परमपवित्र महर्षि व्यासांनी लिहिलेला इतिहास म्हणजे ‘महाभारत’ प्रमाण असणे !

‘‘रागद्वेषामुळे हे इतिहासकार एकमेकांची हजामत करतात. आधुनिक इतिहास लेखनाची भोंगळ, हिडीस तर्‍हा तर आम्ही प्रतिदिनच पहातो; म्हणूनच रागद्वेष रहित अशा व्यासांसारख्या महनीय, परमपवित्र महापुरुषाने लिहिलेला इतिहास म्हणजे ‘महाभारत’ आम्हाला प्रमाण आहे.’’ – गुरुदेव (डॉ.) काटेस्वामीजी (मासिक ‘घनगर्जित’, मे २०१८)

केवळ शारीरिक कामापुरती सीमित केलेली योगसाधना, हा भारतियांचा करंटेपणा !

पश्‍चिमेतील कुणी विद्वान योगसाधनेची प्रशंसा करतो, तेव्हा आम्हाला त्याचे महत्त्व लक्षात येते आणि आम्ही त्याला योगसाधनेच्या नाही, तर योगाच्या रूपात स्वीकारतो. तेसुद्धा त्याच्या मूळ रूपात नाही, तर योगाच्या ८ अंगांपैकी केवळ ३ अंगे म्हणजेच आसन, प्राणायाम आणि ध्यान इथपर्यंतच सीमित रहातो. आज योग हळूहळू शरीर आणि प्राण यांचाच व्यायाम होत चालला आहे. आजचे योगगुरुही यम, … Read more

अडचणींकडे पहायचा दृष्टीकोन !

‘पूर्णतेच्या मार्गाने ज्याला वाटचाल करायची आहे, त्याला अडचणी येणारच. त्याने त्याविषयी कधी तक्रार करू नये; कारण प्रत्येक अडचण ही नवीन प्रगतीची सुवर्णसंधी असते. तसेच तक्रार ही दौर्बल्य आणि निष्ठाशून्यता यांची निशाणी आहे.’ (‘मासिक तत्त्वज्ञान’, १९०७ वैशाख)

जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृत भाषेतील उच्चार सर्वत्र सारखे असणे

‘लिहितांना अक्षराचे रूप महत्त्वाचे असते, तसा त्याचा उच्चार करतांना तो महत्त्वाचा असतो. जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृत भाषेत याला महत्त्व दिले आहे. त्यामुळे भारतात सर्वत्र वेदोच्चार सारखेच आणि परिणामकारक आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

लोकांचे एकमेव ध्येय ‘सुखप्राप्ती’ !

‘विश्व ही सुखाची एक प्रयोगशाळा आहे. येथे जो प्रयत्न केला जातो, तो एका सुखप्राप्तीसाठीच. जगातील सर्व लोकांचे एकमेव ध्येय कोणते असेल, तर ते ‘सुखप्राप्ती’ हेच होय. असे अगदी ठळक अक्षरांनी लिहून दाखवता येईल.’ यःकश्चित् सौख्यहेतोः त्रिजगति यतते नैव दुःखस्य हेतोः ॥ – शतश्लोकी, श्लोक १५ अर्थ : या त्रैलोक्यात प्रत्येक जण सुखासाठी प्रयत्न करत असतो, … Read more

जन्मभर आणि मृत्यूनंतरही काळजी घेणा-या देवाला विसरणारे वयोवृद्ध !

‘म्हातारपणी मुलगा-सून काळजी घेतात; म्हणून त्यांचे कौतुक करणारे वयोवृद्ध जन्मभर आणि मृत्यूनंतरही काळजी घेणार्‍या देवाला मात्र विसरतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.११.२०२१)

पाश्चात्त्य संशोधनाचा फोलपणा !

‘एखाद्या व्यक्तीच्या जीवनात असे का घडते ?, तसेच प्रारब्ध, वाईट शक्ती, सात्त्विकता इत्यादी शब्दही ज्ञात नसलेले पाश्चात्त्य संशोधन वरवरचे आहे, म्हणजे पोरखेळ आहे ! अशा पाश्चात्त्यांचे हिंदू अनुकरण करतात, हे हास्यास्पद आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

झोपेचे कार्य

‘व्यक्ती श्रीमंत असो वा गरीब, तिचे झोपेपुढे काही चालत नाही. झोप आली की, तिला झोपावेच लागते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.२.२०२२)

म्हातारपणात ऐकू कमी येणे

‘म्हातारपणात विविध अवयवांची क्षमता अल्प होते, तसेच ऐकू येण्याची क्षमताही न्यून होते. त्यामुळे इतरांचे बोलणे ऐकू येईनासे झाले की, वयस्करांना ‘इतर इतक्या हळू आवाजात का बोलतात ?’, असा प्रश्न पडतो; पण ‘स्वतःची ऐकण्याची क्षमता अल्प झाली आहे’, हे त्यांच्या लक्षात येत नाही. हे मीही अनुभवतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.१०.२०२१)