खरा बुद्धीवान !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो आणि विज्ञानवाद्यांनो, ‘वैज्ञानिकांना शोध लावण्याची बुद्धी कुणी दिली ?’, याचा कधी विचार केला आहे का ? ती बुद्धी ईश्वराने दिली आहे. असे असतांना ‘ईश्वर नाही’, असे कुणी खरा बुद्धीवान म्हणेल का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

वृक्षारोपण राजकारण्यांच्या हस्ते नको, तर संतांच्याच हस्ते करा !

‘वृक्षारोपण राजकारण्यांच्या हस्ते नको, तर संतांच्याच हस्ते करा ! जसे बी, तसे फळ येते; म्हणूनच राजकारण्यांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना रज-तमात्मक अहंकाराची, तर संतांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना साधकत्व निर्माण करणारी फळे येतात !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

मनुष्य अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिक कृतीशील असल्याने केवळ तोच साधना करू शकतो !

‘मनुष्य वगळता अन्य सर्व प्राणी उपलब्ध अन्न ग्रहण करतात. मनुष्याला मात्र स्वतःसाठी अन्न बनवावे लागत असल्यामुळे मनुष्य अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिक कृतीशील झाला. या कृतीशीलतेमुळेच केवळ मनुष्य साधना करू लागला आणि अन्य प्राणी आहे तसेच राहिले.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले (५.४.२०२२)

सर्वव्यापक ब्रह्मांडाच्या नक्षत्रलोकातून येणारे सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे ज्ञान !

‘या ब्रह्मांडात अनेक नक्षत्रे आहेत. एका नक्षत्राचा एक कण म्हणजे मनुष्य वास करतो, ती भूमी होय ! एवढ्या मोठ्या नक्षत्राचा एक कण म्हणजे ही भूमी आहे, तर एक नक्षत्र किती मोठे असेल ? अशी अनंतकोटी नक्षत्रे असलेले ब्रह्मांड किती मोठे असेल ! सप्तर्षी जीवनाडीपट्टीतील ज्ञान अशा त्या सर्वव्यापक ब्रह्मांडाच्या नक्षत्रलोकातून आलेले आहे !’ – सप्तर्षी … Read more

आस्तिक मनुष्याने नास्तिकाची संगत धरू नये !

बांबू उसासारखा दिसतो; मात्र आपण जसा ऊस खातो, तसा बांबू खाऊ शकत नाही. बांबू म्हणजे ‘नास्तिक’ आणि ऊस म्हणजे ‘आस्तिक’. देवावर श्रद्धा असणारे म्हणजे ‘मध’ आणि देवावर श्रद्धा नसणारे म्हणजे ‘साखर’. मध खाल्ल्याने रोग होत नाहीत. साखर अधिक खाल्ल्याने रोग होतात. या उदाहरणांतून असे लक्षात येते की, आस्तिक मनुष्याने नास्तिकाची संगत धरू नये ! – … Read more

अमृत आणि विष

अमृतको जहरका डर होता है । भावार्थ : अमृत प्यायलेल्यालासुद्धा ‘जहर’ म्हणजे विष घेतले, तर ‘आपण मरू कि काय’, अशी भीती वाटू शकते; मात्र ज्याने विषच पचविलेले आहे, त्याला कशाचीच भीती नसते. सुखात राहिलेल्या साधकाला दुःखाची भीती वाटू शकते; मात्र सर्व संकटांतून गेलेल्याला कशाचीच भीती वाटत नाही. (संदर्भ : प.पू. डॉ. आठवले संकलित सनातनचा ग्रंथ … Read more

विज्ञान हे कधी समजून घेईल ?

‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

वरवरचे उपाय योजणारे शासनकर्ते !

‘निर्गुण ईश्वरी तत्त्वाशी एकरूप झाल्यावरच खरी शांती अनुभवता येते. असे असतांना शासनकर्ते जनतेला साधना न शिकवता वरवरचे मानसिक स्तरावरचे उपाय करतात, उदा. जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी वरवरचे प्रयत्न करणे, मनोरुग्णालये स्थापन करणे इत्यादी.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योग्य आचार-विचार !

दुसऱ्याच्या आधाराची अपेक्षा करत राहिलो, तर कधीच उभे रहाता येणार नाही; म्हणूनच धडपडत का होईना; पण स्वत:च्या हिमतीवर उभे राहून स्वावलंबी होणे इष्ट ! – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

मानवी जीवन

परमेश्वराने देणगी दिलेल्या देहाचा उपयोग नेहमी सत्कर्मासाठी करावा. ‘इतरांच्या त्रासाला आपला देह कारणीभूत होणार नाही’, याची नेहमी काळजी घ्यावी. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन