बुद्धीप्रामाण्यवाद्यांपेक्षा ‘मला दिसत नाही’, असे प्रांजळपणे कबूल करणारा श्रेष्ठ !

‘मोतीबिंदू झालेल्याला बारीक अक्षर दिसत नाही. कुणी ते बारीक अक्षर वाचून दाखवले, तर मोतीबिंदू झालेला त्याला ‘तेथे अक्षर आहे’, असे तुम्ही खोटेच भासवता आहात’, असे म्हणत नाही. तो म्हणतो, ‘मला बारीक अक्षरे दिसत नाहीत.’ त्याने चष्मा लावल्यावर त्याला बारीक अक्षर वाचता येते. याउलट बुद्धीप्रामाण्यवादी त्यांना मान्य नसणारे ‘सर्व खोटे आहे’, असे म्हणतात. ‘साधनेने सूक्ष्म दृष्टी … Read more

पुरोगाम्यांची आदिमानवाकडे वाटचाल !

‘मानव प्रगत होतो, तसे त्याच्यात नम्रता, विचारून सर्व करण्याची वृत्ती इत्यादी गुण निर्माण होतात. पुरोगाम्यांत विचारण्याची आणि शिकण्याची वृत्ती नसते, उलट ‘मला सर्व समजते. मला वाटते तेच योग्य !’, हा अहंकार असल्याने त्यांची वाटचाल आदिमानवाकडे होत आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मानवाची प्रगती’ कशाला म्हणतात, हेही ज्ञात नसलेले विज्ञान !

‘पाश्‍चात्त्यांचे विज्ञान सांगते, ‘आदिमानवापासून आतापर्यंत मानवाने प्रगती केली आहे.’ प्रत्यक्षात मानवाने प्रगती केलेली नसून तो परमावधीच्या अधोगतीकडे जात आहे. सत्ययुगातील मानव देवाशी एकरूप होता. त्रेता आणि द्वापर युगांत त्याची थोडी अधोगती होत गेली. आता कलियुगाच्या आरंभीच त्याची परमावधीची अधोगती झाली आहे. कलियुगाच्या उरलेल्या अनुमाने ४ लक्ष २६ सहस्र वर्षांत त्याची किती अधोगती होईल, याची कल्पनाही … Read more

कुठे विविध क्षेत्रांतील तज्ञ, तर कुठे संत !

‘आधुनिक वैद्य (डॉक्टर), अधिवक्ता, लेखापाल इत्यादी सर्वच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील तज्ञ त्यांच्या क्षेत्रातील प्रश्‍नांची उत्तरे लगेच सांगू शकत नाहीत. ‘प्रश्‍नाचा अभ्यास, तपासण्या करतो आणि नंतर सांगतो’, असे म्हणतात. याउलट संत एका क्षणात कोणत्याही प्रश्‍नाचा कार्यकारणभाव आणि उपाय सांगतात, जे आधुनिक तज्ञ कधीही सांगू शकत नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

जनतेने नशेला बळी पडू नये, यासाठीचा मूलगामी उपाय !

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या भक्तीची गोडी निर्माण केली असती, तर कुणी दारू अन्‌ सिगारेट यांच्या नशेला बळी पडला नसता !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बालवयातील मुलांसारखे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना कधी विश्‍वबुद्धीतून ज्ञान मिळते का ? ‘विश्‍वबुद्धी’ असे काहीतरी आहे आणि विश्‍वबुद्धीतून ज्ञान मिळते, हे तरी त्यांना ठाऊक आहे का ? ठाऊक नसल्यानेच ते बालवयातील मुले बडबडतात, तसे बडबडतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वर्तमानकाळाचे सोने करा !

‘अध्यात्मात भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचे मूल्य शून्य आहे. त्यामुळे भूत-भविष्याच्या विचारांत न अडकता वर्तमानकाळाचे सोने करा !’ – श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२८.१.२०२२)

खरे प्रदूषणनिवारण करायचे असेल, तर प्रथम मनातले प्रदूषण दूर करा !

‘प्रदूषणासंदर्भात सगळीकडे गाजावाजा करून जो उपाय केला जातो, तो रोगाच्या मुळावर उपाय न करता वरवरचे उपाय करण्यासारखे आहे. प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या रज-तमप्रधान मनाला आणि बुद्धीला साधनेने सात्त्विक न बनवता, म्हणजे मुळावर उपाय न करता केलेले वरवरचे उपाय हास्यास्पद आहेत. क्षयरोग झालेल्याला क्षयरोगाची औषधे न देता केवळ त्याला येणार्‍या खोकल्यासाठी औषध देण्यासारखे आहे !’ – सच्चिदानंद … Read more

विविध विषयांतील तज्ञ आणि संत

‘व्यावहारिक जीवनात डोळ्यांच्या डॉक्टरांना डोळ्यांचा आजार होतो. हृदयरोगतज्ञ डॉक्टरांना हृदयाचा विकार होतो. मनोविकारतज्ञांना मानसिक विकार झाल्याचेही आढळते; परंतु अध्यात्मात संतांना इतरांचे आध्यात्मिक त्रास दूर केल्यावर आध्यात्मिक त्रास होत नाहीत. काही संतांना शारीरिक त्रास होत असले, तरी ते देहप्रारब्धानुसार असतात. त्याचा संतांवर परिणाम होत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

७ वर्षे कुठेही बाहेर जाऊ शकत नसल्यामुळे प.पू. डॉक्टरांना झालेले लाभ !

‘पूर्वी मला वाटायचे, ‘झाडे, डोंगर इत्यादी एकाच जागी उभे असतात. त्यांना त्याचा कंटाळा येत नसेल का ?’ याचे उत्तर माझ्या आजारपणाने मला दिले. गेली ७ वर्षे मी कुठेही बाहेर जाऊ शकत नाही, तरी केवळ खिडकीतून दिसणार्‍या दृश्याला पाहून मी आनंदी आहे. असेही म्हणता येईल की, ‘परिस्थितीबद्दल तक्रार न करता आहे ती स्थिती स्वीकारून आनंदी कसे … Read more