ज्यांच्या माध्यमातून चमत्कार घडतात, त्यांच्यावर होणारे आध्यात्मिक परिणाम !

१. कमी आध्यात्मिक पातळीचे : ‘मी हा चमत्कार घडवला’, असे वाटून त्यांचा अहंकार वाढतो. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक पातळी अल्प होत जाते. २. अधिक आध्यात्मिक पातळीचे : ‘ईश्वराने हा चमत्कार घडवला’, याची जाण असल्याने त्यांचा ईश्वराप्रतीचा भाव वाढत जातो. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक पातळी वाढत जाते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.१०.२०२१)

शिकण्याच्या स्थितीत रहाणे – साधनेला अत्यंत पोषक घटक !

१. शिकण्याची स्थिती ‘सत्संग, बैठक, प्रसार, संपर्क अथवा एखादी सेवा केल्यानंतर ‘मला काय शिकायला मिळाले ?’, असा विचार माझ्या मनात लगेच येतो का ?’, असा विचार मनात येणे, म्हणजेच शिकण्याच्या स्थितीत रहाणे होय. हे साधनेला अत्यंत पोषक आहे. अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. अनंत काळ शिकत राहिले, तरी शिकणे पूर्ण होऊ शकत नाही. भगवंत साधकांना … Read more

संत कोणत्या नात्यांशी जोडलेले असतात ?

‘संत हे पत्नी, मुले इत्यादी मायेतील नात्यांशी जोडलेले नसतात, तर ते गुरु, गुरुबंधू, शिष्य यांसारख्या आध्यात्मिक स्तरावरील नात्यांशी जोडलेले असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.११.२०२१)

अध्यात्म आणि संस्कृत भाषा यांचा संबंध

‘विज्ञानाची भाषा इंग्रजी आहे, तर अध्यात्माची भाषा संस्कृत आणि संस्कृतोद्भव भाषा आहेत. यामुळे ईश्वरप्राप्ती करू इच्छिणार्‍यांनी संस्कृत किंवा संस्कृतोद्भव भाषेतच अध्यात्म शिकावे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.११.२०२१)

पालकांनो, मुलांच्या जीवनाचे सार्थक होण्यासाठी त्यांना साधना शिकवा !

‘पालक त्यांच्या मुलांमध्ये कला-गुणांचा विकास व्हावा; म्हणून त्यांच्या आवडीनुसार संगीत, नृत्य यांसारख्या कलांचे शिक्षण देतात; परंतु फारच थोडे पालक मुलांच्या जन्माचे सार्थक व्हावे, या उद्देशाने त्यांना साधना शिकण्यास साहाय्य करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.१०.२०२१)

देव आणि भक्त यांच्या जोड्यांमध्ये ‘राम-हनुमान’ हे अधिक जवळचे वाटण्याचे कारण

‘माझ्या खोलीतील देवघरात राम पंचायतनाचे चित्र आहे. त्या चित्राकडे बघून ‘राम-हनुमान’, असे १० वेळा म्हटल्यावरच भावजागृती होऊन माझी छाती भरून आली. असा अनुभव देवघरातील अन्य देवतांच्या संदर्भात आला नाही. यातूनच ‘राम-हनुमान’ हे देव आणि भक्त म्हणून जास्त जवळचे वाटतात, हे लक्षात येते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.८.२०२१)

म्हातारपणात स्वतःची मुले नाहीत, तर साधना हाच खरा आधार !

‘सध्याच्या काळात आई-वडील मुलांना वाढवतांना त्यांच्या मनात ‘मुले आपल्याला म्हातारपणी सांभाळतील’, असा सुप्त विचार कुठेतरी असतो. प्रत्यक्षात मुलगा मोठा झाला की, तो नोकरीसाठी दुसर्‍या गावी जातो आणि मुलगी सासरी जाते. शेवटी वय झालेल्या आई-वडिलांच्या मुलांच्या संदर्भातील आशा-आकांक्षांवर पाणी पडते. ही वस्तूस्थिती पहाता प्रश्न पडतो, ‘आई-वडील आपल्या आयुष्यातील उमेदीची ३० – ३५ वर्षे अशा खोट्या आशा-आकांक्षांसाठी … Read more

भगवंताचा भक्त होणे श्रेष्ठ !

‘राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या मोठ्या संघटनेचे पद मिळण्यापेक्षा भगवंताचा भक्त होणे चांगले !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चरणांवर डोके टेकवतात आणि हात आशीर्वाद देतात !

‘चरणांवर डोके टेकवून नमस्कार करण्याची पद्धत आहे. चरणांना हा मान मिळत असल्याने हातांनी चरणांना विचारले, ‘सर्व जण तुझ्याच पाया का पडतात ?’ तेव्हा चरणांनी हातांना पुढील दोन प्रकारे समजावले. १. ‘मी भूमीवर असतो; म्हणून सर्व जण माझ्यावर डोके टेकवून नमस्कार करतात. त्यासाठी तुलाही भूमीवर यावे लागेल. भूमीवर यावे लागेल, म्हणजे अहं न्यून करावा लागेल. अहं … Read more

साधनेतील प्राथमिक टप्प्यात स्त्रियांची प्रगती लवकर होते; परंतु ठराविक टप्प्यानंतर त्या मायेत अडकत असल्याने पुरुष संतांची संख्या अधिक असते !

स्त्रियांमध्ये भाव असल्याने साधनेतील प्राथमिक टप्प्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांची प्रगती लवकर होते. नंतर पुरुष लवकर संत होतांना दिसून येतात; कारण स्त्रियांपेक्षा पुरुष मायेत अल्प प्रमाणात अडकलेले असतात. स्त्रीला तिचा नवरा, मुले-बाळे, नातवंडे या सर्वांविषयीचे विचार मायेत अडकवतात. त्यामुळे तिचा अध्यात्मात पुढे जाण्याचा वेग काही ठराविक टप्प्यानंतर मंदावतो; म्हणून अध्यात्मात स्त्रिया संत होण्याची संख्या त्यामानाने अल्प असते. … Read more