अध्यात्माच्या मार्गाने जातांना दुस-यांना आनंद दिल्यावर साधनेत प्रगती होते ! 

‘आतापर्यंत जगत आलेले मायेतील आयुष्य संपवून, सर्वसंगपरित्याग करून अध्यात्माच्या मार्गाने जातांना सतत दुसर्‍यांना आनंद देण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तेव्हाच साधनेत प्रगती होते. दुसर्‍यांना आनंद देता देता आपल्याला गुरुकृपेने केव्हा ‘सत्-चित्-आनंदाची अनुभूती येऊ लागते’, ते कळतही नाही. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (१९.४.२०२०)

जीवनात आलेली संकटे दूर होण्यासाठी देवाला प्रार्थना केल्याने ती दूर करण्यासाठी जप खर्च होतो आणि त्यामुळे ईश्वरप्राप्तीसाठी जप करूनही ईश्वरप्राप्ती होत नाही !

‘एका भक्ताने ३० वर्षांत १३ कोटी रामनामाचा जप केला, तरी त्याला श्रीरामाचे दर्शन झाले नाही कारण त्याने जीवनात आलेली संकटे दूर होण्यासाठी देवाला प्रार्थना केल्याने ती दूर करण्यासाठी त्याचा जप खर्च झाला आणि त्यामुळे ईश्वरप्राप्तीसाठी जप करूनही त्याला ईश्वरप्राप्ती झाली नाही. यातून हे शिकायला मिळते की, सकाम प्रार्थना स्वेच्छेच्या अंतर्गत येत असल्याने ती केली की, … Read more

सनातन संस्था शिकवत असलेली समष्टी साधना ही काळानुसार आवश्यक साधना असणे

‘सध्या अनेक संत आणि संप्रदाय त्यांच्या भक्तांना वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी भजन, कीर्तन, नामजप, ध्यान यांसारख्या विविध साधना शिकवतात. यातून केवळ साधना करणार्‍या व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती होते. ती व्यष्टी साधना होते. सध्याच्या काळात राष्ट्र आणि धर्म यांवर सर्व बाजूंनी आक्रमण होत असतांना ‘मी आणि माझी साधना’ या कोषात राहिलो, तर धर्म आणि राष्ट्र यांचा नाश होईल. … Read more

कृतज्ञता व्यक्त करणे !

‘जन्मल्यापासून आतापर्यंत प्रत्येक प्रसंगात देवाने मला कसे साहाय्य केले ?’ तसेच ‘तो मला साधनेत सतत साहाय्य करत आहे’, हे आठवून सतत कृतज्ञता व्यक्त करावी. कृतज्ञता व्यक्त केल्याने ‘भगवंतच सर्वकाही करत आहे’, हा संस्कार अंतर्मनावर होऊन अहंभाव अल्प होण्यास साहाय्य होते.’ – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)

सत्ययुगाचे महत्त्व !

‘सत्ययुगात नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींची आवश्यकताच नव्हती; कारण वाईट बातम्या नसायच्या आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

मनमोकळेपणा आणि आध्यात्मिक मित्र

‘मनमोकळेपणाने मनातील विचार त्वरित उत्तरदायी साधक किंवा संबंधितांना सांगावेत. शब्दांत मांडता येत नसल्यास विचार लिहून उत्तरदायी साधकांना द्यावेत. आपण आपल्या मनातील जे विचार इतरांना सांगू शकत नाही, अशा विचारांचा निचरा होऊन मन शांत होण्यासाठी ‘आध्यात्मिक मित्र किंवा मैत्रीण’ असल्यास त्यांच्याशी बोलावे. त्यामुळे मनावरील ताण अल्प होतो.’ – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. … Read more

स्वतःतील दोष दूर करण्याचे महत्त्व

‘दुसर्‍याचे दोष शोधण्यासाठी आपण जितकी बुद्धी व्यय (खर्च) करतो, तेवढी आपण स्वतःचे दोष शोधण्यात व्यय केल्यास आपण दुःख-दौर्बल्यापासून मुक्त होऊ’, असे उपनिषदांनी म्हटले आहे. आपले दोष आपल्याला दिसत नाहीत; पण आपल्याकडून दुसर्‍याचे दोष मात्र अचूकपणे शोधले जातात. आपले दोष जाणणाराच ‘विवेकी’ होय ! आपले दोष निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केल्यासच ते नाहीसे होण्याची शक्यता असते; अन्यथा … Read more

विवेक

‘देहाचे पांघरूण वस्त्र आणि माझे पांघरूण देह. त्यामुळे ‘माझ्या भानासह ‘मी’ देहाहून अगदीच भिन्न असणारा आहे’, असे वाटणे म्हणजेच विवेक.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : ‘श्रीधर – संदेश’, जुलै २००२)

आत्मनिवेदन

‘आत्मनिवेदनाच्या माध्यमातून मनातील सर्व विचार भगवंताला सांगण्याची सवय लावावी. आत्मनिवेदनामुळे मन हलके होण्याच्या समवेत ईश्‍वराशी अनुसंधानही साधले जाते.’ – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)

भगवंताची लीला अनुभवून कृतज्ञता व्यक्त करणे

‘मी काहीही खाल्ले, तरी त्याचे रक्त बनते, ही किमया कोण करू शकतो ? माझा प्रत्येक श्‍वास कुणामुळे अखंड चालू आहे ? मोठ्या अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून माझे प्रत्येक क्षणाला कोण रक्षण करतो ?’, यांसारख्या प्रश्‍नांची उत्तरे शोधल्यास भगवंताची लीला अनुभवता येऊ शकते. यांसाठी दिवसातून मी किती वेळा कृतज्ञता व्यक्त करतो ?’, याचाही विचार करावा.’ – (सद्गुरु) … Read more