‘संत’ ही जगातील सर्वोच्च पदवी !

‘भारतरत्न, नोबेल इत्यादी मानवाने दिलेल्या पारितोषिकांचे ‘संत’ या ईश्वराने दिलेल्या पदवीपुढे काय मूल्य आहे ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

व्यवहार आणि साधना यांमधील भेद

‘व्यवहारात अधिकाधिक कमावणे असते, तर साधनेत सर्वस्वाचा त्याग असतो; म्हणून व्यवहारातील माणसे दुःखी असतात, तर साधक आनंदी असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

नोकरी करायची असेल, तर कुणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा !

‘नोकरी करायची असेल, तर कुणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा. देव नोकरीबद्दल थोडेसे काहीतरी देण्यापेक्षा सर्वकाही देईल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

इतर विषयांवरील लिखाणापेक्षा आध्यात्मिक विषयांवरील लिखाण महत्त्वाचे !

‘एखाद्या संस्थेचा अध्यक्ष, पदाधिकारी असणे किंवा वृत्तपत्राचा संपादक असणे, हे खूप मानाचे समजले जाते. या दोन्ही पदांचा विचार केला, तर समाजामध्ये आजवर अनेक संस्थांचे नामवंत पदाधिकारी, तसेच नामवंत संपादक होऊन गेले आहेत. अनेक पदाधिकार्‍यांनी त्यांच्या संस्थांच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्ये केली आहेत, तसेच अनेक संपादकांनी त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून जनप्रबोधनाचे कार्य केले आहे. असे असले, तरी … Read more

कार्यपूर्तीसंदर्भात प्रयत्न आणि यज्ञयाग यांचे महत्त्व

‘प्रयत्नांमुळे योग (एखादी घटना घडण्याचा काळ) पालटता येतो. यज्ञयाग करूनही योग (एखादी घटना घडण्याचा काळ) पालटता येतो’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.२.२०२२)

तिस-या महायुद्धाच्या काळात वाचण्यासाठी साधना करा !

‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक ३१ अर्थ : माझा भक्त नाश पावत नाही. भक्ताला, साधना करणार्‍यालाच देव वाचवतो. हे लक्षात घेऊन आतापासून तीव्र साधना करा, तरच देव तिसर्‍या महायुद्धात वाचवील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

कठोर साधनेचे महत्त्व !

‘संत बहिणाबाईंनी ‘अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर । आधी हाताला चटके, तेव्हां मिळते भाकर !’ हे जे व्यावहारिक जीवनाबद्दल सांगितले आहे, ते आध्यात्मिक जीवनालाही लागू पडते – ‘अरे साधना साधना, जसा तवा चुल्ह्यावर । आधी हाताला चटके, मग मिळतो ईश्वर ।’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२४.१.२०२२)

भारताच्या तथाकथित ‘सुधारणावादा’मुळे आध्यात्मिक क्षेत्रात होणारी हानी !

‘स्वातंत्र्योत्तर काळात समाजधुरिणांनी समाजाला ‘अध्यात्म आणि साधना’ हे विषय शिकवलेच नाहीत. तथाकथित ‘सुधारणावादा’च्या नावाखाली त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. लोकशाहीत कायदे सिद्ध करतांनाही याचा विचार केला गेला नाही. त्यामुळे आता एखादा लहान मुलगा त्यांच्या पूर्वजन्मीच्या साधनेच्या संस्कारामुळे या जन्मात साधना म्हणून सेवा करू लागल्यास त्याचे कौतुक होत नाही, उलट त्याच्यावर टीका होऊन तो सात्त्विक जीवही साधना … Read more