मनाचे कार्य !

आपले मन हेच अनुसंधानाचे माध्यम आहे. मनच आपल्याला मायेमध्ये अडकवून ठेवते आणि मनच ईश्वरप्राप्तीच्या दिशेने घेऊन जाते. – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

साधना कुणाची होते ?

जे साधक ध्येय निश्चित करून स्वतःकडून झालेल्या चुका स्वीकारतात, स्वतःच्या चुका लक्षात आल्यावर इतरांचे साहाय्य घेतात आणि इतरांच्या चुका लक्षात आल्यावर त्यांनाही साहाय्य करतात, त्या साधकांची साधना होत असते. – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

आदर्श साधक कुणाला म्हणावे ?

जे साधक ईश्वरप्राप्तीच्या ध्येयासाठी मायेचा त्याग करायला सिद्ध आहेत, स्थुलातून शरीर अर्पण करत आहेत, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून मन समर्पित करण्याचा प्रयत्न करत आहेत, दुर्बुद्धीचा त्याग करून स्वतःचे तन, मन, बुद्धी अन् अहं अर्पण करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते ‘आदर्श साधक’ आहेत. – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

देवाप्रती भाव ठेवण्याचे महत्त्व

अ. आपण देवाचा एक हात धरला की, देव आपले दोन्ही हात धरतो. आ. श्रद्धेतून भाव आणि भावातून भक्ती असेल, तरच आपल्याला मुक्ती मिळू शकेल. इ. अध्यात्मात बुद्धी खुंटीला टांगून ठेवूया आणि भावाच्या स्तरावर प्रयत्न करूया. – सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये

सेवा करतांना लक्षात ठेवावयाची सूत्रे

अ. धर्माच्या कार्यात खारीचा नव्हे, तर सिंहाचा वाटा उचलूया ! आ. सनातनचा एक जरी ग्रंथ प्रत्येक हिंदूच्या घरी गेला, तरी ते घर साधनारत होईल. इ. आपण ‘काही घेण्यासाठी नाही, तर पुष्कळ काही देण्यासाठी जात आहोत’, असा भाव ठेवून जिज्ञासूंना संपर्क करण्याच्या सेवेला जाऊया. ई. साधकाने पाठपुरावा केल्यानंतर झालेली सेवा देवाजवळ पोचत नाही. उ. एखाद्या सेवेचे … Read more

साधकत्व

अ. साधकांनो, स्वतःतील स्वभावदोषांचा त्याग करता आला पाहिजे. आ. लहान व्हायला शिका ! (साधनेत न्यूनता घ्यायला शिका !) इ. मनासारखे झाले, तर हरिकृपा आणि मनाच्या विरुद्ध झाले, तरीही हरीची इच्छा ! – सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये

सत्संगाचे महत्त्व

जेव्हा तांदुळ कुंकवासह असतात, तेव्हा ते अक्षता होऊन देवाच्या चरणी जातात. जेव्हा तांदुळ डाळीसह असतात, तेव्हा त्यांची खिचडी होते. सत्‌चा संग मिळाला, तरच आपण देवाच्या चरणांशी जाऊ शकतो. – सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये

एकरूपतेची प्रक्रिया !

‘एक थेंब पाणी समुद्रात टाकले, तर ते समुद्राशी एकरूप होते. तसा राष्ट्रभक्त राष्ट्राशी एकरूप होतो आणि साधक परमात्म्याशी एकरूप होतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

व्यष्टी साधना

अ. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. आ. अहंमुळे तामसिकता वाढते. इ. परेच्छेने वागलो, तर अहं न्यून होतो. ई. मनात कृतज्ञताभाव असणे महत्त्वाचे आहे. – पू. (सौ.) संगीता जाधव

मनासारखे न झाल्यास दुःखी न होता साधकांनी ईश्वरेच्छा समजून घ्यायला हवी !

‘एखादी सेवा व्हायला पाहिजे’, असे आपण ठरवतो आणि मनासारखे झाले नाही की, आपल्याला दुःख होते अन् ‘देवाला अपेक्षित असे झाले नाही’, असे वाटते. आपण देवाचे नियोजन पहायला हवे.’ ‘परात्पर गुरुदेव सर्वशक्तीमान आहेत. त्यांना कोणतीच गोष्ट कठीण नाही. ते सर्वकाही देऊ शकतात; पण आपण त्यासाठी पात्रता निर्माण करणे आवश्यक आहे.’ – पू. (सौ.) संगीता जाधव