बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा अध्यात्माविषयी हास्यास्पद अहंकार !

‘बुद्धीप्रामाण्यवादी वैद्यकीय, अभियांत्रिकी इत्यादी बौद्धिक स्तराच्या विषयांवर आधुनिक वैद्य (डॉक्टर), अभियंते इत्यादींशी वाद घालत नाहीत; मात्र बुद्धीच्या पलीकडील आणि स्वतःला शून्य ज्ञान असलेल्या अध्यात्मशास्त्राविषयी स्वतः सर्वज्ञ असल्याप्रमाणे संतांवर टिका करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुठे समष्टी स्तरावर कार्य करणा-या मुंग्या, तर कुठे स्वार्थी मनुष्य !

‘कोठे अन्नपदार्थांचे कण असल्यास त्याला लगेच मुंग्या लागतात. यामध्ये त्यांचे वैशिष्ट्य असते की, त्या कधीच स्वतःसाठी अन्न गोळा करत नाहीत. अन्नकण गोळा करतांना सर्व मिळून ते त्यांच्या वारुळामध्ये घेऊन जातात. एखादी मुंगी तेथेच खात आहे किंवा मुग्यांमध्ये एखाद्या कणासाठी खेचाखेची चालू आहे, असे दिसत नाही. याउलट सर्व प्राण्यांमध्ये ‘बुद्धीमान’ असणारा मनुष्य नेहमी स्वतःचाच विचार करत … Read more

सध्याची समाजस्थिती डोळे झाकून आंधळ्याच्या मागेच जाणे

‘थोडासा विचार केल्यास जगातील वैभव आणि सुख यांसाठी धडपडणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. सध्याच्या लोकशाहीप्रमाणे बहुमताचा निर्णय मानून, जगातील सुखात समाधान मानून, तेच आपल्या जीविताचे इति कर्तव्य आहे, असे जर समजलो, तर ‘विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः शतमुखः ।’ (नीतिशतक, श्‍लोक १०) ‘म्हणजे विवेकभ्रष्ट झालेल्या लोकांचे अनेक प्रकारे अधःपतन होते’ या सुभाषिताप्रमाणे सर्व बाजूंनी अधःपतनच होईल. … Read more

जीवनात संघर्ष जितका मोठा, तितके यशही मोठे !

‘प्रत्येक मनुष्याला जीवनात कधी ना कधी तरी कुठल्या ना कुठल्या तरी स्तरावर संघर्ष हा करावाचा लागतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनाही जीवनात प्रचंड संघर्ष करावा लागला होता. त्यांनी संघर्षाला मोठ्या धैर्याने तोंड दिले; म्हणून त्यांना पुढे यश अन् कीर्तीही मोठी लाभली. यास्तव जीवनात कराव्या लागणार्‍या संघर्षापुढे गुडघे टेकणार्‍यांनी, प्रतिकूल परिस्थितीला दोष देणार्‍यांनी … Read more

माणूस श्रेष्ठ कि प्राणी आणि वनस्पती ?

‘माणूस सोडून कोणताही प्राणी अथवा वनस्पती सुटी घेत नाही. देवही एक सेकंदाची सुटी घेत नाही. माणूस मात्र शनिवार आणि रविवार सुटी घेतो. एवढेच नव्हे, तर वर्षातूनही काही दिवस हक्काने सुटी घेतो. असे असतांना यासंदर्भात माणूस श्रेष्ठ कि प्राणी आणि वनस्पती ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

शिक्षणात माणुसकी शिकविण्याचे महत्त्व !

‘शाळेपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत कोणत्याही शिक्षणात माणुसकी न शिकवल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात जनतेला लुबाडणारे व्यावसायिक आणि नोकरी करणारे निर्माण झाले आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातनच्या आश्रमांची अद्वितीयता !

‘समाजात, कार्यालयात आणि इतरत्र अहंकार, खोटे बोलणे, भ्रष्टाचार इत्यादी गोष्टींचे अनुकरण केले जाते, तर सनातनच्या आश्रमांत चांगल्या गुणांचे अनुकरण केले जाते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आईच्या गर्भाचे अनन्यसाधारण महत्त्व 

विज्ञानाच्या साहाय्याने बाळाला काचेच्या पेटीत (इन्क्युबेटरमध्ये) जिवंत ठेवता येऊ शकते; परंतु संपूर्ण विश्वात विज्ञानाला आजपर्यंत अशी एकही काचेची पेटी (इन्क्युबेटर) बनवता आली नाही की, ज्यामध्ये आईच्या गर्भातील माया, संस्कार आणि प्रेम त्या बाळाला देता येईल.’ – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

आंतरिक ‘मेक-अप’ चे महत्त्व !

‘बाहेरची रंगभूषा (मेक-अप) इतरांना आकर्षित करते, तर आतील रंगभूषा (मेक-अप), म्हणजे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून देवाला आकर्षित करते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले