हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व !
‘हिंदु धर्मात सांगितले आहे तितके सखोल ज्ञान इतर एकातरी पंथात आहे का ? विज्ञानाला तरी ज्ञात आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘हिंदु धर्मात सांगितले आहे तितके सखोल ज्ञान इतर एकातरी पंथात आहे का ? विज्ञानाला तरी ज्ञात आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘आधीच्या युगांत प्रजा सात्त्विक असल्याने ऋषींना समष्टी प्रसारकार्य करावे लागायचे नाही. आता कलियुगात बहुतेक साधना करत नसल्याने संतांना समष्टी प्रसारकार्य करावे लागते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘निरक्षराने ‘सर्व भाषांतील अक्षरे सारखीच असतात’, असे म्हणणे, जसे म्हणणार्याचे अज्ञान दाखवते, त्याचप्रमाणे ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे त्यांचे अज्ञान दाखवतात. ‘सर्व औषधे, सर्व कायदे सारखेच आहेत’, असे म्हणण्यासारखे ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘भारतातील हिंदूंमध्ये हिंदु धर्म सोडला, तर भाषा, सण, उत्सव, कपडे इत्यादी विविध राज्यांमध्ये निरनिराळे आहेत. त्यामुळे हिंदूंना केवळ धर्मच एकत्र आणू शकतो. हिंदूंनी धर्माचे महत्त्व आतातरी लक्षात घेऊन सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘अध्यात्म हे अनंताचे शास्त्र असल्यामुळे हिंदु धर्मात अनंत ग्रंथ आहेत. हे लक्षात न घेता काही धर्मद्वेष्टे हिंदू आणि इतर धर्मीय म्हणतात, ‘हिंदु धर्मात बायबल, कुराण यांसारखा एकच ग्रंथ नाही.’ ते हे लक्षात घेत नाहीत की, बालवाडीला एकच पुस्तक असते, तर पदव्युत्तर शिक्षण घेतांना अनेक पुस्तकांचा अभ्यास करावा लागतो. यासाठी हिंदु धर्मात अनंत ग्रंथ आहेत.’ – … Read more
‘भारत स्वतंत्र झाल्यानंतर ७४ वर्षांत काँग्रेसने निवळ हिंदुद्वेष आणि अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण केले. भारताला आणि हिंदु धर्माला नष्ट करण्यासाठी साम, दाम, दंड अन् भेद अशा सर्व नीतींचा वापर केला. काळानुरूप हिंदूंनी एकजुटीने काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आणले. यावरून हिंदूंनो, आपल्या एकीचे बळ जाणा ! केवळ सत्तापालटापुरते नाही, तर ‘अहोरात्र संघटित रहाणे, ही काळाची आवश्यकता आहे’, याचाही बोध … Read more
‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात मी साहाय्य करीन’, असा दृष्टीकोन नको, तर ‘हे माझेच कार्य आहे’, असा दृष्टीकोन हवा ! तसा दृष्टीकोन असल्यास कार्य चांगले होते आणि स्वतःचीही प्रगती होते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे इतर धर्म, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्वरप्राप्ती व्हावी’, हे ध्येय असणारा हिंदु धर्म !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘अनेक राजकारणी त्यांच्या राजकीय पक्षाने त्यांना उमेदवारी नाही दिली, तर तो राजकीय पक्ष सोडून उमेदवारी देणार्या अन्य राजकीय पक्षात जातात. अशा पक्षनिष्ठा नसणार्या राजकारण्यांमध्ये देशनिष्ठा किती असणार ? आणि असे स्वार्थी राजकारणी जनतेचे तरी काय भले करणार ? ’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले