इंग्रजी भाषेची मर्यादा जाणा !

‘संपूर्ण जगात आज कुठेही गेलो, तर या भूतलावरील विविध विषय इंग्रजी भाषेतून शिकता येतात. त्यामुळे सर्वत्र इंग्रजी भाषेला महत्त्व आले आहे. सर्व जण ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात. असे असले, तरी मनुष्यजन्माचे मूळ ध्येय, म्हणजे ‘ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हे इंग्रजी भाषेतून शिकता येत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

वेदनेचे लाभ !

‘वेदना झाल्या की, प्रत्येकालाच त्रास होतो आणि ‘त्या कधी थांबतील’, असे वाटते. प्रत्यक्षात वेदनेमुळे फार लाभही होतो. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत. १. एखाद्याच्या पायाचा अस्थिभंग झाला असेल आणि ते विसरून तो चालायला लागला, तर त्याला पुष्कळ वेदना होतात. प्रत्यक्षात वेदना त्याला अस्थिभंगाची जाणीव करून देतात. त्यामुळे तो चालायचा थांबतो. २. एखाद्याला जठरव्रण (अल्सर) … Read more

…तरच भारत महासत्ता बनू शकेल !

‘१९७१ च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानच्या साहाय्यासाठी नौसेना पाठवू इच्छिणार्‍या चीनचा कपटी कावा लक्षात ठेवून अर्थकारणाची पावले उचलल्यासच भारत महासत्ता बनू शकेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मृत्यू संकट नव्हे, तर संकटांतून सोडवणारा आशीर्वाद वाटणे !

‘७० – ७५ वर्षे आयुष्य जगल्यानंतर काही जणांना जीवनात आलेल्या कटु अनुभवांमुळे जगाचा कंटाळा येतो. अशा परिस्थितीत ‘बाहेर कुणाशी संपर्क नको. ‘मी आणि माझे जग’, यात रहावे’, असे त्यांना वाटते. महत्त्वाचे म्हणजे पुढे ‘आता लवकरच मृत्यू येऊन माझी या जगातून सुटका व्हावी’, असे वाटू लागल्यावर काही जणांना मरणाची ओढ लागते आणि मृत्यू हा संकट नव्हे, … Read more

विज्ञानाचे मूल्य ‘शून्य’ !

मानवाला माणुसकी न शिकवणार्‍या, उलट विध्वंसक अस्त्रे, शस्त्रे देणार्‍या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मनाला नियंत्रणात ठेवण्याचे महत्त्व !

‘आपले मन नियंत्रणात न ठेवता, कह्यात न ठेवता, मानेल तसे भटकण्यास त्याला मोकळीक दिली, तर ते बेलगाम होईल. केवळ असमाधानीपणामुळे अशा व्यक्ती आपले आयुष्य वाया घालवतील. विषयसुखाभिलाषी अशा सुखोपभोगांनी अशा व्यक्तींना कधीही तृप्ती मिळणार नाही.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘ श्रीधर-संदेश’, ऑगस्ट १९९९)

दुष्कर्मी लोकांची मानसिकता !

‘दुष्कर्मी लोक दुराचारासाठी एकत्र आले, तरी त्यांचे मित्रत्व कामापुरतेच असते. थोडेसे जरी बिनसले, तरी ते एकमेकांचे शत्रू होतात, एवढ्यावरूनच न थांबता ते एकमेकांच्या विनाशाचीच इच्छा धरतात.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, मार्च २००३)

मनुष्याचे स्वातंत्र्य !

‘मनुष्याला स्वातंत्र्य असते, तर इच्छेप्रमाणे सारे होऊ शकले असते; पण तसे होत नाही. म्हणूनच त्याला ‘अस्वातंत्र्य’ म्हणावे लागते.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, ऑक्टोबर १९९८)

समाजात समता नांदावी, यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या गुणकर्मानुसार त्याला विषम अधिकार देणे अनिवार्य असणे !

‘समतेसाठी लढणार्‍या सैन्यात सेनापती, हाताखालचे निरनिराळे अधिकारी, चतुरंगसेना इत्यादी भेद (फरक) परस्पर अधिकार तारतम्यामुळे असतातच. ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार आज्ञाकारी, आज्ञाधारी हे भेद नाहीसे केल्यास कोणतेच राष्ट्र टिकणार नाही. कोणत्याही खात्यात, न्यायालयात उच्च-नीच भेद, अधिकार – तारतम्य आणि अल्प-अधिक कार्यक्षमता असतेच. सर्व भेदांचे निर्मूलन करण्यासाठी भरलेल्या सभेतही, स्थापलेल्या समाजातही, समतेचा उदो उदो करणार्‍या राष्ट्रातही अध्यक्ष, उपाध्यक्ष … Read more

बोलल्याप्रमाणे चालणारी माणसे हवीत !

‘आज बोलल्याप्रमाणे चालणारी माणसे हवी आहेत. नुसते बोलून भागणार नाही. पाकशास्त्राचे नुसते तोंडाने वर्णन केल्यास त्याने पोट भरेल का ? त्यासाठी स्वयंपाक करून जेवण केल्यानेच पोट भरणार आहे. म्हणूनच मनुष्याने बोलल्याप्रमाणे वागणेच योग्य होय.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘श्रीधर – संदेश’, फेब्रुवारी २००३)