देश रसातळाला जाण्यामागील कारण !
‘प्रथम मोगल, नंतर इंग्रज आणि आता राष्ट्रप्रेम नसलेले विविध राजकीय पक्ष यांच्यामुळे देश रसातळाला गेला आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘प्रथम मोगल, नंतर इंग्रज आणि आता राष्ट्रप्रेम नसलेले विविध राजकीय पक्ष यांच्यामुळे देश रसातळाला गेला आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘सर्व रोगांना एकच औषध किंवा सर्व दाव्यांना एकच कायदा नसतो; पण राष्ट्र आणि धर्म यांच्या सर्व समस्यांना एकच उत्तर आहे अन् ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘हिंदु राष्ट्रातील सर्व कायदे धर्माधिष्ठित असतील. त्यामुळे त्यांच्यात पालट करावा लागणार नाही आणि त्यांच्या पालनाने गुन्हे न होता साधनाही होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या ७४ वर्षांच्या काळात बहुतेक राजकीय पक्षांनी भारताची खरी प्रगती केलीच नाही, उलट सर्व अधार्मिक आणि नीतीशून्य विषयांत भारताने प्रगती केली आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
डॉक्टर नसलेल्याने रुग्णांवर उपाय करणे, याप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी प्रेम नसणार्या जनतेला राष्ट्र अन् धर्म यांच्याविषयी प्रेम नसणार्या राजकीय पक्षांना निवडून द्यायचा अधिकार दिल्याने देशाची सर्वच क्षेत्रांत केविलवाणी स्थिती झाली आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करतांना ‘मी करतो’, असा अहं बाळगण्याची आवश्यकता नाही; कारण कालमाहात्म्यानुसार ते कार्य होणारच आहे; पण या कार्यात जे निःस्वार्थीपणे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होतील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘व्यक्तीगत प्रेमापेक्षा राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम करून पहा. त्यात अधिक आनंद आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले
‘भारत ९०० वर्षे पारतंत्र्यात असल्याने हिंदूंच्या कित्येक पिढ्या गुलामगिरीत जगल्या. आता मनातील गुलामगिरीचे विष नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्राची (ईश्वरी राज्याची) स्थापना करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसे केल्यावरच ४ – ५ पिढ्यांत राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी हिंदूंमध्ये अभिमान जागृत होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘राष्ट्र-धर्मासंदर्भात इतरांना ‘काहीतरी करा’, असे शिकवणारे; पण स्वतः काही न करणारे पत्रकार ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥’ या गटात येतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘बहुतांश हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्य हे शारीरिक आणि मानसिक स्तरांवरील आहे. त्यांच्या कार्याला साधनेने मिळणार्या आध्यात्मिक बळाचा काहीच आधार नाही. अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसंदर्भात बोलतात; पण त्यांच्या लक्षात येत नाही की, हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. साधनेविना ईश्वराचा आशीर्वाद मिळत नाही आणि ईश्वराच्या आशीर्वादाविना काहीच साध्य होऊ शकत नाही. त्यांना ‘हिंदु … Read more