विद्या हेच आत्मज्ञान !

‘साधना करतांना साधकाने साधनेच्या स्तरावरील कितीही कृती केल्या, तरी ज्या वेळी त्याला आत्म्याच्या खर्‍या स्वरूपाचे ज्ञान होते, तेच सर्वश्रेष्ठ असते. हे ज्ञान विविध विद्यांच्या माध्यमांतूनच होत असते. ’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (११.१.२०२२)

व्यष्टी साधना चांगली होण्यासाठी कुलदेवतेची उपासना उपयुक्त

‘प्रत्येक मनुष्य प्रारब्ध भोगण्यासाठी जन्माला येत असतो. हे प्रारब्ध भोगण्यासाठीचे बळ केवळ कुलदेवतेचे दर्शन, तिचा नामजप करणे, कुलाचारांचे पालन यांसारख्या उपासनेमधून मिळत असते. यासाठी साधनेचा प्रारंभ कुलदेवतेच्या उपासनेपासूनच करावा. हा साधनेचा प्राथमिक नियम आहे, जो सर्वांसाठी सारखाच लागू पडतो. कुलदेवता ज्ञात नसल्यास ‘श्री कुलदेवतायै नमः ।’, असा तिचा नामजप करावा.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले … Read more

देवतेच्या व्यापक रूपाची उपासना कठीण असल्यामुळे तिच्या प्रचलित रूपाचीच उपासना करावी !

‘एखाद्या देवतेचे विश्वव्यापी, सहस्रमुख, सहस्रहस्त यांसारखे व्यापक रूपाचे वर्णन वाचले की, तिच्या अशा रूपाची उपासना करावी, असे काही जणांना वाटते; परंतु यामध्ये लक्षात घेतले पाहिजे की, या रूपाची कल्पना करणे शक्य होत नाही. कल्पना केली, तरी त्या रूपाची शक्ती सहन करता येत नाही. त्यामुळे देवतांच्या अशा व्यापक स्तरावरील रूपाची उपासना करणे कठीण जाते. यासाठी देवतांची … Read more

अनुभूतीवरून नामजप तारक आहे कि मारक, हे ओळखावे !

‘नामजप हे तारक आणि मारक अशा दोन पद्धतींचे असतात. नामजप ऐकतांना भावजागृती होऊ लागल्यास तो तारक पद्धतीचा असतो आणि शक्ती जाणवू लागल्यास तो मारक पद्धतीचा असतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२२.९.२०२१)

नेहमी सत्संगात रहावे !

‘व्यवहारात ‘मातृवत् परदारेषु परद्रव्येषु लोष्ठवत् ।’ म्हणजे ‘परस्त्रीला मातेसमान आणि परधनाला मातीच्या ढेकळासमान मानावे.’ ही दृष्टी कधीच घालवू नये. ‘अति तेथे माती’ म्हणजे ‘कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानीकारक असतो.’ निसरड्यावर जपून चालावे. गृहस्थाला परस्त्री आणि परधन विष होय. याविषयी निःस्पृहांना दोन्हीकडचा ‘पर’ शब्द काढून ‘स्त्री आणि धन विष आहे’, असे सांगितले म्हणजे पुरे ! विषाची परीक्षा … Read more

एखादी कृती करता न येणे, यामागची प्रमुख दोन कारणे

१. एकतर मुळातच त्या कृतीविषयी काही माहिती नसणे. २. ती न करण्यामागे अहं, आळशीपणा किंवा ती कृती करण्यास न आवडणे, यांसारखे स्वभावदोष आड येणे. उपाय – कृती करता न येण्यामागचे मूळ कारण शोधून त्यानुसार प्रयत्न करणे आणि ती कृती करतांना देवाला प्रार्थना करणे : साधकांनी ‘यांपैकी नक्की कोणते कारण आहे ?’, याचे चिंतन करावे आणि … Read more

आपले बोलणे कसे असावे ?

आपले बोलणे असे असावे की, जे दुसर्‍याला साधनेत प्रोत्साहन देऊन गुरुसेवेत पुढे नेईल ! प्रत्येकाचा आनंद शोधून त्याच्याच भाषेत साधनेला धरून त्याच्याशी बोलायला हवे. यालाच ‘प्रकृतीशी जुळवून घेणे’, असे म्हणतात. त्यामुळे समोरच्याशी पटकन जवळीक साधता येते आणि संबंधित कार्याची फलनिष्पत्तीही वाढते. ‘दुसर्‍याला काय सांगायचे आहे ?’, हे मनाशी ठरवून त्याला चूक जरी सांगायची असली, तरी … Read more

सर्व पृथ्वीलाच घर बनवा

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला सर्व पृथ्वीलाच घर बनवण्याचे ध्येय दिले आहे. आता सर्व विश्‍व हाच आमचा संसार आहे. गुरूंच्या कृपेने आता आम्हाला वेगळे घर आणि नातेवाईक राहिले नाहीत. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

खरे गुरुस्मरण

‘गुरूंचे कार्य पुढे नेणे आणि त्यासाठी कसलाही विचार न करता तळमळीने झोकून देऊन साधना करणे’, हेच गुरूंचे खरे स्मरण आहे. आपण गुरूंच्या कार्याचा विचार केला, तरच देवही आपला विचार करतो. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

कृतज्ञता व्यक्त केल्यास कर्तेपणा नष्ट होईल

‘भगवंत (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला सेवा उपलब्ध करून देतो. माझ्याकडून सेवा करवूनही घेतो; परंतु सेवा झाल्यावर कर्तेपणाच्या विचारांमुळे ‘ती सेवा मी केली’, असे साधकाला वाटते. कर्तेपणा नष्ट करण्यासाठी प्रत्येक सेवेची संधी दिल्याविषयी, सेवा करण्यापूर्वी आणि झाल्यानंतर ‘ती देवानेच करवून घेतली आहे’, यासाठी कृतज्ञता व्यक्त केल्यास कर्तेपणा नष्ट होऊन त्या सेवेतून आपली साधना होईल.’ – … Read more