जगात एकमेव धर्म आहे हिंदु धर्म !

‘उत्पत्ती, स्थिती आणि लय’ या सिद्धांतानुसार विविध संप्रदायांची स्थापना होते आणि काही काळानंतर त्यांचा लय होतो, म्हणजे त्यांचे अस्तित्व टिकत नाही. याउलट सनातन हिंदु धर्माला उत्पत्ती नसल्यामुळे, म्हणजे तो अनादि असल्यामुळे तो अनंत काळपर्यंत रहाणार आहे. हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे. जगात दुसरा धर्मच नसल्यामुळे ‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द किती अयोग्य आहे, हेही यावरून लक्षात येते. … Read more

सर्वधर्मसमभाव म्हणणे ही अज्ञानाची परिसीमा !

‘जगात केवळ सर्व धर्मांचा अभ्यास न केलेले हिंदू ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात. बाकी एकाही धर्मातील एकही जण तसे म्हणत नाही. हिंदूंच्या हे लक्षात येत नाही की, ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणे ही अज्ञानाची परिसीमा आहे, ‘प्रकाश आणि अंधार समान आहेत’, असे म्हणणे आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु राष्ट्रात माध्यमांचा वापर केवळ धर्मशिक्षण आणि साधनेसाठी होईल !

‘हिंदु राष्ट्रात (सनातन धर्म राज्यात) नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींचा वापर केवळ धर्मशिक्षण आणि साधना यासंदर्भात केला जाईल. त्यामुळे गुन्हेगार नसतील आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी असतील.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी आपण भक्त बनणे आवश्यक !

‘श्रीराम स्वतः ईश्‍वराचा अवतार होता. पांडवांच्या वेळी पूर्णावतार श्रीकृष्ण होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी समर्थ रामदासस्वामी होते. यावरून लक्षात येईल की, ईश्‍वरी राज्याची स्थापना ईश्‍वर स्वतः करतो किंवा संतांकडून करवून घेतो. ‘आता हिंदु राष्ट्राची स्थापना ईश्‍वराने करावी किंवा संतांकडून करवून घ्यावी’, यासाठी आपण त्याचे भक्त बनणे आवश्यक आहे.’ ‘सात्त्विक व्यक्तींच्या व्यष्टी जीवनाचे ध्येय असते ईश्‍वरप्राप्ती, … Read more

देशाची स्थिती सुधारण्यासाठी आता केवळ साधकांचे राज्य आवश्यक

‘सरकारी कर्मचारी हे देशाची सेवा करण्यासाठी असतात. असे असले, तरी त्यांना पगार असतोच. त्यांना त्यांचा पगार अल्प वाटू लागला की, त्यांची लगेच आंदोलने आणि संप चालू होतात. काम करतांनाही त्यामध्ये कामचुकारपणा आणि भ्रष्टाचार असतो, तो निराळाच ! त्यामुळे ‘सध्याच्या काळात देशासाठी कुणी सरकारी कर्मचारी बिनपगारी नोकरी करील का ?’, असा प्रश्न हास्यास्पद ठरतो. याउलट राष्ट्र … Read more

आपल्याच मतदारकेंद्रातील जनतेला लुबाडणारे लोकप्रतिनिधी !

‘एखादा वडील झाला, म्हणजे त्याच्यावर मुलाचे उत्तरदायित्त्व असते. तो ते दायित्त्व पार पाडतो, म्हणजे त्या मुलाची सर्वतोपरी काळजी घेतो. याउलट निवडून आलेले बहुतेक लोकप्रतिनिधी आपल्या मतदारकेंद्रातील जनतेला ‘लुबाडण्याचे एक हक्काचे स्थान’ समजतात !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

पोलीसखाते आणि प्रशासन यांची झालेली दुःस्थिती !

‘सध्याचे पोलीसखाते आणि प्रशासन यांची दुःस्थिती पहाता पुढील काळात ‘भ्रष्टाचार न करणारा १ तरी पोलीस आणि सरकारी अधिकारी दाखवा आणि इनाम मिळवा !’, अशी जाहिरात आल्यास आश्चर्य वाटणार नाही ! ’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भारतात गुन्ह्यांची नोंद अल्प प्रमाणात होण्याचे कारण

‘बहुतेक जण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला जात नाहीत; कारण त्यांना ठाऊक असते की, तेथे वेळ फुकट जाऊन कधीकधी पोलिसांच्या उद्धटपणामुळे अपमान सहन करावा लागेल आणि शेवटी फलनिष्पत्ती काहीच मिळणार नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आता केवळ रामराज्य हवे !

‘भारतातील लोकशाहीचा स्वातंत्र्योत्तर ७४ वर्षांचा इतिहास पहाता ‘आता राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षासाठी कोणत्याही भ्रष्ट आणि दुराचारी राजकीय पक्षाचे राज्य नको, तर केवळ रामराज्य हवे’, असे वाटते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

निवडणुकीसाठी उभे रहाणा-या उमेदवारांनो, हे लक्षात घ्या !

‘राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम नसलेल्या उमेदवाराकडून पैसे घेऊन त्याला मते देणार्‍या जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यापेक्षा ‘ईश्वराने भक्त म्हणून निवडणे अनंत पटींनी महत्त्वाचे आहे’, हे लक्षात घ्या ! ’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले