सकाम साधना आणि आनंदप्राप्तीसाठी साधना
‘एखाद्या इच्छेसाठी (सकाम उद्देशाने) कुणी साधना करत असल्यास साधनेमुळे त्याच्या मनातील ती इच्छा गेल्यावर ‘त्याची वासनापूर्तीसाठी साधना होत नाही’, तर आनंदप्राप्तीसाठी साधना होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘एखाद्या इच्छेसाठी (सकाम उद्देशाने) कुणी साधना करत असल्यास साधनेमुळे त्याच्या मनातील ती इच्छा गेल्यावर ‘त्याची वासनापूर्तीसाठी साधना होत नाही’, तर आनंदप्राप्तीसाठी साधना होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘ईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्वरप्राप्ती लवकर होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘सात्त्विक व्यक्तींच्या व्यष्टी जीवनाचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती, तर समष्टी जीवनाचे ध्येय असते रामराज्य !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘आधीच्या युगांत स्वभावदोष अल्प असल्याने एखाद्या साधनामार्गाने साधना करून साधक पुढे जात. कलियुगात स्वभावदोष अनेक असल्याने आधी ते दूर करावे लागतात. मगच साधना करता येते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.६.२०२१)
‘पृथ्वीवरची कामेसुद्धा कुणाची ओळख असल्याखेरीज होत नाहीत, तर प्रारब्ध, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी अडचणी देवाची ओळख असल्याशिवाय देव सोडवील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘डोळ्यांनी जंतू दिसत नाहीत; पण ते सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसतात. त्याचप्रमाणे सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसत नाही, असे सूक्ष्मातीसूक्ष्म जग साधनेने कळते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘नामजपाने दैवी शक्तींचे साहाय्य लाभते. अर्जुन उत्तम धनुर्धर होताच; पण त्याचसमवेत तो श्रीकृष्णाचा भक्तही होता. बाण सोडतांना तो नेहमी श्रीकृष्णाचा नामजप करत असे. त्यामुळे त्याचे बाण आपोआप लक्ष्यवेधी होत असत. श्रीकृष्णाच्या नामजपामुळे अर्जुनाच्या मनातील लक्ष्यवेध घेण्याचा संकल्प सिद्ध होत असे. नामजपाने प्रत्येक कर्म अकर्म होते, म्हणजे त्या कर्माचे पाप-पुण्य लागत नाही. यावरून ‘हिंदु राष्ट्राच्या (सनातन … Read more
पराक्रमी असणार्या पांडवांनाही कौरवांविरुद्धच्या युद्धात श्रीकृष्णाचे साहाय्य घ्यावे लागले, तर श्रीकृष्ण आणि साधना यांविना ‘आम्ही हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना करू’, असे म्हणणे किती हास्यास्पद आहे, हे लक्षात येईल. ‘साधनेचे बळ आणि समर्थ रामदासस्वामींचे मार्गदर्शन असल्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात यशस्वी झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात बहुतेक क्रांतीविरांमध्ये प्रखर राष्ट्राभिमान असूनही साधनेचे बळ … Read more
‘धर्माचरण आणि साधना केल्याने हिंदु धर्माच्या श्रेष्ठत्वाची अनुभूती येते. हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व कळल्यानंतरच खरा धर्माभिमान निर्माण होऊन समाज, राष्ट्र अन् धर्म यांचे खरे हित साधण्यासाठी प्रयत्न होतात. धर्माचरण आणि साधना केल्यामुळे व्यक्ती धर्मनिष्ठ होते. धर्मनिष्ठा असलेली व्यक्ती हिंदु धर्माची हानी स्वतः करत नाही आणि दुसर्यांनी धर्महानी केल्यास ती त्यास विरोध करते; म्हणून धर्मरक्षणाचे खरे कार्य … Read more
‘साधनेचे एक मूलभूत तत्त्व आहे, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग !’ अशी साधना केवळ सनातन संस्थाच शिकवते. प्रत्येकाचा साधनामार्ग, उदा. भक्तीयोग, कर्मयोग, ज्ञानयोग इत्यादी आणि आध्यात्मिक पातळी, वय, शारीरिक क्षमता इत्यादी निरनिराळे असते. त्यामुळे प्रत्येकाची प्रकृती पाहून सनातनमध्ये प्रत्येकाला निरनिराळी साधना सांगितली जाते. डॉक्टर जसे प्रत्येक रुग्णाला निरनिराळे औषध देतात, विद्यार्थी जसे निरनिराळे शिक्षण घेतात, … Read more