हास्यास्पद साम्यवाद !
‘अध्यात्मातील ‘प्रारब्ध’ या शब्दाकडे आणि ईश्वराकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे साम्यवाद १०० वर्षांतच समाप्त व्हायला आला आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘अध्यात्मातील ‘प्रारब्ध’ या शब्दाकडे आणि ईश्वराकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे साम्यवाद १०० वर्षांतच समाप्त व्हायला आला आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘देवाला पहायला चष्मा लागत नाही आणि देवाचे बोलणे ऐकू येण्यासाठी कानाला यंत्र लावावे लागत नाही. त्यासाठी फक्त शुद्ध अंतःकरण लागते. प्रजावत्सल शासनकर्ता तसाच असतो. त्याला दुःखी जनता दिसायला चष्मा लागत नाही आणि जनतेच्या समस्या ऐकू येण्यासाठी कानाला यंत्र लावावे लागत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘आस्तिकता कोहिनूर हिर्यापेक्षा मोलाची आहे. भगवंताविना सगळे आधार तकलादू खोटे आणि कोसळणारे आहेत. धनाचा आधार हा आधारच नव्हे. अर्थ (धन) हेच सर्व अनर्थांचे मूळ कारण आहे. प्रतिष्ठा, पत, मित्र, स्वकीय सगळे निरर्थक आहेत. स्वत:च्या शरिराचाही भरवसा नाही. मृत्यूपासून केवळ आस्तिकताच सोडवते. आस्तिकताच अमृतत्त्व देते. आस्तिकच मृत्यूचे निर्भयपणे स्वागत करू शकतो. आस्तिकाचे चित्त अखंड भगवंतातच असते. … Read more
‘पैसा मिळवण्यापेक्षा त्याचा त्याग करणे अधिक सुलभ आहे, तरी मानव तो करत नाही, हे आश्चर्य आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘विज्ञानातील संशोधनाचे ध्येय म्हणजे मानवाला ईश्वरप्राप्ती नव्हे, तर फक्त शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक सुखप्राप्ती करून देणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘धर्मशिक्षण आणि साधना यांच्या अभावी कृतघ्न झालेल्या हल्लीच्या पिढीला आई-बाबांची मालमत्ता हवी असते; पण वृद्ध झालेल्या आई-बाबांची सेवा करायची नसते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘शरिराची ठेवण, स्वभावातील गुण-दोष, कला, बुद्धी, धन इत्यादी घटकांचे ७५० कोटींपैकी २ व्यक्तींमध्येही साम्य नसते. असे असतांना ‘साम्यवाद’ या शब्दाला काही अर्थ आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘विज्ञानाचा खरा अभ्यास केलेल्यांनाच विज्ञानाच्या मर्यादा कळतात. इतर तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी विज्ञानाला डोक्यावर घेऊन नाचतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘भौतिक विकासाच्या दृष्टीनेही धर्म महत्त्वाचा आहे ! दुर्दैवाने आज ‘भौतिक विकास म्हणजेच सारे काही’, असे समजले जात आहे. ‘मेट्रो’, ‘मॉल’, ‘स्मार्ट सिटी’, म्हणजे विकास’, असे भौतिक विकासाचे चित्र निर्माण केले जात आहे. भौतिक विकासामुळे ‘मेट्रो’ आणि ‘मेट्रो’ची अत्याधुनिक रेल्वेस्थानके मिळतील; मात्र ‘काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंवर कशी मात करायची’, याविषयी विकासाच्या … Read more
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो आणि विज्ञानवाद्यांनो, ‘वैज्ञानिकांना शोध लावण्याची बुद्धी कुणी दिली ?’, याचा कधी विचार केला आहे का ? ती बुद्धी ईश्वराने दिली आहे. असे असतांना ‘ईश्वर नाही’, असे कुणी खरा बुद्धीवान म्हणेल का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले