विज्ञानामुळे दुष्परिणाम होण्याची प्रक्रिया

विज्ञानाने शोधून काढलेल्या यंत्रांमुळे दैनंदिन कार्य, प्रवास इत्यादींसाठी लागणारा बराच वेळ वाचला; मात्र त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा, हे विज्ञानाने न शिकवल्यामुळे व्यसने, स्वैराचार इत्यादी गोष्टींत मानव वेळ घालवू लागला. त्यामुळे त्याची अधोगती अती वेगाने झाली आणि होत आहे. – डॉ. आठवले (१९.१.२०१४)

स्वतःपेक्षा इतरांकडे पहाण्याची कारणे

व्यक्ती कितीही सुंदर असली, तरी ती आरशात स्वतःकडे फारच थोडा वेळ पहाते. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. १. अतिपरिचयात् अवज्ञा ।, म्हणजे (आरशात पहाणे) नेहमीचेच झाल्याने त्याचे काही अप्रूप वाटत नाही. २. बहुतेक सर्वच जण बहिर्मुख असल्यामुळे स्वतःकडे पहाण्यापेक्षा त्यांना इतरांकडे पहाणे जास्त आवडते. – डॉ. आठवले (आषाढ शुक्ल पक्ष ५, कलियुग वर्ष ५११५ (१३.७.२०१३))

व्याकरण सोपे केले ! – व्याकरणाचे महत्त्व ज्ञात नसलेले समाजातील तथाकथित विद्वज्जन आणि सर्वपक्षीय राजकारणी !

मराठी भाषेचे लेखन सुलभ होण्याच्या दृष्टीने तिच्यात एकसूत्रीपणा आणण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मराठी भाषा कशी लिहावी, याविषयी १४ नियम सिद्ध केले. सुलभीकरणाच्या या प्रयत्नात महामंडळाने संस्कृतोद्भव मराठी भाषेच्या व्याकरणात संस्कृत व्याकरणाच्या विरुद्ध जातील, असे पालट केले, उदा. मूळ इकारान्त शब्द ईकारान्त केले, म्हणजे गणपतिचे गणपती केले. असे करणे म्हणजे वैद्यकीय शिक्षण कठीण वाटणार्‍यांसाठी … Read more

बहुतेक पुजार्‍यांकडून होणारी देवळातील देवाच्या मूर्तीची अतिपरिचयात् अवज्ञा ।

देवळांतील पुजारी तेथील मूर्तीच्या सहवासात वर्षानुवर्षे सातत्याने असल्यामुळे बहुतेकांच्यात यांत्रिकपणा येतो. अतिपरिचयात् अवज्ञा । म्हणजे अतिपरिचयामुळे अनादर होतो या सिद्धांतानुसार त्यांच्याकडून मूर्तीच्या संदर्भात असे होते. याउलट देवळात दर्शनासाठी आलेल्या काही भक्तांचा क्षणभरच्या दर्शनानेही भाव जागृत होतो. पुजारी असल्याचा स्वतःला लाभ व्हावा; म्हणून त्यांंनी आई-वडिलांची सेवा वर्षानुवर्षे यांत्रिकपणे न करणार्‍या श्रावणाचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. श्रावण … Read more