देव एका चौकटीत नसून सर्वत्र असल्याने त्याला चौकटीत न शोधता प्रत्येक स्थितीत अनुभवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक

‘देव इथेच भेटणार. तिथे नाही भेटणार. हे केले, तर देव भेटणार. हे केले नाही, तर भेटणार नाही’, असे काही नाही. देवाला कोणतीच चौकट नाही. आपण ‘देव हवा’; म्हणून साधना करतो; पण एक चौकट घालून तेथे देवाला शोधतो आणि ‘तो सापडत नाही’, असे म्हणतो. देव कोणत्याही चौकटीत नाही. ज्या परिस्थितीत देवाने ठेवले, त्यात देवाला शोधले की, … Read more

सेवा कशी करावी ?

अ. सेवा करतांना अहंचे कार्य मोठ्या प्रमाणात चालू असते. अहंमुळे साधक सेवा करतांना मनाला वाटेल, तसे पालट करत असतो. यासाठी मनाचे न ऐकता उत्तरदायी साधकांना विचारून सेवा करायला हवी. आ. सेवा करतांना सेवेत मन पूर्णपणे एकरूप केले, तरच मनाचे अर्पण होऊन मनाचे प्रारब्ध अल्प होणार आहे. त्यामुळे मानसिक त्रासही न्यून होणार आहेत. इ. साधकांनी सेवा … Read more

सेवा करण्याचे महत्त्व !

साधकांचे तन, मन आणि बुद्धी अर्पण व्हावी, यासाठी सेवा आहे. साधकांतील अहं न्यून होण्यासाठी गुरुसेवा करणे आवश्यक आहे. ‘आपली तळमळ वाढावी, आपले मन आणि बुद्धी शुद्ध व्हावी, तसेच अहंचे निर्मूलन व्हावे’, यासाठी गुरुदेवांनी सर्व सेवा निर्माण केल्या आहेत. – पू. (सौ.) संगीता जाधव

अध्यात्म स्वतः अनुभवल्याविना त्यातील चैतन्याचे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही !

ज्याप्रमाणे फुलाचा सुगंध घेतल्याविना त्याचा सुगंध कळत नाही, त्याचप्रमाणे साधना करून अध्यात्माचा अनुभव घेतल्याविना मनुष्याने त्याविषयी बोलू नये. ज्याप्रमाणे फुलातील सुगंधाचे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही, त्याचप्रमाणे अध्यात्मातील चैतन्याचे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही. – सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९२ (२९.१०.२०२१))

ईश्वराचे श्रेष्ठत्व जाणा !

मानवाने आतापर्यंत अनेक गोष्टींचा शोध लावला आहे; मात्र मानवाच्या लक्षात येत नाही की, त्याने शोध लावलेली प्रत्येक गोष्ट नीट चालण्यासाठी ईश्वरी आशीर्वादाची आवश्यकता आहे. मानवाने आकाशयान (विमान) निर्माण केले; मात्र ‘आकाश ईश्वराने निर्माण केले आहे’, हे तो विसरतो. मानव म्हणतो, ‘मी विमान निर्माण केले.’ देव म्हणतो, ‘अरे मानवा, मी तुला निर्माण केले आहे !’ – … Read more

अंतरातील भावाचे महत्त्व

‘मंदिरांत ईश्वराची, देवतेच्या मूर्तीची पूजा होत असते. मूर्तीकडे पहाणाऱ्या व्यक्तीतील भावानुसार त्या त्या देवतेचे आशीर्वाद तिला मिळतात. शिल्पकाराने एखाद्या दगडाकडे पाहिल्यावर त्याला त्या दगडात देवाची मूर्ती दिसू लागते. ‘अमुक दगडापासून कोणत्या देवतेची मूर्ती सिद्ध होईल’, हे त्या शिल्पकाराच्या लगेच लक्षात येते. आपली दृष्टी एखाद्या दगडाकडे गेल्यास आपल्याला केवळ दगड दिसतो; मात्र शिल्पकारातील भावामुळे त्याला दगडात … Read more

केवळ ईश्वरालाच १०० टक्के ज्ञान असते !

आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व अडचणींमागचा कार्यकारणभाव आपल्या लक्षात येईलच, असे नाही. सहदेव श्रीकृष्णाला म्हणतो, ‘‘मला ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असूनही शेवटपर्यंत ‘कर्ण माझा भाऊ आहे’, हे समजले नाही. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतो, ‘‘अरे सहदेवा, कुणालाही कितीही ज्ञान असले, तरी त्याला एखाद्या गोष्टीविषयी केवळ ९९ टक्केच कळू शकते. १०० टक्के केवळ मलाच (ईश्वरालाच) ठाऊक आहे.’’ – सप्तर्षी (पू. डॉ. … Read more

परिपूर्ण सेवेचे महत्त्व !

‘सेवा केल्यास त्याचा ३० टक्के लाभ होतो. सेवा चांगली केली, तर ५० टक्के आणि परिपूर्ण केली, तर १०० टक्के लाभ होतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२५.४.२०२२)

संत देवाचे सगुण रूप असल्याने ते सुंदर दिसतात !

संत देवाचे सगुण रूप असल्याने सुंदर दिसतात. त्यामुळे संत बाह्यतः कसेही दिसले, तरी ‘त्यांच्याकडे बघत रहावे’, असे वाटते. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१०.४.२०२१)

ईश्वराचा सर्वाेच्च गुण प्रीती असल्याने ज्यांच्यामध्ये प्रीती अधिक असते, ते सुंदर दिसतात !

ज्यांच्यामध्ये प्रीती अधिक असते, ते सुंदर दिसतात. ईश्वराचा सर्वाेच्च गुण म्हणजे प्रीती ! पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती काळी असली, तरी ती सुंदर दिसते. विठ्ठलामध्ये सर्वांप्रती असलेल्या प्रीतीची एक प्रकारची आकर्षणशक्ती आहे. देवतांच्या मूर्ती बाह्यतः निर्जीव दिसल्या, तरी त्यांच्यात असलेल्या चैतन्यामुळे त्या सजीव आणि सुंदर दिसतात. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१०.४.२०२१)