साधना सर्वांना सर्वस्वाचा त्याग करायला शिकविते

‘धर्म त्याग शिकवतो, तर राजकारण स्वार्थ शिकवते; म्हणून भ्रष्टाचार इत्यादी प्रकार वाढत गेले आहेत. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सर्वांना सर्वस्वाचा त्याग शिकवणारी साधना शिकवणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘पंडित’ कोणाला म्हणावे ?

सत्-असत् जाणणारा आणि ज्याच्यामध्ये विवेकबुद्धी आहे, अशा विवेकी पुरुषाला ‘पंडित’ म्हणतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.१.२०२२)

अध्यात्मात साधनेचा आरंभ कसा होतो ?

‘अध्यात्मात साधनेचा आरंभ, म्हणजे ‘अ’ (A) असे काही नसते. ज्याच्या त्याच्या पातळीप्रमाणे आणि साधनामार्गाप्रमाणे प्रत्येकाच्या साधनेचा आरंभ होतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२९.१२.२०२१)

हिंदूंच्या दु:स्थितीमागील कारण !

‘मशिदी आणि चर्च यांमध्ये साधना शिकवतात अन् करून घेतात. हिंदूंच्या एकाही देवळात असे करत नसल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सध्याच्या काळातील काही सुखलोलूप मनुष्य म्हणजे केवळ ‘देहधारी मनुष्यप्राणी’ !

‘बहुतांश जण आयुष्यातील प्रत्येक कृती करतांना ‘मला यातून अजून सुख कसे मिळेल ?’, यासाठीच धडपड करतात. देवाने इतर प्राण्यांच्या तुलनेत मनुष्याला साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्यासाठीचे क्रियमाणकर्म दिले आहे; परंतु ते वापरत नसल्यामुळे त्यांचे जीवन किडा-मुंगीप्रमाणे केवळ स्वतःच्या सुखासाठी जगण्यासारखे झाले आहे. त्यामुळे सध्याच्या काळातील असे मनुष्य म्हणजे ‘देहधारी मनुष्यप्राणी’ झाले आहेत.’ – (परात्पर … Read more

साधनेत स्थुलातील चुका सांगण्याचे महत्त्व !

‘साधनेमध्ये मनाच्या स्तरावर होणारी अयोग्य विचारप्रक्रिया ही अधिक बाधक असते. अंतर्मुखतेच्या अभावामुळे साधकाला स्वतःच्या चुका कळत नाहीत आणि त्या मनाच्या स्तरावरील चुका असल्यामुळे इतरांच्या लक्षात येत नाहीत. ही विचारप्रक्रिया अयोग्य कृतीच्या माध्यमातून व्यक्त होत असते. त्यामुळे या अयोग्य कृतीची जाणीव संबंधिताला करून दिल्यास त्याला त्याच्या अयोग्य विचारप्रक्रियेची जाणीव होण्यास साहाय्य होते, उदा. एका साधकाच्या मनातील … Read more

हिंदूंची दुःस्थिती आणि त्यावरील एकमेव उपाय, म्हणजे त्यांनी साधना करणे !

पूर्वीच्या काळी हिंदू धर्माचरणी आणि धर्माभिमानी होते. त्यामुळे त्यांना ‘धर्माे रक्षति रक्षितः ।’ (मनुस्मृति, अध्याय ८, श्लोक १५) म्हणजे ‘धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म, म्हणजेच ईश्वर रक्षण करतो.’, हे लागू होत होते. सध्याच्या काळात हिंदू धर्माचरण करत नाहीत आणि त्यांच्यामध्ये धर्माभिमानही नाही. त्यामुळे ‘येणार्‍या आपत्काळात तुमचे रक्षण होण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी साधना करा’, असे त्यांना … Read more

गोपींचे प्रेम !

‘गोपींचे कृष्णावरील प्रेम त्याच्या देहावर (शारीरिक स्तरावरचे) नसून त्याच्या मनावर (आध्यात्मिक स्तरावरचे) होते. त्यामुळे त्या एकमेकींशी भांडत नसत. त्यांच्यात एकमेकींबद्दल प्रेमच होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१८.१.२०२२)

कर्मयोग आणि भक्तीयोग यांच्या तुलनेत ज्ञानयोग हा आचरण्यास कठीण !

‘कर्मयोगात कृतीचा भाग अधिक असल्यामुळे तो शारीरिक स्तरावरील होतो. भक्ती ही मनाची अवस्था असल्यामुळे भक्तीयोग मानसिक स्तरावरील आहे, तर ‘ज्ञान’ हे बुद्धीशी संबंधित असल्यामुळे ज्ञानयोग बौद्धिक स्तरावरील होतो. त्यामुळे कर्मयोग आणि भक्तीयोग यांच्या तुलनेत ज्ञानयोग हा आचरण्यास कठीण आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (११.१.२०२२)