मानसिक नव्हे, तर केवळ शारीरिक प्रेम असणारे हल्लीचे पती-पत्नी !

‘हल्लीच्या काळातील स्त्री-पुरुषांमधील प्रेम बहुदा केवळ शारीरिक प्रेम असते. त्यामुळे त्यांना लग्न करायचीही आवश्यकता वाटत नाही आणि त्यांनी लग्न केले, तर ते टिकत नाही. त्यांचे एकमेकांशी पटले नाही, तर ते मानसिक प्रेम नसल्याने जोडीदार बदलत रहातात. लग्न केलेले असल्यास अल्पावधीच घटस्फोट होऊन ते वेगळे होतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.२.२०२२)

राजकारणी आणि साधक यांच्या कार्यातील भेद !

‘राजकारणी समाजात स्वतःच्या लाभासाठी ‘मला मत द्या’, असे सांगतात. याउलट साधक लोकांकडे स्वतःसाठी काही मागत नाहीत, उलट ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करा’, असे सांगतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

देवाचे स्थळ असलेल्या ठिकाणी चुकून पाय लागल्यास लाभही होणे !

सात्त्विक जागा, उदा. देवाचे स्थळ अशा ठिकाणी चुकून पाय लागल्यास, त्या चैतन्यदायी जागेला आपला पाय लागला; म्हणून आपल्याला वाईट वाटते. असे असले, तरी त्या चैतन्यदायी जागेच्या स्पर्शाने आपल्या देहात तेथील देवतेचे तत्त्व संक्रमित होते. हा त्याचा लाभही आहे. असे असले, तरी मुद्दामहून पाय लावू नये. त्यामुळे अधिक हानी होते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.१.२०२२)

म्हातारपण हा एकप्रकारे देवाचा आशीर्वादच असतो !

‘मनुष्य जन्माला आल्यापासून वयस्कर होईपर्यंत तो स्वकर्तृत्त्वाचा अभिमान, आप्तस्वकीय, विविध विषयांची आसक्ती अशा अनेक सांसारिक गोष्टींमध्ये मनाने पूर्णतः गुंतून जातो. या स्थितीत त्याला ‘मृत्यू नको’, असे वाटते. त्यानंतर म्हातारपणी विविध आजारपणांमुळे दुःख भोगायला लागते. त्यामुळे त्याला ‘मृत्यू लवकर यावा’, असे वाटते. त्यामुळे म्हातारपण हा एकप्रकारे मायेतून मुक्त करण्यासाठीचा देवाने दिलेला आशीर्वादच आहे, ज्यामुळे मनुष्य स्वतः … Read more

जीवनप्रवास

‘आगगाडीने प्रवास करतांना एखाद्या प्रवाशाचे स्थानक आले की, तो उतरतो आणि परत कधी भेटत नाही. त्याप्रमाणे जीवन प्रवासात एखाद्याचे आयुष्य संपले की, त्याचा मृत्यू होतो आणि परत त्याची कधी भेट होत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुठे आदर्श प्रभु श्रीराम आणि कुठे आजचे अकार्यक्षम राजकारणी !

‘कुठे सहस्रो दावे प्रलंबित असतांना काही कृती न करणारी आतापर्यंतची सरकारे, तर कुठे जनतेतील एकाने केवळ संशय व्यक्त केल्यावर सीतेचा त्याग करणारे प्रभु श्रीराम ! यामुळे प्रभु श्रीराम अजरामर आहेत, तर राजकारण्यांना जनता काही वर्षांतच विसरते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

निवडणुका हा पोरखेळ झाला आहे

‘निवडणुकीसंदर्भात प्रतिदिन येणार्‍या बातम्या वाचून वाटते, ‘आता निवडणुका हा पोरखेळ झाला आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राजकीय पक्ष आणि साधक यांच्यातील भेद !

‘तत्त्वशून्य राजकीय पक्ष जनतेला खूश करून निवडून येण्यासाठी काहीही करतात, तर साधक केवळ ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी कठोर प्रयत्न करायला सिद्ध असतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना सूक्ष्मातील विषय समजून घेण्याची जिज्ञासा नसते !

‘आंधळा म्हणतो, ‘दृश्य जग असे काही नाही.’ त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले आणि बुद्धीप्रामाण्यवादी म्हणतात, ‘सूक्ष्म जग’, भूते इत्यादी काही नाही’; कारण त्यांना सूक्ष्मातील विषय समजून घेण्याची जिज्ञासा नसते आणि त्यांच्यात सूक्ष्म जग अनुभवण्यासाठी जी साधना करावी लागते, ती करण्याची क्षमता नसते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव … Read more

सात्त्विक संगीत आणि तमोगुणी संगीत यांचा देहावर होणारा परिणाम अन् भारतीय संगीताचे वैशिष्ट्य

उच्च पातळीचे सात्त्विक संगीत ऐकल्यावर त्या संगीतामध्ये रममाण होऊन आपले डोके आपोआपच डोलू लागते. खालच्या पातळीचे, म्हणजे तमोगुणी संगीत ऐकल्यावर मनुष्याच्या शरिराचा रज-तमप्रधान दर्शक कटीखालचा भाग आपोआप हलू लागतो; म्हणूनच विदेशी संगीतावर सर्वजण कटी हलवून नाचतात, तर भारतीय संगीत मात्र शरिरासमवेतच तुमच्या मनालाही आनंद देते. भारतीय संगीतावर तुमचे मनही डोलते. – श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ … Read more