू देतो. तसे मंदिरवाले दर्शनाआधी किंवा नंतर पैसे घेतात. अशी हल्लीची स्थिती झाली आहे. दर्शनार्थींना दर्शन घेऊ देण्यासह साधनाही शिकवली, तरच दर्शनार्थींना काहीतरी दिल्यासारखे होईल आणि तुम्हाला विश्वस्तपद शोभून दिसेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संतांकडे सकाम साधना करणारे सहस्रो भक्त असतात; पण ईश्वरप्राप्तीसाठी फारतर १ – २ शिष्यच असतात !

‘बहुतांश संत हे व्यष्टी प्रकृतीचे असतात. ते मानसिक स्तरावर राहून येणार्‍यांची व्यावहारिक दुःखे दूर करण्यावरच भर देतात. ते त्यांच्याकडे येणार्‍यांकडून ईश्वरप्राप्तीसाठी साधना करून घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे येणार्‍या भक्तांमध्ये ‘स्वतःच्या व्यावहारिक अडचणी सुटाव्यात’, यासाठी येणार्‍या भक्तांचीच संख्या अधिक असते. त्या संतांकडून साधना शिकून शिष्य पदापर्यंत पोचणारे क्वचितच १ – २ जणच असतात. बर्‍याचदा संतांच्या पश्चात … Read more

सनातनच्या सत्संगात आनंद जाणवण्याचे कारण

‘एखाद्या संप्रदायाच्या संतांचे मार्गदर्शन, दर्शनसोहळा असला की, त्यांच्याकडे येणारे भक्त केवळ त्यांच्या आर्थिक, सांसारिक, शारीरिक आणि मानसिक या स्तरांवरील अडचणी मांडतात. आध्यात्मिक दृष्टीकोनातून बघितल्यास मनुष्याचे हे सर्व त्रास त्याच्या प्रारब्धानुसार असतात. यामुळे सनातनमध्ये प्रारब्धावर मात करण्यासाठी किंवा प्रारब्ध तीव्र असल्यास ते सहन करण्यासाठी योग्य अशी साधना शिकवली जाते. सनातनचे साधक निष्काम साधना करत आहेत. सनातनच्या … Read more

मनोलय झालेल्या संतांच्या कृतीचा मानसिक स्तरावर अर्थ काढू नये !

‘काही वेळा काही संतांचे वागणे बघून काहींना वाटते, ‘यांना मनोविकार झाला आहे का ?’ अशा वेळी हे लक्षात घेतले पाहिजे की, संतांचा मनोलय झालेला असल्यामुळे त्यांना कधीच मनोविकार होत नाही. त्यांचे वागणे हे त्या परिस्थितीला आवश्यक किंवा त्यांच्या प्रकृतीनुसार असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संत हे ईश्वराचे सगुण रूप असल्यामुळे त्यांच्या वागण्याचा कार्यकारणभाव सर्वसाधारण व्यक्तीला कळणे … Read more

शिकवणारे संत आणि सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणारे सनातनचे संत !

‘बहुतेक संत त्यांना ‘संत’ ही उपाधी प्राप्त झाल्यानंतर शिकवण्याच्या स्थितीत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून ‘पुढील टप्प्याची साधना शिकणे, साधनेतील विविध पैलू अन् त्यांतील बारकावे विचारून आत्मसात करणे’, हा भाग होत नाही. याउलट सनातनच्या संतांना ‘अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे’, हे माहीत असल्यामुळे ते सतत शिकण्याच्या स्थितीत रहातात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.११.२०२१)

अध्यात्मामध्ये स्त्रिया पुरुषांपेक्षा पुढे असण्याचे एक कारण

‘बहुतांश पुरुष त्यांच्या कामामिमित्त रज-तमप्रधान असणार्‍या समाजामध्ये वावरत असतात. त्यांच्यावर त्याचा परिणाम होऊन तेही रज-तमयुक्त होतात. याउलट बहुतांश स्त्रिया घरीच असल्यामुळे त्यांचा समाजातील रज-तमाशी संपर्क येत नाही. त्यामुळे त्या साधनेत लवकर पुढे जातात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१४.११.२०२१)

कुठे भारतात अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येणारे विदेशी तर कुठे संत अन् अध्यात्म यांचे मूल्य न कळलेले हिंदू !

‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात. तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले