ऋषिमुनींची व्यापकता आणि विज्ञानाचे थिटेपण !
‘ऋषिमुनी सप्तलोकांचा विचार करायचे, तर विज्ञान केवळ पृथ्वीवरील मानवाचा विचार करते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१.२.२०२२)
‘ऋषिमुनी सप्तलोकांचा विचार करायचे, तर विज्ञान केवळ पृथ्वीवरील मानवाचा विचार करते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१.२.२०२२)
‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या किती राष्ट्रपतींची आणि पंतप्रधानांची नावे किती जणांना ज्ञात आहेत ? याउलट ऋषीमुनींची नावे सहस्रो वर्षे ज्ञात आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘हल्लीच्या पालकांना ‘आमचा मुलगा इंग्लीश बोलतो’, याचा अभिमान असतो, तर साधकांना ‘आमचा मुलगा दैवी बालक आहे’, यामुळे कृतज्ञता वाटते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘गुरूंचे ऐकायची शिष्याला सवय लागली की, मगच शिष्य देवाचे सांगणे ऐकतो. असे असल्यामुळे अशा शिष्यालाच देव दर्शन देतो; म्हणूनच तो बुद्धीप्रामाण्यवाद्यांना दर्शन देत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘आपण जिवंत असेपर्यंत आपल्याला जीवनाचे मोल कळत नाही. एखादा अपघात, मोठे आजारपण यांसारख्या घटनांमध्ये आपण मरता मरता वाचलो की, आपल्याला आपण जिवंत असल्याचे महत्त्व कळते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.११.२०२१)
‘अधोगतीला गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब कथा, नाटके, कादंबर्या, चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका इत्यादींत न दाखवता त्यांत समाजाला दिशा देणारा आदर्श समाज दाखवणे सर्वांकडून अपेक्षित आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म अन् मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले
‘कीर्तनकार आणि प्रवचनकार तात्त्विक माहिती सांगतात, तर खरे गुरु प्रायोगिक कृती करवून घेऊन शिष्याची प्रगती करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘अनेक शारीरिक आजार हे शरिराच्या प्राणशक्तीमध्ये अडथळे आल्यामुळे निर्माण झालेले असतात. प्राणशक्तीमधील हे अडथळे विविध न्यास, मुद्रा आणि त्यांच्या जोडीला योग्य त्या देवतेचा नामजप यांनी दूर करता येतात. ही बिनखर्चिक उपचारपद्धती आत्मसात केल्यास ‘आपले आयुष्य आपल्याच हातात असते’, याची अनुभूती येते. अनेक आजारांसाठी औषधोपचारासह या पद्धतीने उपचार केल्यास अल्पावधीत आजार बरे होतात. सनातनचे अनेक साधक … Read more
‘हल्लीच्या काळातील स्त्री-पुरुषांमधील प्रेम बहुदा केवळ शारीरिक प्रेम असते. त्यामुळे त्यांना लग्न करायचीही आवश्यकता वाटत नाही आणि त्यांनी लग्न केले, तर ते टिकत नाही. त्यांचे एकमेकांशी पटले नाही, तर ते मानसिक प्रेम नसल्याने जोडीदार बदलत रहातात. लग्न केलेले असल्यास अल्पावधीच घटस्फोट होऊन ते वेगळे होतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.२.२०२२)