बाह्यरूपापेक्षा आत्म्याचे रूप महत्त्वाचे !

नुसते बाह्यरूपच देखणे असून काय उपयोग ? आत्माही तेवढाच देखणा हवा ! दिव्याची काच घासून पुसून ठेवली; पण त्यात ज्योतच नसेल, तर त्याचा काय उपयोग ? – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

खरा हितचिंतक !

‘अहो रूपम् अहो ध्वनिः ।’ म्हणजे ‘(गाढवाने उंटाला म्हणावे) वा ! काय रूप आहे आणि (उंटाने गाढवाला म्हणावे) वा ! काय आवाज आहे’, असे म्हणणारा कधीही मित्र नसतो. तुम्हाला तुमच्यातील दोष सांगणाराच तुमचा खरा मित्र आणि खरा हितचिंतक असतो. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

स्नेही सदाचारी असावा !

धनवान स्नेही दुराचारी असेल, तर तो कधीही तुमचा विश्वासघात करू शकतो; पण तुमचा स्नेही सदाचारी असेल, तर तो कितीही निर्धन असला, तरी नित्य तुम्हाला साथच देतो. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

सकारात्मकतेतील शक्ती !

घडणाऱ्या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले की, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत आपले हितच आहे, याची जाणीव होते. नेहमी सकारात्मक बोलणारी व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते. नैराश्यपूर्ण विचारांची व्यक्ती समाजातील लोकांना नकोशी वाटते. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

संताना राग येण्यामागील कारण !

‘सर्वसाधारण व्यक्ती रागावते, ते तिला राग आला म्हणून. संत रागावतात ते साधक, शिष्य सुधारावा म्हणून !’ – (परात्पर गरु) आठवले

मनाचे महत्त्व !

‘पंचज्ञानेंद्रिये नाक (गंध), जीभ (चव), डोळे (दृश्य), त्वचा (स्पर्श) आणि कान (ऐकणे) हे अनुभव घेतात; पण त्यातून मिळणारे सुख-दुःख मनालाच मिळते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘ऋषी-मुनींनी सांगितलेले चुकीचे कसे ?

‘ऋषी-मुनींनी सांगितलेले चुकीचे कसे ? हे सांगण्याचा प्रयत्न करणारे तथाकथित विद्वान, हे लक्षात घेत नाहीत की, ऋषी-मुनींनी सांगितलेले सत्य चिरंतन आहे. ते समजून घेण्याचा प्रयत्न तथाकथित विद्वानांनी केला पाहिजे. त्यामुळे ‘मनूचे मत’ असे न म्हणता ‘मनूने सांगितलेले शास्त्र’ असे म्हटले पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भारताची दुर्दशा !

‘भारताची ओळख पूर्वी अध्यात्मशास्त्र आणि जगाला साधना शिकवणारा साधूसंतांचा देश’, अशी होती. आता ‘राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान नसलेल्या भ्रष्टाचारी लोकांचा देश’, अशी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

म्हातारपण, म्हणजे दुसरे बालपण – ‘आई गं’ !

‘म्हातारपणी शरीर जर्जर होऊन कोणतीही हालचाल करतांना वेदना अनुभवयास येतात. त्या वेदनांमुळे आपोआपच तोंडातून ‘आई गं’ हा शब्द बाहेर पडतो ! लहान मुलाप्रमाणे म्हातारपणातही अशी आईची सतत आठवण काढणे, म्हणजे दुसरे बालपणच अनुभवणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातन संस्थेचे महत्त्व

‘मुलाने आणि काही इतरांनी कसे चालावे ? बोलावे ? आणि वागावे ? हे त्यांचे आई-वडील किंवा हितचिंतक त्यांना शिकवतात; पण ‘ते कृतीत कसे आणावे ?’, हे ते शिकवत नाहीत. ते सनातन संस्था शिकवते.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले