सध्याचा प्रतिकूल काळ म्हणजे आत्मचिंतन करण्याचा काळ आहे !

‘अनुकूल काळात नव्हे, तर प्रतिकूल काळातच साधकाच्या साधनेची खरी परीक्षा होते. आपत्कालीन स्थितीत आत्मपरीक्षण करण्याची नामी संधी असते. ‘अशा काळात आपली मनःस्थिती कशी आहे ? प्रतिकूलतेला सामोरे जाण्याची मनाची कितपत सिद्धता आहे ?’, याचे चिंतन करता येते. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेली अमूल्य शिकवण आपल्या अंतर्मनात खरोखरंच रुजली आहे का ?’, याचे मूल्यमापन करणेही सोयीचे जाते. … Read more

देवाच्या कृपेचे महत्त्व !

‘देवाची कृपा अनुभवल्यावर समाजातून कुणी कौतुक केले, तरी त्याची किंमत शून्य वाटते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘साधना’ हीच खरी लस

‘एखादा रोग होऊ नये; म्हणून लसीकरण (व्हॅक्सिनेशन) करतो, तसेच तिसर्‍या महायुद्धाच्या काळात वाचण्यासाठी साधना हीच लस आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अध्यात्मातील संशोधनाचे महत्त्व !

‘विज्ञानाला बहुतेक काहीच ज्ञात नसल्याने एखादा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी सारखे संशोधन करावे लागते. याउलट अध्यात्मात सर्वच ज्ञात असल्याने तसे करावे लागत नाही. अध्यात्मातील संशोधन हे विज्ञानयुगातील सध्याच्या पिढीचा अध्यात्मावर विश्‍वास बसून ती अध्यात्माकडे वळण्यासाठी करावे लागते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

साधनेमुळे कुणाचा हेवा, मत्सर किंवा द्वेष वाटत नाही

‘साधनेमुळे ‘देव पाहिजे’, असे वाटायला लागले की, ‘पृथ्वीवरचे काही हवे’, असे वाटत नाही. त्यामुळे कुणाचा हेवा, मत्सर किंवा द्वेष वाटत नाही, तसेच इतरांसमवेत दुरावा, भांडण होत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

अध्यात्माचे महत्त्व

‘जगातील इतर सर्व विषयांचे ज्ञान अहंकार वाढवते, तर अध्यात्म हा एकच विषय असा आहे की, जो अहंकार अल्प करण्यास साहाय्य करतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘सर्व ईश्वरेच्छेने, म्हणजे आपल्या कल्याणासाठीच होत आहे’, असे केव्हा समजायचे ?

‘गुरु किंवा ईश्‍वर यांच्या चरणी पूर्ण समर्पित झाल्यावर स्वतःविषयीचे विचार पुष्कळ अल्प होतात. आपण सतत ईश्‍वरी अनुसंधानात असलो, तर ईश्‍वराचेही आपल्याकडे लक्ष असते. गुरुचरणी पूर्ण समर्पितता आणि सतत ईश्‍वरी अनुसंधान, असे दोन्ही असल्यावर आपल्याकडून होणारी कृती ईश्‍वरेच्छेने होते. अशी अवस्था असतांना एखाद्या वेळी आपल्या संदर्भात काहीतरी प्रतिकूल जरी घडले, तरी ‘ते ईश्‍वरेच्छेनेच झाले आहे; म्हणून … Read more

ईश्वरप्राप्तीच्या प्रवासात गुरुच साधकांसाठी अधिक प्रमाणात प्रयत्नशील असतात

जो साधक ‘ईश्‍वरप्राप्ती’ हे ध्येय ठेवून प्रामाणिकपणे आपले कर्म करत रहातो, तो चुकला, तरी चालेल; गुरु त्या जिवाचा स्वीकार करतात आणि त्याला शिष्य बनवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात. ईश्‍वरप्राप्तीच्या प्रवासात केवळ साधकच नाही, तर त्याहूनही अधिक गुरुच त्याच्यासाठी प्रयत्नशील असतात. -श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ (१.५.२०२०)

अध्यात्मात चूक असे काही नसते

अध्यात्मात चूक असे काही नसते. प्रत्येक प्रसंग साधकाला घडवण्यासाठी घडतो. ‘प्रसंगातून शिकणे आणि पुढे जाणे’ एवढेच असते. -श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ (१.५.२०२०)