कलियुगात स्वभावदोष आणि अहं यांमुळे लग्न टिकणे कठीण होत असणे !

‘सत्ययुग ते द्वापरयुग या काळात सर्वजण सात्त्विक असायचे. त्यांच्यात स्वभावदोष आणि अहं अल्प असायचे. ते साधना करत असल्यामुळे त्यांचा एकमेकांना समजून घेण्याचा भाग होत असे. कलियुगात स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रता वाढत चालल्यामुळे लग्न टिकणे कठीण होऊ लागले आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (७.१२.२०२१)

सनातनच्या साधकांना मिळणारे कल्पनातीत आध्यात्मिक ज्ञान !

‘कथा आणि कादंबर्‍या यांमधून मांडण्यात येणार्‍या संकल्पना काल्पनिक असतात. त्यात मांडलेल्या विचाराला विज्ञानाचा आधार नसतो. सध्याचा भ्रमणभाषचा शोध हा १८ – १९ व्या शतकातील लोकांसाठी कल्पनातीत होता. काल्पनिक आणि कल्पनातीत या दोन शब्दांमध्ये असा भेद आहे. तशाच प्रकारे सनातनच्या काही साधकांना मिळणारे विविध विषयांवरील ज्ञान हे ‘कल्पनातीत’ आहे. या ज्ञानात दिलेली एखाद्या घटनेमागील आध्यात्मिक कारणमीमांसा … Read more

‘म्हणे, साम्यवाद !

शरीर, मन, बुद्धी इत्यादी कोणत्याही गोष्टींच्या संदर्भात जगातील ७५० कोटींपैकी कोणत्याही दोन व्यक्तींत साम्य नाही ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद नाही का ?

‘एक तरी चांगला प्रशासकीय अधिकारी दाखवा आणि पारितोषिक मिळवा’, असे सांगायची आज पाळी आली आहे. हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातन संस्थेचे वेगळेपण !

‘सध्या समाजात प्रत्येक जण मानसन्मान आणि प्रतिष्ठा यांसाठी विविध पदव्या अन् पैसे मिळवतात. याउलट सनातन संस्थेमध्ये प्रत्येक जण कोणत्याही व्यावहारिक फळाची अपेक्षा न करता तन, मन आणि धन यांचा अधिकाधिक त्याग करतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बुद्धीपलीकडील कार्यकारणभाव ठाऊक नसणारे बाल्यावस्थेतील विज्ञान !

‘एखादी घटना घडली की, विज्ञान ती घडण्यामागील केवळ भौतिक कारणांचा अभ्यास करते. त्यामागे काही कार्यकारणभाव असतो, हे विज्ञानाला अद्याप कळलेले नाही, उदा. एखाद्या बसला अपघात घडून त्यामध्ये २० प्रवासी मेले आणि १ प्रवासी वाचला. या घटनेमध्ये विज्ञानाच्या दृष्टीकोनातून अपघात होण्याची कारणे ‘रस्ता खराब असणे, बसमध्ये तांत्रिक बिघाड होणे, चालकाची चूक असणे’ यांसारखी मर्यादित असतील; पण … Read more

संतांची महती !

‘डॉक्टर, अधिवक्ते, लेखापरीक्षक, ज्योतिषी, पोलीस, मित्रमंडळी, नातेवाईक इत्यादी विविध क्षेत्रांतील तज्ञ जे करू शकत नाहीत. ते संत करू शकतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राजकारणी आणि संत यांच्या कार्यातील भेद !

‘राजकारण्यांकडून स्थुलातून अनुभव येतात, उदा. पूरग्रस्तांना साहाय्य करणे, साधनसुविधा उपलब्ध करून देणे, तर संतांकडून सूक्ष्म स्तरावरील उपायांमुळे अनुभव येतात, उदा. अनेकांच्या कौटुंबिक अडचणींसह शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि आध्यात्मिक अडचणी दूर होतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

इंग्रजी भाषेची मर्यादा जाणा !

‘संपूर्ण जगात आज कुठेही गेलो, तर या भूतलावरील विविध विषय इंग्रजी भाषेतून शिकता येतात. त्यामुळे सर्वत्र इंग्रजी भाषेला महत्त्व आले आहे. सर्व जण ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात. असे असले, तरी मनुष्यजन्माचे मूळ ध्येय, म्हणजे ‘ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हे इंग्रजी भाषेतून शिकता येत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले